Ticker

6/recent/ticker-posts

भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय 10 vi bhugol swadhyay shetrabhet क्षेत्रभेट

भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय -क्षेत्रभेट 

आज आपण भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय  10 vi bhugol swadhyay सोडवणार आहोत. १० वी च्या वर्गातील भूगोल विषयातील पाठाचा स्वाध्याय सर्व प्रश्नासह सोडवणार आहोत. इयत्ता दहावी भूगोल विषयात असलेले सर्व पाठ प्रथम आपण पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू. कोणत्याही परीक्षेत यश मिळवण्यासाठी आपला प्रत्येक पाठावरील स्वाध्याय चांगला असणे आवश्यक असतो. त्यासाठी खालील सर्व प्रश्न सोडवा. 

10 vi bhugol swadhyay- 

इयत्ता १० वी वर्गातील भूगोल विषयातील पाठ पुढील प्रमाणे आहोत. क्षेत्रभेट, स्थान-विस्तार, प्राकृतिक रचना व जलप्रणाली, हवामान, नैसर्गिक वनस्पती  व प्राणी, लोकसंख्या, मानवी वस्ती, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. या पाठांचा SWADHAY स्वाध्याय अभ्यासणार आहोत.

भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय -क्षेत्रभेट

भूगोल इयत्ता १० वी कृतीपत्रिका- 

अ क्र प्रश्नप्रकार गुण विकल्पासह गुण
०१ प्र. १. कोणतेही एक किंवा दोन प्रश्नप्रकार विचारण्यात येतील.) (चार प्रश्नांपैकी चारही सोडवणे.) • अचूक पर्याय निवडा. . • दोन गटांचा विचार करून योग्य पर्याय काढा. • अचूक सहसंबंध ओळख व साखळी बनवा • अचूक पर्यायासमोरील चौकटीत खूप करा. • वाक्यांतील सहसंबंध योग्य पर्यायाने प्रस्थापित करा. ०४ ०४
०२ प्र. २. (पुढीलपैकी कोणतेही एक किंवा दोन प्रश्नप्रकार विचारण्यात येतील.) (चार प्रश्नांपैकी चारही सोडवणे.) • योग्य जोड्या जुळवा • चुकीची जोडी. . • साखळी पूर्ण करा • विधानांचा योग्य क्रम लावा • वेगळा घटक ओळखा ०४ ०४
०३ प्र. ३. (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) • एका वाक्यात उत्तरे लिहा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • विधानावरून प्रकार ओळखा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • नावे द्या (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • फरक स्पष्ट करा. (तीन प्रश्नांपैकी दोन सोडवणे.) • चूक की बरोबर सांगा व चुकीची विधाने दुरुस्त करा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • वर्गीकरण करा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) ०४ ०५
०४ प्र. ४. (अ) (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) • नकाशात माहिती भरा व सूची तयार करा. (सहापैकी कोणतीही चार नावे भरणे.). • माहितीच्या आधारे नकाशा तयार करा. ०४ ०६
०५ प्र. ४. (आ) नकाशावाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (सहा प्रश्नांपैकी कोणतेही चार सोडवणे) ०४ ०६
०६ प्रश्न ५. भौगोलिक कारणे लिहा. (चार प्रश्नांपैकी कोणत्याही दोन विधानांची कारणे लिहिणे.) ०६ १२
०७ प्रश्न ६ (अ) आकृती काढा (दोनपैकी एक आकृती काढणे ) • दिलेल्या आकृतीत नावे भरा/भूरूपे ओळखा . किंवा प्रश्न ६ (आ) आलेख वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (सहा प्रश्नांपैकी कोणतेही तीन सोडवणे.) दिलेल्या सांख्यिकी माहितीच्या आधारे आलेख काढा. [(अ) व (आ) पैकी कोणताही ११ प्रश्नप्रकार विचारला जाईल.] ०६ १२
०८ प्र. ७. (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) (चार प्रश्नांपैकी कोणतेही दोन सोडवणे.) • सविस्तर उत्तरे लिहा. • थोडक्यात उत्तरे लिहा. • स्पष्ट करा. ०८ १६
०९ एकूण ४० ६५
@

भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय -क्षेत्रभेट

10 vi bhugol swadhyay

1/20
प्रश्न १ ला- क्षेत्रभेट ही भूगोल या विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यासपद्धती आहे. या अभ्यासपद्धतीची माहितीचे महत्व खालीलपैकी कोणते ?
(१) क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.
(२) क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यांतील सहसंबंध जाणून घेता येतो.
(३) क्षेत्रभेटीद्वारे संबंधित क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो.
(४) वरील सर्व
2/20
प्रश्न २ रा - क्षेत्रभेट ही भूगोल या विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यासपद्धती आहे यासाठी कोणती पुर्व तयारी करावी?
(१) क्षेत्रभेटीचे ठिकाण निश्चित करणे.
(२) क्षेत्रभेटीचा हेतू निश्चित करणे.
(३) क्षेत्रभेटीचे वेळापत्रक बनवणे.
(४) वरील सर्व
3/20
प्रश्न ३ रा- क्षेत्रभेट करण्यासाठी खालीलपैकी कोणते साहित्य आवश्यक असते?
(१) नोंदवही
(२) नमुना प्रश्नावली
(3) होकायंत्र
(४) वरील सर्व
4/20
प्रश्न ४ था- क्षेत्रभेट करण्यासाठी खालीलपैकी कोणते साहित्य आवश्यक असते?
(१) नमुना गोळा करण्यासाठी कागदी पिशवी
(२) नकाशा
(३) प्रथमोपचार पेटी
(४) वरील सर्व
5/20
प्रश्न ५ वा - क्षेत्रभेट करताना कोणती खबरदारी घ्यावी?
(१) शिक्षकांच्या सर्व सूचनांचे पालन करणे.
(२) क्षेत्रभेटीदरम्यान पर्यावरणास हानी न पोहोचवणे.
(३) क्षेत्रभेटीचा हेतू साध्य होण्याच्या दृष्टीने माहितीचे संकलन करणे.
(४) वरील सर्व
6/20
प्रश्न ६ वा - क्षेत्रभेट पूर्ण झाल्यानंतर त्याविषयी अहवाल लेखन करणे आवश्यक ठरते. अहवाल लेखनाविषयची माहिती घ्यावी ?
(१) क्षेत्रभेटीद्वारे संकलित केलेली माहिती
(२) क्षेत्रभेटीच्या ठिकाणची छायाचित्रे
(३) क्षेत्रभेटीसाठी वापरण्यात आलेले नकाशे / आराखडे
(४) वरील सर्व
7/20
प्रश्न ७ वा - क्षेत्रभेट पूर्ण झाल्यानंतर त्याविषयी अहवाल लेखन करताना कोणते मुद्दे असावेत?
(१) प्रस्तावना
(२) क्षेत्रभेटीद्वारे संकलित केलेल्या माहितीचे सादरीकरण
(३) निष्कर्ष
(४) वरील सर्व
8/20
प्रश्न ८ वा- क्षेत्रभेट म्हणजे काय ?
(१) एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देणे , म्हणजे 'क्षेत्रभेट' होय.
(२) एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील सामाजिक घटकांची माहिती मिळवणे, म्हणजे 'क्षेत्रभेट' होय.
(३) एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे, म्हणजे 'क्षेत्रभेट' होय.
(४) वरील सर्व
9/20
प्रश्न ९ वा- क्षेत्रभेटीद्वारे एखाद्या क्षेत्राच्या कोणकोणत्या बाबींशी संबंधित माहिती मिळवता येते ?
(१) भौगोलिक
(२) सामाजिक, आर्थिक
(३) ऐतिहासिक व सांस्कृतिक
(४) वरील सर्व
10/20
प्रश्न १० वा- क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्रे काढाल?
(१) पिकांची, प्राण्यांची
(२) पक्ष्यांची, मातीची, दगडांची
(३) वनस्पतींची, घरांची
(४) वरील सर्व
11/20
प्रश्न ११ वा- क्षेत्रभेटीदरम्यान विविध प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल?
(१) प्रत्यक्ष निरीक्षणातून
(२) मुलाखत व प्रश्नावली तंत्राचा वापर करून
(३) क्षेत्राच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून
(४) वरील सर्व
12/20
प्रश्न १२ वा- विविध क्षेत्रांतील पर्जन्यमानातील फरक कोणकोणत्या बाबींवरून लक्षात येतो ?
