Ticker

6/recent/ticker-posts

भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय 10 vi bhugol swadhyay naisargik vanaspati v prani नैसर्गिक वनस्पती व प्राणी

भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय -नैसर्गिक वनस्पती व प्राणी

आज आपण भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय  10 vi bhugol swadhyay सोडवणार आहोत. १० वी च्या वर्गातील भूगोल विषयातील पाठाचा स्वाध्याय सर्व प्रश्नासह सोडवणार आहोत. इयत्ता दहावी भूगोल विषयात असलेले सर्व पाठ प्रथम आफण पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू. कोणत्याही परीक्षेत यश मिळवण्यासाठी आपला प्रत्येक पाठावरील स्वाध्याय चांगला असणे आवश्यक असतो. त्यासाठी खालील सर्व प्रश्न सोडवा. 

10 vi bhugol swadhyay- 

इयत्ता १० वी वर्गातील भूगोल विषयातील पाठ पुढील प्रमाणे आहोत. क्षेत्रभेट, स्थान-विस्तार, प्राकृतिक रचना व जलप्रणाली, हवामान, नैसर्गिक वनस्पती  व प्राणी, लोकसंख्या, मानवी वस्ती, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. या पाठांचा SWADHAY स्वाध्याय अभ्यासणार आहोत.

भूगोल-इयत्ता-१०वी स्वाध्याय-10vi bhugol-swadhyay naisargik-vanaspati-v-prani

भूगोल इयत्ता १० वी कृतीपत्रिका- 

अ क्रप्रश्नप्रकारगुणविकल्पासह गुण
०१प्र. १. कोणतेही एक किंवा दोन प्रश्नप्रकार विचारण्यात येतील.) (चार प्रश्नांपैकी चारही सोडवणे.) • अचूक पर्याय निवडा. . • दोन गटांचा विचार करून योग्य पर्याय काढा. • अचूक सहसंबंध ओळख व साखळी बनवा • अचूक पर्यायासमोरील चौकटीत खूप करा. • वाक्यांतील सहसंबंध योग्य पर्यायाने प्रस्थापित करा.०४०४
०२प्र. २. (पुढीलपैकी कोणतेही एक किंवा दोन प्रश्नप्रकार विचारण्यात येतील.) (चार प्रश्नांपैकी चारही सोडवणे.) • योग्य जोड्या जुळवा • चुकीची जोडी. . • साखळी पूर्ण करा • विधानांचा योग्य क्रम लावा • वेगळा घटक ओळखा०४०४
०३प्र. ३. (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) • एका वाक्यात उत्तरे लिहा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • विधानावरून प्रकार ओळखा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • नावे द्या (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • फरक स्पष्ट करा. (तीन प्रश्नांपैकी दोन सोडवणे.) • चूक की बरोबर सांगा व चुकीची विधाने दुरुस्त करा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • वर्गीकरण करा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.)०४०५
०४प्र. ४. (अ) (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) • नकाशात माहिती भरा व सूची तयार करा. (सहापैकी कोणतीही चार नावे भरणे.). • माहितीच्या आधारे नकाशा तयार करा.०४०६
०५प्र. ४. (आ) नकाशावाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (सहा प्रश्नांपैकी कोणतेही चार सोडवणे)०४०६
०६प्रश्न ५. भौगोलिक कारणे लिहा. (चार प्रश्नांपैकी कोणत्याही दोन विधानांची कारणे लिहिणे.)०६१२
०७प्रश्न ६ (अ) आकृती काढा (दोनपैकी एक आकृती काढणे ) • दिलेल्या आकृतीत नावे भरा/भूरूपे ओळखा . किंवा प्रश्न ६ (आ) आलेख वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (सहा प्रश्नांपैकी कोणतेही तीन सोडवणे.) दिलेल्या सांख्यिकी माहितीच्या आधारे आलेख काढा. [(अ) व (आ) पैकी कोणताही ११ प्रश्नप्रकार विचारला जाईल.]०६१२
०८प्र. ७. (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) (चार प्रश्नांपैकी कोणतेही दोन सोडवणे.) • सविस्तर उत्तरे लिहा. • थोडक्यात उत्तरे लिहा. • स्पष्ट करा.०८१६
०९एकूण४०६५

