Ticker

6/recent/ticker-posts

भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय 10 vi bhugol swadhyay sthan v vistar स्थान-विस्तार

भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय -स्थान-विस्तार

आज आपण भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय  10 vi bhugol swadhyay सोडवणार आहोत. १० वी च्या वर्गातील भूगोल विषयातील पाठाचा स्वाध्याय सर्व प्रश्नासह सोडवणार आहोत. इयत्ता दहावी भूगोल विषयात असलेले सर्व पाठ प्रथम आफण पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू. कोणत्याही परीक्षेत यश मिळवण्यासाठी आपला प्रत्येक पाठावरील स्वाध्याय चांगला असणे आवश्यक असतो. त्यासाठी खालील सर्व प्रश्न सोडवा. 

10 vi bhugol swadhyay- 

इयत्ता १० वी वर्गातील भूगोल विषयातील पाठ पुढील प्रमाणे आहोत. क्षेत्रभेट, स्थान-विस्तार, प्राकृतिक रचना व जलप्रणाली, हवामान, नैसर्गिक वनस्पत  व प्राणी, लोकसंख्या, मानवी वस्ती, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. या पाठांचा SWADHAY स्वाध्याय अभ्यासणार आहोत.

भूगोल-इयत्ता-१०-वी-स्वाध्याय-10-vi-bhugol-swadhyay-sthan-v-vistar

भूगोल इयत्ता १० वी कृतीपत्रिका- 

अ क्रप्रश्नप्रकारगुणविकल्पासह गुण
०१प्र. १. कोणतेही एक किंवा दोन प्रश्नप्रकार विचारण्यात येतील.) (चार प्रश्नांपैकी चारही सोडवणे.) • अचूक पर्याय निवडा. . • दोन गटांचा विचार करून योग्य पर्याय काढा. • अचूक सहसंबंध ओळख व साखळी बनवा • अचूक पर्यायासमोरील चौकटीत खूप करा. • वाक्यांतील सहसंबंध योग्य पर्यायाने प्रस्थापित करा.०४०४
०२प्र. २. (पुढीलपैकी कोणतेही एक किंवा दोन प्रश्नप्रकार विचारण्यात येतील.) (चार प्रश्नांपैकी चारही सोडवणे.) • योग्य जोड्या जुळवा • चुकीची जोडी. . • साखळी पूर्ण करा • विधानांचा योग्य क्रम लावा • वेगळा घटक ओळखा०४०४
०३प्र. ३. (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) • एका वाक्यात उत्तरे लिहा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • विधानावरून प्रकार ओळखा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • नावे द्या (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • फरक स्पष्ट करा. (तीन प्रश्नांपैकी दोन सोडवणे.) • चूक की बरोबर सांगा व चुकीची विधाने दुरुस्त करा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • वर्गीकरण करा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.)०४०५
०४प्र. ४. (अ) (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) • नकाशात माहिती भरा व सूची तयार करा. (सहापैकी कोणतीही चार नावे भरणे.). • माहितीच्या आधारे नकाशा तयार करा.०४०६
०५प्र. ४. (आ) नकाशावाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (सहा प्रश्नांपैकी कोणतेही चार सोडवणे)०४०६
०६प्रश्न ५. भौगोलिक कारणे लिहा. (चार प्रश्नांपैकी कोणत्याही दोन विधानांची कारणे लिहिणे.)०६१२
०७प्रश्न ६ (अ) आकृती काढा (दोनपैकी एक आकृती काढणे ) • दिलेल्या आकृतीत नावे भरा/भूरूपे ओळखा . किंवा प्रश्न ६ (आ) आलेख वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (सहा प्रश्नांपैकी कोणतेही तीन सोडवणे.) दिलेल्या सांख्यिकी माहितीच्या आधारे आलेख काढा. [(अ) व (आ) पैकी कोणताही ११ प्रश्नप्रकार विचारला जाईल.]०६१२
०८प्र. ७. (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) (चार प्रश्नांपैकी कोणतेही दोन सोडवणे.) • सविस्तर उत्तरे लिहा. • थोडक्यात उत्तरे लिहा. • स्पष्ट करा.०८१६
०९एकूण४०६५
@

भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय -स्थान व विस्तार

10 vi bhugol swadhyay

1/25
प्रश्न १ ला - भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक -------- नावाने ओळखले जाते.
(१) लक्षद्वीप
(२) कन्याकुमारी
(३) इंदिरा पॉइंट
(४) पोर्ट ब्लेअर
2/25
प्रश्न २ रा- भारत व ब्राझील या दोन्ही देशांतील राजवट -------- प्रकाराची आहे.
(१) लष्करी
(२) साम्यवादी
(३) प्रजासत्ताक
(४) अध्यक्षीय
3/25
प्रश्न ३ रा- दक्षिण अमेरिका खंडातील ------------ हे दोन देश ब्राझीलच्या सीमे लगत नाहीत.
(१) चिली - इक्वेडोर
(२) अर्जेंटिना- बोलिव्हिया
(३) कोलंबिया - फ्रेंच गियाना
(४) सुरीनाम - उरुग्वे
4/25
प्रश्न ४ था- भारताची जास्तीत जास्त भू-सीमा ------- या देशाशी संलग्न आहे.
(१) बांग्लादेश
(२) पाकिस्तान
(३) चीन
(४) नेपाळ
5/25
प्रश्न ५ वा - -------- ही भारताची राजधानी आहे.
(१) यानम
(२) नवी दिल्ली
(३) दीव
(४) चंदीगढ
6/25
प्रश्न ६ वा- ---------- ही ब्राझीलची राजधानी आहे.
(१) वाहिया
(२) ब्राझीलिया
(३) रोन्डोनिया
(४) रोराईमा
7/25
प्रश्न ७ वा - खालीलपैकी अचूक विधानाची निवड करा.
(१) १९३० पासून १९८५ पर्यंत ब्राझीलमध्ये लष्करी राजवट होती व ती लोकप्रिय होती.
(२) जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझील देशाकडे पाहिले जाते.
(३) ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते; तर दक्षिण भागातून मकरवृत्त जाते.
(४) वरील सर्व
8/25
प्रश्न ८ वा- खालीलपैकी अचूक विधानाची निवड करा.
(१) भारत सुमारे दीड शतके ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली.
(२) भारत हा विकसनशील देश असून एक प्रमुख बाजारपेठ म्हणून भारताची ओळख आहे.
(३) भारतात स्वातंत्र्योत्तर काळात विविध टप्प्यांवर आर्थिक सुधारणा करण्यात आल्या. परिणामी भारताच्या आर्थिक विकासास वेग आला आहे
(४) वरील सर्व
9/25
प्रश्न ९ वा- ब्राझील देशाचा स्वातंत्र्यदिन ---------
(१) ७ सप्टेंबर १८२२.
(२) ७ सप्टेंबर १८२३.
(३) ७ सप्टेंबर १८२४.
(४) ७ सप्टेंबर १८२१
10/25
प्रश्न १० वा- --------- पर्यंत ब्राझीलमध्ये लष्करी राजवट होती व ती लोकप्रिय होती.
(१) १९३१ पासून १९८५
(२) १९३० पासून १९८५
(३) १९३० पासून १९८६
(४) १९२० पासून १९७५
11/25
प्रश्न ११ वा - ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे.
(१) योग्य
(२) अयोग्य
(३) काही प्रमाणात योग्य
(४) सांगता येत नाही
Explanation: दुरुस्त विधान : ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे.
12/25
प्रश्न १२ वा - ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.
(१) योग्य
(२) अयोग्य
(३) काही प्रमाणात अयोग्य
(४) सांगता येत नाही
13/25
प्रश्न १३ वा- ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे
(१) योग्य
(२) अयोग्य
(३) काही प्रमाणात योग्य
(४) सांगता येत नाही
Explanation: दुरुस्त विधान ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे.
14/25
प्रश्न १४ वा- भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.
(१) योग्य
(२) अयोग्य
(३) काही प्रमाणात योग्य
(४) सांगता येत नाही
Explanation: दुरुस्त विधान भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.
15/25
प्रश्न १५ वा- भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात.
(१) योग्य
(२) अयोग्य
(३) काही प्रमाणात अयोग्य
(४) सांगता येत नाही
16/25
प्रश्न १६ वा- खालीलपैकी योग्य विधानाची निवड करा.
