इयत्ता दहावी राज्यशास्त्र स्वाध्याय राजकीय पक्ष
इयत्ता दहावी राज्यशास्त्र स्वाध्याय आज आपण राजकीय पक्ष या पीठावरील स्वाध्याय आभ्यासणार आहोत. इयत्ता दहावीच्या इतिहास व राज्यशास्त्र पुस्तकात राज्यशास्त्र या विषयात एकूण पाच पाठ देण्यात आलेले आहेत. इयत्ता १० वी राज्यशास्त्र पुस्तकातील सर्वप्रथम पाठ पाहू या. पाठ १ संविधानाची वाटचाल, पाठ २ रा निवडणूक प्रक्रिया, पाठ ३ रा राजकीय पक्ष पाठ ४ था सामाजिक व राजकीय चळवळी, पाठ ५ वा भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने. आपण सर्वपाठावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत.
iyatta dahavi rajyashastra swadhyay-
कोणत्या विषयाची तयारीसाठी SWADHAY खूप म्हत्वाचा असतो. पाठावरील सर्व प्रश्न सोडवणे व अभ्यायणे म्हत्वाचे असते. बोर्ड परीक्षेत जास्त प्रमाणात हेच प्रश्न विचारलेले असतात. तेव्हा इयत्ता दहावी राज्यशास्त्र स्वाध्याय चा अभ्यास करणे व तो सोडवणे गरजेचे असते. iyatta dahavi rajyashastra swadhyay सोडवून या विषयातील सर्व गुण सहज प्राप्त करू शकता तेव्हा या विषयातील स्वाध्याय आपण सोडवू या.
![]() |
राज्यशास्त्र कृतीपत्रिका -
प्रश्न क्र. | प्रश्नप्रकार | गुण | विकल्पासह गुण |
---|---|---|---|
प्र. ६. | दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय लिहा. (दिलेल्या ४ पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहिणे. यात प्रत्येकी १ गुणाचे ४ उपप्रश्न असतील.) | ४ | ४ |
प्र. ७ | पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (दिलेली विधाने चूक की बरोबर हे लिहून चूक विधान व बरोबर विधान या दोन्हींसाठी स्पष्टीकरण आवश्यक आहे. चूक की बरोबर यास १ गुण व स्पष्टीकरणाला १ गुण ३ विधानांपैकी कोणतीही दोन विधाने सोडवणे अपेक्षित आहे.) | ४ | ६ |
प्र. ८ (अ) | पुढील संकल्पना स्पष्ट करा. (यात दिलेल्या ३ संकल्पनांपैकी कोणत्याही दोन संकल्पना स्पष्ट करणे अपेक्षित आहे.) | ४ | ६ |
प्र. ८. (ब) | दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. ( या प्रश्नप्रकारात 'तक्ता पूर्ण करा', 'कालरेषा पूर्ण करा', 'पायऱ्या लिहा', 'ओघतक्ता पूर्ण करा', 'संकल्पनाचित्र पूर्ण करा' असे प्रश्नप्रकार असतील. दिलेल्या ३ उपप्रश्नांपैकी २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.) | ४ | ६ |
प्र. ९. | पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. ( या प्रश्नप्रकारात चारपैकी दोन प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.) | ४ | ८ |
एकूण | २० | ३० |
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना ....... म्हटले जाते.
(अ) सरकार
(ब) समाज
(क) राजकीय पक्ष
(ड) सामाजिक संस्था
(२) नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष ...... येथे आहे.
(अ) ओडिशा
(ब) आसाम
(क) बिहार
(ड) जम्मू आणि काश्मीर
(३) जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर ........... या राजकीय पक्षात झाले.
(अ) आसाम गण परिषद
(ब) शिवसेना
(क) द्रविड मुनेत्र कळघम
(ड) जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
(१) राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.
(२) राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात.
(३) आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.
(४) ‘शिरोमणी अकाली दल’ हा राष्ट्रीय पक्ष आहे.
३. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) प्रादेशिकता
(२) राष्ट्रीय पक्ष
४. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
(२) भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात काय बदल झाला आहे?
राज्यशास्त्र स्वाध्याय राजकीय पक्ष -
@@@@
0 Comments