@

भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय -नैसर्गिक वनस्पती व प्राणी

10 vi bhugol swadhyay

1/25
प्रश्न १ ला- भारतातील ------- राज्यात काटेरी झुडपी वने आढळतात.
(अ) महाराष्ट्र
(ब) गोवा
(क) राजस्थान
(ड) केरळ
2/25
प्रश्न २ रा - भारतात --- खारफुटीची वने आढळतात.
(अ) हिमालयाच्या पायथ्याशी
(ब) वाळवंटी प्रदेशात
(क) दलदलीच्या प्रदेशात
(ड) हिमालयाच्या अतिउंच प्रदेशात
3/25
प्रश्न ३ रा- ---- 'हे ब्राझीलचे वैशिष्ट्य आहे
(अ) मोर
(ब) कोल्हे
(क) कांगारू
(ड) गुलाबी डॉल्फिन
4/25
प्रश्न ४ था- भारताच्या गवताळ प्रदेशात -------- पक्षी आढळतो.
(अ) कोंडोर
(ब) माळढोक
(क) मकाव
(ड) फ्लेमिंगो
5/25
प्रश्न ५ वा- -------- येथे मोठ्या प्रमाणावर अनाकोंडा आढळतात.
(अ) गियाना उच्चभूमी
(ब) ब्राझील उच्चभूमी
(क) अजस्र कडा
(3) पंँटनाल
6/25
प्रश्न ६ वा- वेगळा घटक ओळखा: ब्राझीलमधील वनप्रकार.
(अ) काटेरी झुडपी बने
(ब) सदाहरित वने
(क) हिमालयीन वने
(ड) पानझडी वने
7/25
प्रश्न ७ वा- वेगळा घटक ओळखा: भारताच्या संदर्भात
(अ) खारफुटीची वने
(ब) भूमध्य सागरी वने
(क) काटेरी झुडपी वने
(ड) विषुववृत्तीय वने
8/25
प्रश्न ८ वा- वेगळा घटक ओळखा: ब्राझीलमधील वन्य प्राणी.
(अ) अनाकोंडा
(ब) तामिर
(क) लाल पांडा
(ड) सिंह
9/25
प्रश्न ९ वा- वेगळा घटक ओळखा: भारतीय वनस्पती.
(अ) देवदार
(ब) अंजन
(क) ऑर्किड
(ड) वड
10/25
प्रश्न १० वा- वेगळा घटक ओळखा: हिमालयातील वनांतील वृक्ष.
(अ) पाईन
(ब) पिंपळ
(क) देवदार
(ड) फर
11/25
प्रश्न ११ वा- योग्य जोडी ओळखा
(अ) सदाहरित वने - सुंद्री
(ब) पानझडी वने - पाइन
(क) समुद्राकाठची वने - पाव ब्राझील
(ड) हिमालयीन वने- पिंपळ
(इ) काटेरी व झुडपी वने - खेजडी
12/25
प्रश्न १२ वा- योग्य जोडी ओळखा
(अ) सदाहरित वने - पाव ब्राझील
(ब) पानझडी वने - खेजडी
(क) हिमालयीन वने- पिंपळ
(ड) समुद्राकाठची वने - पाइन
13/25
प्रश्न १३ वा- अयोग्य जोडी ओळखा
(अ) सदाहरित वने - आमर
(ब) पानझडी वने - साग
(क) हिमालयीन वने- पाईन
(ड) समुद्राकाठची वने - सुंद्री
(इ) काटेरी व झुडपी वने - खेजडी
14/25
प्रश्न १४ वा- भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
(अ) हत्ती
(ब) वाघ
(क) मोर
(ड) माळढोक
15/25
प्रश्न १५ वा - ब्राझीलमधील वर्षांवनांना काय संबोधले जाते ?
(अ) जगाची शान
(ब) जगाची फुप्फुसे
(क) जगाचे नाक
(ड) धरतीवरील स्वर्ग
16/25
प्रश्न १६ वा- भारतातील पश्चिम बंगाल हे राज्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ?
(अ) मगर
(ब) हत्ती
(क) वाघ
(ड) गेंडा
17/25
प्रश्न १७ वा- वाघ व सिंह या दोन्ही प्राण्यांचा अधिवास असणारा जगातील एकमेव देश कोणता ?
(अ) ब्राझील
(ब) दक्षिण अफ्रिका
(क) भारत
(ड) श्रीलंका
18/25
प्रश्न १८ वा- ब्राझीलमधील कोणत्या भागात गवताळ प्रदेशातील प्राणी आढळतात ?
(अ) पॅराग्वे पॅराना नदयांच्या खोऱ्यात
