Ticker

6/recent/ticker-posts

Maraṭhi vyakaran Mhani मराठी व्याकरण म्हणी म्हणी व त्याचे अर्थ भाग १

मराठी व्याकरण Maraṭhi vyakaran म्हणी Mhani म्हणी व त्याचे अर्थ 


Marathi Mhani -

                            मराठी भाषेमध्ये म्हणीला अतिशय महत्व असते. आपले बोलणे अधिक प्रभावी व आकर्षक करण्यासाठी वाक्यात म्हणीचा वापर केला जातो. कमी शब्दात अधिक अर्थ सांगण्यासाठी बोलताना Marathi Mhani मराठी म्हणीचा  वापर केला जातो. म्हणी हा एक प्रकारचा शब्दसमुह असतो. त्यातील शब्दांपासून नेहमीच्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. म्हणींमध्ये एक प्रकारची लयबद्धता असल्यामुळे भाषेला सौदर्य प्राप्त होते. म्हणीमुळे एखाद्या घटनेला अधिक स्पष्टता प्राप्त होते. 
    मराठी भाषेमध्ये नेहमी वापरल्या जाणाऱ्या व वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये सतत विचारल्या जाणाऱ्य़ा कांही महत्वाच्या म्हणीं आपण प्रथम आभ्यासू त्यानंतर त्या घटकावर परीक्षेमध्ये कश्या प्रकारचा प्रश्न विचारला जातो. ते पाहू या. 
मराठी म्हणींवरील प्रश्न Marathi Mhani -
                            साधारणपणे म्हणीवर खालीलप्रकारचे प्रश्न विचारलेले असतात.

अ) खालील म्हण पूर्ण करा.
आ) म्हणींचा अर्थ ओळखा.
इ) म्हणीचा वाक्यात उपयोग करा.
ई) मराठी म्हण ओळखा.
उ) म्हणींची समानार्थी म्हण ओळखा.
ऊ) अर्थ देऊनन त्या अर्थाची म्हण ओळखा.

    या व यासारखे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले असतात. प्रथम आपण महत्वाच्या व सतत परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या कांही मराठी म्हणी Marathi Mhani  वत्याचे अर्थ पाहू या.
1) अतिथे तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारक ठरतो.
२) अति शहाणा त्याचा बैल रिकामा - जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो. त्याचे  काम होत नाही
 ३)  अडला हरी गाढवाचे पाय धरी - एखादया बुदधिमानसज्जन माणसाला देखील कठिण वेळी मुर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
 4) अन्नछत्री जेवणेवर मिरपूड मागणे - दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायचीयाशिवाय आणखी मागून मिजास मिरवणे.
 5) असतील शिते तर जमतील भुते - एखादया माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसाची गर्दी गोळा होते.
6) असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ-  दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जिवाला धोकाही निर्माण होतो.
7) आधी पोटोबा मग विठोबा-प्रथम पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा.
आपलेच दातआपलेच ओठ - आपल्याच माणसाने चूक केल्यामुळे अडवणीची स्थिती निर्माण होणे.
 9) आपण हसे लोकालाशेंबूड आपल्या नाकाला-  ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्यांना हसतो तोच दोष आपल्या अगी असणे.
10) आयत्या बिळावर नागोबा- एखादयाने स्वतःकरता केलेल्या गोष्टीचा दुसऱ्याने आयता फायदा घेण्याची वृत्ती
11) आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास-मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे
12) आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
13) आंधळं दळतं. कुत्रं पीठ खातं - एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.
14) आंधळ्या बहिन्याशी गाठ - एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे
15) इकडे आड तिकडे विहीर-  दोन्ही बाजूंनी सारखीव अडचणीची स्थिती निर्माण होणे
16) उचलली जीभ लावली टाळघाला - दुष्परिणामांचा विचार न करता बोलणे.
17) उंदराला मांजर साक्ष- ज्याचा एखाद्या गोष्टीत हिताचा संबंध आहे. त्याला त्या गोष्टीबद्दल विचारणे
 किंवा एखादे वाईट कृत्य करीत असताना एकमेकांना दुजोरा देणे,
18) उथळ पाण्याला खळखळाट फार-  अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो.
19) उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग - अतिशय उतावळेपणाने वर्तन करणे.
20) उठता लाथ बसता बुक्की - प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन पुन्हा शिक्षा करने
21) ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये-  कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
22) एका हाताने टाळी वाजत नाही-  दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा कृत्यात दोघेही दोषी असणे
23) एक ना धड भाराभर चिंध्या - एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था
24) एका माळेचे मणी - सगळीच माणसे सारख्या स्वभावाची.
25) ओळखीचा चोर जिवे न सोडी - ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो.
२६)  अंगापेक्षा बोंगा मोठा-  मूळ गोष्टीपेक्षा तिच्या आनुषंगिक गोष्टीचा बडेजाव मोठा असणे.
27) कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच-  मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही.
२६) लोका सांगे ब्रह्मज्ञानआपण मात्र कोरडे पाषाण-  लोकांना उपदेश करायचापण स्वतः मात्र त्याप्रमाण वागायचे नाही.
२७) लंकेत सोन्याच्या विटा - दुसरीकडे लांबवर असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला फायदा नसतो
 २८) लाज नाही मनाकोणी काही म्हणा-  निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करीत नाही.
२९) वरातीमागून घोडे -  एखादी गोष्ट घडल्यावर त्याबाबत उपाय करणे व्यर्थ असते,
 ३०) वासरांत लंगडी गाय शहाणी-  मूर्ख माणसांत अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो.
 ३१) विंचवाचे बिन्हाड पाठीवर-  गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे,
३२) शहाण्याला शब्दांचा मार - शहाण्या माणसाला समजावून सांगितल्यास तो ताळ्यावर येतो.
 ३३) शितावरून भाताची परीक्षा -  वस्तूच्या लहानशा भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे.
 ३४) साखरेचे खाणार त्याला देव देणार-  भाग्यवान माणसाला कशाचीही उणीव पडत नाही.
 ३५) सुंभ जळाला तरी पीळ जात नाही-  हट्टी मनुष्याचे हट्टामुळे नुकसान झालेतरी त्याचा हट्ट नाहीसा होत नाही.
 ३६) सगळे मुसळ केरात - मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सर्व श्रम व्यर्थ जाने
३७) हातच्या कंकणाला आरसा कशाला- स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको.
  ३८) हलवायाच्या घरावर तुळशीपत्र - परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे किंवा  स्वतःला झीज लागू न देणे.
३९) हत्ती गेलाशेपूट राहिले - कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडा शिल्लक राहिला.
४०) चोर सोडून संन्याशाला फाशी - खऱ्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.
 ४१) चोराच्या मनात चांदणे - वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की कायअशी सारखी भीती वाटत असते.
 ४२)  चोराच्या हातची लंगोटी- ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसतेत्याच्याकडून थोडेसे तरी मिळणे.
 ४३) चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे- प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच.
४४)  बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले- बोलण्याप्रमाणे कृती करणाऱ्या माणसाला सन्मानाने वागवावे.
 ४५) बुडत्याला काडीचा आधार-  घोर संकटाच्या प्रसंगी मिळालेली थोडीशी मदतदेखील महत्त्वाची वाटते
 ४६) बोलेल तो करेल काय? - केवळ बडबड करणान्याकडून काहीही होऊ शकत नाही.
४७) कोल्हा काकडीला राजी-  शुद्ध माणसे क्षुद्र गोष्टीने खूष होतात.
 ४८) कामापुरता मामा- आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे.
 ४९) कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही- बुद्ध माणसांनी केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नाही
 ५०) फुजी तशी पुडी - देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे.
 ५१) खायला काळ भुईला भार -  निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो. (99) खाण तशी माती- आईवडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे.
 ५२) खाई त्याला खवखवे- जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.

