Ticker

6/recent/ticker-posts

भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय 10 vi bhugol swadhyay Havaman हवामान

भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय - हवामान

आज आपण भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय  10 vi bhugol swadhyay सोडवणार आहोत. १० वी च्या वर्गातील भूगोल विषयातील पाठाचा स्वाध्याय सर्व प्रश्नासह सोडवणार आहोत. इयत्ता दहावी भूगोल विषयात असलेले सर्व पाठ प्रथम आपण पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू. कोणत्याही परीक्षेत यश मिळवण्यासाठी आपला प्रत्येक पाठावरील स्वाध्याय चांगला असणे आवश्यक असतो. त्यासाठी खालील सर्व प्रश्न सोडवा. 

10 vi bhugol swadhyay- 

इयत्ता १० वी वर्गातील भूगोल विषयातील पाठ पुढील प्रमाणे आहोत. क्षेत्रभेट, स्थान-विस्तार, प्राकृतिक रचना व जलप्रणाली, हवामान, नैसर्गिक वनस्पत  व प्राणी, लोकसंख्या, मानवी वस्ती, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. या पाठांचा SWADHAY स्वाध्याय अभ्यासणार आहोत.

भूगोल-इयत्ता-१०-वी-स्वाध्याय-10-vi-bhugol-swadhyay-Havaman

भूगोल इयत्ता १० वी कृतीपत्रिका- 

अ क्रप्रश्नप्रकारगुणविकल्पासह गुण
०१प्र. १. कोणतेही एक किंवा दोन प्रश्नप्रकार विचारण्यात येतील.) (चार प्रश्नांपैकी चारही सोडवणे.) • अचूक पर्याय निवडा. . • दोन गटांचा विचार करून योग्य पर्याय काढा. • अचूक सहसंबंध ओळख व साखळी बनवा • अचूक पर्यायासमोरील चौकटीत खूप करा. • वाक्यांतील सहसंबंध योग्य पर्यायाने प्रस्थापित करा.०४०४
०२प्र. २. (पुढीलपैकी कोणतेही एक किंवा दोन प्रश्नप्रकार विचारण्यात येतील.) (चार प्रश्नांपैकी चारही सोडवणे.) • योग्य जोड्या जुळवा • चुकीची जोडी. . • साखळी पूर्ण करा • विधानांचा योग्य क्रम लावा • वेगळा घटक ओळखा०४०४
०३प्र. ३. (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) • एका वाक्यात उत्तरे लिहा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • विधानावरून प्रकार ओळखा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • नावे द्या (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • फरक स्पष्ट करा. (तीन प्रश्नांपैकी दोन सोडवणे.) • चूक की बरोबर सांगा व चुकीची विधाने दुरुस्त करा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • वर्गीकरण करा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.)०४०५
०४प्र. ४. (अ) (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) • नकाशात माहिती भरा व सूची तयार करा. (सहापैकी कोणतीही चार नावे भरणे.). • माहितीच्या आधारे नकाशा तयार करा.०४०६
०५प्र. ४. (आ) नकाशावाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (सहा प्रश्नांपैकी कोणतेही चार सोडवणे)०४०६
०६प्रश्न ५. भौगोलिक कारणे लिहा. (चार प्रश्नांपैकी कोणत्याही दोन विधानांची कारणे लिहिणे.)०६१२
०७प्रश्न ६ (अ) आकृती काढा (दोनपैकी एक आकृती काढणे ) • दिलेल्या आकृतीत नावे भरा/भूरूपे ओळखा . किंवा प्रश्न ६ (आ) आलेख वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (सहा प्रश्नांपैकी कोणतेही तीन सोडवणे.) दिलेल्या सांख्यिकी माहितीच्या आधारे आलेख काढा. [(अ) व (आ) पैकी कोणताही ११ प्रश्नप्रकार विचारला जाईल.]०६१२
०८प्र. ७. (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) (चार प्रश्नांपैकी कोणतेही दोन सोडवणे.) • सविस्तर उत्तरे लिहा. • थोडक्यात उत्तरे लिहा. • स्पष्ट करा.०८१६
०९एकूण४०६५
@

भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय -हवामान

10 vi bhugol swadhyay
1/20
प्रश्न १ ला - ब्राझीलच्या ------ प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
(अ) गियाना उच्चभूमीच्या प्रदेशात
(ब) अजस्र कड्याच्या वाऱ्याकडील बाजूच्या प्रदेशात
(क) अमेझॉन नदीच्या खोऱ्यात
(ड) पॅराग्वे पॅराना खोऱ्यांत
2/20
प्रश्न २ रा - भारतातील ------- येथे ११,००० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो.
(अ) मुंबई
(ब) दिल्ली
(क) चेन्नई
(ड) मौसिनराम
3/20
प्रश्न ३ रा- भारतातील ------ या शहरात नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडतो.
(अ) मुंबई
(ब) दिल्ली
(क) चेन्नई
(ड) कोलकाता
4/20
प्रश्न ४ था- पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. ब्राझील देश विषुववृत्तावर आहे. याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.
(अ) योग्य
(ब) अयोग्य
(क) काही प्रमाणात अयोग्य
(ड) सांगता येत नाही
5/20
प्रश्न ५ वा- ब्राझील व भारत या दोनही देशांत एका वेळी समान ऋतू असतात.
(अ) योग्य
(ब) अयोग्य
(क) काही प्रमाणात योग्य
(ड) सांगता येत नाही
Explanation: दुरुस्त विधान ब्राझील व भारत या दोनही देशांत एका वेळी समान ऋतू असू शकत नाहीत.
6/20
प्रश्न ६ वा- भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात.
(अ) योग्य
(ब) अयोग्य
(क) काही प्रमाणात अयोग्य
(ड) सांगता येत नाही
7/20
प्रश्न ७ वा- ब्राझील देशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.
(अ) योग्य
(ब) अयोग्य
(क) काही प्रमाणात योग्य
(ड) सांगता येत नाही
Explanation: दुरुस्त विधान : ब्राझील देशात आग्नेय व ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.
8/20
प्रश्न ८ वा - मुंबई शहरात मे महिन्यात सरासरी कमाल तापमान १५ °से असते.
(अ) योग्य
(ब) अयोग्य
(क) काही प्रमाणात योग्य
(ड) सांगता येत नाही
Explanation: दुरुस्त विधान शहरात मे महिन्यात सरासरी कमाल तापमान सुमारे ३४° से असते
9/20
प्रश्न ९ वा- चुकीचा पर्याय निवडा . जास्त पावसाचे प्रदेश.
(अ) पश्चिम घाट
(ब) पूर्व हिमालय
(क) गोवा
(ड) सांता
Explanation: सांता - ब्राझील मधील मध्यम पावसाचा प्रदेश
10/20
प्रश्न १० वा - चुकीचा पर्याय निवडा .मध्यम पावसाचे प्रदेश.
(अ) पोरोइमा
(ब) सांता
(क) गुजरात
(ड) पश्चिम बंगाल
Explanation: (क) गुजरात - भारतातील कमी पावसाचा प्रदेश
11/20
प्रश्न ११ वा- चुकीचा पर्याय निवडा .कमी पावसाचे प्रदेश.
(अ) बिहार
(ब) राज्सथान
(क) टेकॅन्टीस
(ड) पूर्व महाराष्ट्र
Explanation: (ड) पूर्व महाराष्ट्र - हा जास्त पावसाचा प्रदेश आहे.
12/20
प्रश्न १२ वा- ब्राझीलमध्ये मकरवृत्ताच्या दक्षिणेस कोणत्या प्रकारचे हवामान आढळते?
(अ) दमट हवामान
(ब) कोरडे हवामान
(क) समशीतोष्ण हवामान
(ड) थंड हवामान
13/20
प्रश्न १३ वा- ब्राझीलच्या कोणत्या भागात तुलनेने सम हवामान आढळते?
(अ) ब्राझीलच्या उत्तर किनारी भागात
(ब) ब्राझीलच्या दक्षिण किनारी भागात
(क) ब्राझीलच्या पूर्व किनारी भागात
(ड) ब्राझीलच्या पश्चिम किनारी भागात
14/20
प्रश्न १४ वा- ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे किती मिमी पाऊस पडतो ?
(अ) ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे २०० मिमी पाऊस पडतो.
(ब) ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे २००० मिमी पाऊस पडतो.
(क) ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे १००० मिमी पाऊस पडतो.
(ड) ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे २०००० मिमी पाऊस पडतो.
15/20
प्रश्न १५ वा- हिमालयाच्या क्षेत्रात कोणत्या स्वरूपाचा पाऊस पडतो ?
(अ) हिमालयाच्या क्षेत्रात मोसमी पाऊस पडतो.
(ब) हिमालयाच्या क्षेत्रात वादळी स्वरूपाचा पाऊस पडतो.
(क) हिमालयाच्या क्षेत्रात प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडतो.
(ड) वरील सर्व
16/20
प्रश्न १६ वा- योग्य कारण निवडा - ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो.
(अ) दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात.
(ब) ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत जातात. अधिक उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडते.
(क) ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडते; परंतु, विरुद्ध बाजूस पोहोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी होते
(ड) वरील सर्व कारणे योग्य.
17/20
प्रश्न १७ वा - योग्य कारण निवडा - ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही
(अ) शीत कटिबंधातील देशांत ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते
(ब) ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून, ते उष्ण कटिबंधात आहे.
(क) ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.
(ड) वरील सर्व कारणे योग्य.
18/20
प्रश्न १८ वा- योग्य कारण निवडा -भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो
(अ) विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे अभिसरण पर्जन्यास पोषक स्थिती तयार होते
(ब) अभिसरण पाऊस प्रामुख्याने विषुववृत्तीय भूभागांवर पडतो.
(क) उंचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून अभिसरण पाऊस पडतो. भारत देशाचे स्थान विषुववृत्ताजवळ नाही
(ड) वरील सर्व कारणे योग्य.
19/20
प्रश्न १९ वा- दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल
(अ) भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होते
(ब) दक्षिणेकडील द्वीपकल्पीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान से ते ३०° से असते.
(क) भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानातही घट होत जाते.
(ड) वरील सर्व
20/20
प्रश्न २० वा- भारत व ब्राझील या देशांमधील हवामानातील फरकातील योग्य विधान निवडा.
(अ) भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. याउलट, ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते.
(ब) भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. याउलट, ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
(क) भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. याउलट, ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते.
(ड) वरीस सर्व
Result:
@@@@@@
अ.क्र पाठाचे नाव स्वाध्याय
क्षेत्रभेट पहा
स्थान-विस्तार पहा
प्राकृतिक रचना व जलप्रणाली पहा
हवामान पहा
नैसर्गिक वनस्पती व प्राणी पहा
लोकसंख्या पहा
मानवी वस्ती पहा
अर्थव्यवस्था आणि व्यवसाय पहा
पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन पहा
१० सर्व स्वाध्याय पहा

Post a Comment

0 Comments