(१) विविध क्षेत्रांतील वनस्पती, घरांची रचना,
(२) लोकांचे पोशाख, लोकांच्या आहारातील पदार्थ
(३) फक्त (१)
(४) वरील (१) व (२)
13/20
प्रश्न १३ वा- क्षेत्रभेटीची आवश्यकता कोणती योग्य पर्यायाची निवड करा.
(१) क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.
(२) क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यांतील सहसंबंध जाणून घेता येतो.
(३) क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो
(४) वरील सर्व
14/20
प्रश्न १४ वा - क्षेत्र मेटीदरम्यान सातत्याने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्याल?
(१) क्षेत्रभेटीदरम्यान स्वतःची व इतरांची सुरक्षितता
(2) ओळखपत्र, प्रथमोपचार पेटी, अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांकांची यादी
(3) क्षेत्रभेटीदरम्यान शिक्षकांच्या सूचनांचे पालन
(४) वरील सर्व
15/20
प्रश्न १५ वा- क्षेत्रभेटीचा अहवाल कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तयार कराल ?
(१) प्रस्तावना.
(२) क्षेत्रभेटीचे महत्त्व व उद्दिष्टे
(३) संबंधित क्षेत्रातील प्राकृतिक रचना
(४) निष्कर्ष, आभार प्रदर्शन व संदर्भसूची
(५) वरील सर्व
16/20
प्रश्न १६ वा - समजा, शिक्षकांनी क्षेत्रभेटीचे आयोजन तुम्हांला करायला मागितले तर तुम्ही तपशीलवार नियोजन कसे कराल ? यातील अयोग्य मुद्दा शोधा.
(१) ठिकाणनिश्चिती
(२) हेतूनिश्चिती
(३) अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता
(४) मेजवानीची साधनांचे नियोजन
(५) प्रश्नावली निर्मिती
17/20
प्रश्न १७ वा- पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. - (१) क्षेत्रभेटीदरम्यान मुलाखतीद्वारे स्थानिक लोकांकडून माहिती मिळवता येते.
(१) योग्य
(२) अयोग्य
(३) सांगता येत नाही
(४) थोड्या प्रमाणात अयोग्य
18/20
प्रश्न १८ वा- वा- पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. - क्षेत्रभेटीचे नियोजन आवश्यक नसते.
(१) योग्य
(२) अयोग्य
(३) सांगता येत नाही
(४) थोड्या प्रमाणात योग्य
Explanation: दुरुस्त विधान - क्षेत्रभेटीचे नियोजन आवश्यक असते.
19/20
प्रश्न १९ वा - प्रश्न १८ वा- वा- पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. - क्षेत्रभेट म्हणजे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून केलेली सहल होय.
(१) योग्य
(२) अयोग्य
(३) सांगता येत नाही
(४) थोड्या प्रमाणात योग्य
Explanation: दुरुस्त विधान- क्षेत्रभेट म्हणजे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून केलेली भौगोलिक सहल होय.
20/20
प्रश्न २० वा - योग्य विधान निवडा.
(१) क्षेत्रभेटीदरम्यान मुलाखतीद्वारे स्थानिक लोकांकडून माहिती मिळवता येत नाही
(२) क्षेत्रभेटीचे नियोजन आवश्यक नसते.
(३) विविध क्षेत्रांतील पर्जन्यातील फरक वनस्पतींवरून समजतो
(४) क्षेत्रभेट म्हणजे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून केलेली सहल होय.
Result:
@@@


अ.क्र पाठाचे नाव स्वाध्याय
क्षेत्रभेट पहा
स्थान-विस्तार पहा
प्राकृतिक रचना व जलप्रणाली पहा
हवामान पहा
नैसर्गिक वनस्पती व प्राणी पहा
लोकसंख्या पहा
मानवी वस्ती पहा
अर्थव्यवस्था आणि व्यवसाय पहा
पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन पहा
१० सर्व स्वाध्याय पहा

Post a Comment

0 Comments