(१) भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.
(२) ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे
(३) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे.
(४) ब्राझील हा देश प्रमुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.
17/25
प्रश्न १७ वा- खालीलपैकी अयोग्य विधान निवडा.
(१) ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.
(२) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे.
(३) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे.
(४) भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात.
18/25
प्रश्न १८ वा- गोलार्धाचा विचार करता भारत पुढील पर्यायांपैकी कोणत्या गोलार्धात आहे?
(१) भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे.
(२) भारताचे स्थान पूर्णपणे दक्षिण गोलार्धात आहे.
(३) भारताचे स्थान पूर्णपणे पश्चिम गोलार्धात आहे.
(४) भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे.
19/25
प्रश्न १९ वा- ब्राझीलचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे?
(१) ब्राझीलचे स्थान उत्तर गोलार्धातआहे.
(२) ब्राझीलचे स्थान पश्चिम गोलार्धात आहे.
(३) ब्राझीलचे स्थान दक्षिण गोलार्धात आहे.
(४) ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे.
20/25
प्रश्न २० वा- भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत ?
(१) भारतात एकूण ६ केंद्रशासित प्रदेश आहेत.
(२) भारतात एकूण ७ केंद्रशासित प्रदेश आहेत.
(३) भारतात एकूण ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.
(४) भारतात एकूण ३६ केंद्रशासित प्रदेश आहेत.
21/25
प्रश्न २१ वा- भारताकडे एक तरुण देश' म्हणून पाहिले जाते. कारण-
(१) भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे (तरुणाईचे) प्रमाण तुलनेने अधिक आहे.
(२) भारताच्या एकूण लोकसंख्येतील सुमारे ५१ टक्के लोकसंख्या ही कार्यशील आहे.
(३) भारतातील लोकसंख्येत अकार्यशील (ज्येष्ठ नागरिक व बालक) गटातील लोकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे
(४) वरील सर्व
22/25
प्रश्न २२ वा- ब्राझील देशास 'जगाचा कॉफी पॉट' असे संबोधले जाते.
(१) कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो.
(२) जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते.
(३) ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते.
(४) वरील सर्व
23/25
प्रश्न २३ वा- स्वातंत्र्योत्तर काळात भारत या देशांना कोणत्या समस्यांना तोंड दयावे लागले ?
(१) भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले.
(२) लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले.
(३) विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा मंद वेग
(४) वरील सर्व
24/25
प्रश्न २४ वा- भारताच्या एकूण लोकसंख्येतील सुमारे ---- टक्के लोकसंख्या ही कार्यशील आहे.
(१) ३३
(२) ५१
(३) ७५
(४) १००
25/25
प्रश्न २५ वा- जागतिक लोकसंख्येतील भारताचा क्रमांक किती आहे?
(१) पहिला
(२) दुसरा
(३) तिसरा
(४) सातवा
Result:
@ @@@
अ.क्र पाठाचे नाव स्वाध्याय
क्षेत्रभेट पहा
स्थान-विस्तार पहा
प्राकृतिक रचना व जलप्रणाली पहा
हवामान पहा
नैसर्गिक वनस्पती व प्राणी पहा
लोकसंख्या पहा
मानवी वस्ती पहा
अर्थव्यवस्था आणि व्यवसाय पहा
पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन पहा
१० सर्व स्वाध्याय पहा

Post a Comment

0 Comments