 

नमुना प्रश्न- 

    वेगवेगळ्या परीक्षेत खालिल प्रकारचे एक किंंवा दोन प्रश्न विचारलेले असतात.

प्रश्न १ ला - ‘खाई त्याला खवखवे’ या म्हणीचा अर्थ निवडा ?

१)  झाला तर फायदा नाही तर तोटा

२) खूप खावेसे वाटणे

३) बाह्यस्वरूप एक अन् कृती दूसरीच

४) वाईट काम केले असेल तर ते सतत मनात सलते

उत्तर – पर्याय ४

प्रश्न २ राअपूर्ण म्हण पूर्ण करा.

---- वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.

            १) घंटा

            २) गाजराची पुंगी

            ३) शिट्टी

            ४) जादुई बासरी

उत्तर – पर्याय २

प्रश्न ३ रा- ‘ज्या वस्तूवर आपला मुळीच हक्क नाही ती वस्तू अल्प प्रमाणात मिळाल्यावर खुश होणे या अर्थाची म्हण कोणी?

           

            १जशी देणावळ तशी धुणावळ

            २) अति राग भीक माग

            ३) झाकली मूठ सव्वा लाखाची

            ४) कोल्हा काकडीला राजी

उत्तर – पर्याय 4

प्रश्न ४ थानमनाला घडाभर तेल’ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता?

            १) एखाद्या कामाच्या आरंभालाच जादा खर्च होणे

            २) बाह्यरूप एक आणि कृती दुसरीच

            ३) रोग एकीकडेउपाय दुसरीकडे

            ४) चांगल्या कामाची सुरवात पूजेने करणे.

उत्तर – पर्याय 1

प्रश्न ५ वाजी गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही त्यामध्ये दोष दाखवणे.

            वरील अर्थ अणारी म्हण ओळखा.

            १) कोल्हा काकडीला राजी

            २) नचता येईना अंगण वाकडे

            ३) कोल्ह्याला द्राक्ष आंबट

            ४) खाई त्याला खवखवे

उत्तर – पर्याय 3

प्रश्न ६ वाचोराच्या मनात चांदणे’ या म्हणीचा जो अर्थ आहेत्याच अर्थाची म्हण पर्यायातून शोधा.

    १) चोर सोडून संन्याशाला फाशी

     ) खाई त्याला खवखवे

    ३) आंधळे दळते अन्  कुत्रे पीठ खाते

    ४) वाईट कृत्य केल्यानंतर मनात भिती वाटते

उत्तर – पर्याय 2


अगदी याच प्रकारचे प्रश्न शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले असतात. आपणास जितक्या अधिक म्हणीं वाचन करता येईल तेवढे करावे. अधिक सराव करून आपण हा घटक सहज सोडवू शकता. अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ नक्की पहा.

    

मार्गदर्शक व्हिडिओ-


आपणास कांही म्हणी माहिती असतील तर मला कमेंट करून आवश्य कळवा.

Post a Comment

0 Comments