(ब) ब्राझीलच्या उच्चभूमीत गवताळ प्रदेशा
(क) फक्त (अ)
(ड) (अ) व (ब)
19/25
प्रश्न १९ वा- योग्य पर्याय निवडा - भारतातील सदाहरित वनांमध्ये आढळणाऱ्या वनस्पती
(अ) महोगनी
(ब) शिसव
(क) रबर
(ड) वरील सर्व
20/25
प्रशअन २० वा- ब्राझीलमधील विविध वनांमध्ये आढळणाऱ्या वनस्पती
(अ) पाव ब्राझील रोझवुड
(ब) रबर ऑर्किड
(क) महोगनी
(ड) वरील सर्व
21/25
प्रश्न २१ वा- भारतातील विविध प्रदेशांत आढळणारे पक्षी
(अ) मोर, खंड्या, कबुतरे
(ब) विविधरंगी पोपट, बदके
(क) बगळे, माळढोक
(ड) वरील सर्व
22/25
प्रश्न २२ वा- हिमालयातील मध्यम उंचीवरील प्रदेशातील वनांत आढळणान्या वनस्पती
(अ) पाईन, देवदार, फर
(ब) वड, पिंपळ, साग
(क) रबर, ऑर्किड, रोझवुड
(ड) वरील सर्व
23/25
प्रश्न २३ वा- योग्य कारण निवडा-ब्राझील देशाचा उत्तर भाग घनदाट अरण्यांनी व्यापला आहे.
(अ) ब्राझील देशाच्या उत्तर भागात ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे २००० मिमी असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे २८° से असते.
(ब) ब्राझील देशाच्या उत्तर भागात सर्वसाधारणपणे वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो..
(क) भागात वनस्पतींची वाढ झपाट्याने होते व वनस्पतींचा जीवनकाळही मोठा असतो. त्यामुळे ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट अरण्यांनी व्यापला आहे.
(ड) वरील सर्व
24/25
प्रश्न २४ वा-योग्य पर्याय निवडा- हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते
(अ) हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते म्हणून
(ब) हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात. म्हणून
(क) अतिथंड हवामान व बर्फाचे थर यांमुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही म्हणून
(ड) वरील सर्व
25/25
प्रश्न २५ वा- भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. याचे कारण
(अ) भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या निवासाच्या व इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. भारतातील वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे.
(ब) भारतात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भारतातील विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
(क) भारतात प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी या समस्या वाढत आहेत. भारतात 'झूम'सारख्या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे.
(ड) वरील सर्व
Result:
@@@@
अ.क्र पाठाचे नाव स्वाध्याय
क्षेत्रभेट पहा
स्थान-विस्तार पहा
प्राकृतिक रचना व जलप्रणाली पहा
हवामान पहा
नैसर्गिक वनस्पती व प्राणी पहा
लोकसंख्या पहा
मानवी वस्ती पहा
अर्थव्यवस्था आणि व्यवसाय पहा
पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन पहा
१० सर्व स्वाध्याय पहा

Post a Comment

0 Comments