स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास इतिहासलेखन भारतीय परंपरा
स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास विषयातील स्वाध्याय सोडवणार आहोत. सर्व प्रश्नांचा समावेश असलेला स्वाध्याय सोडवून आपण अधिक सराव करू शकता. परीक्षेत आपणास सर्व प्रश्न सोडवता यावीत यासाठी सराव करणे आवश्यक असते आपण Swadhay सोडवून असा सराव करू शकता. इयत्ता १० वी मधील इतिहास विषयातील सर्व पाठांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास आपणास अभ्यासासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास-
सर्वप्रथम आपण इतिहास विषयातील सर्व पाठ व त्याची नावे पाहू. त्यानंतर इतिहास इयत्ता १० वी स्वाध्याय अभ्यासू. इयत्ता दहावीच्या इतिहास विषयामध्ये पुढील पाठांचा समावेश करण्यात आलेला आहे. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा, इतिहासलेखन : भारतीय परंपरा, उपयोजित इतिहास, भारतीय कलांचा इतिहास, प्रसारमाध्यमे आणि इतिहास, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, खेळ आणि इतिहास, पर्यटन आणि इतिहास, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन.
इतिहास विषयातील पाठावर आधिरीत सर्व प्रश्नांचा स्वाध्याय दिलेला आहे. खालील स्वाध्याय वाचन करा व त्यावर स्वाध्याय सोडवा. सर्व प्रश्न महतत्वाचे आहेत तेव्हा सर्व प्रश्न सोडवा. पाठावर विचारली जाणारे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत सर्व प्रश्न सोडवा. जो प्रश्न चुकेल तो पुन्हा पुन्हा वाचन करून सोडवा. अशा प्रकारे सराव करून सर्व प्रश्न सोडवा.
इतिहास इयत्ता १० वी कृतीपत्रिका-
| प्रश्न क्र. | प्रश्नप्रकार | गुण | विकल्पासह गुण |
|---|
| प्र. १ (अ) | दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ( ४ उपप्रश्न असतील. चारही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. ) | ४ | ४ |
| प्र. १ (ब) | पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. ( या प्रश्नप्रकारात ४-४ जोड्यांचे चार गट दिले जातील. प्रत्येक गटातून चुकीची असलेली एक जोडी ओळखून दुरुस्त जोड्या लिहिणे अपेक्षित आहे. चारही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.) | ४ | ४ |
| प्र. २ (अ) | दिलेली संकल्पनाचित्रे पूर्ण करा. ( यात 'संकल्पनाचित्र', 'तक्ता पूर्ण करा', 'कालरेषा तयार करा', 'ओघतक्ता तयार करा', 'घटना कालानुक्रमे योग्य ठिकाणी दर्शवा' असे प्रश्नप्रकार येतील. ३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.) | ४ | ६ |
| प्र. २. (ब) | टिपा लिहा / संकल्पना स्पष्ट करा. (३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे.) | ४ | ६ |
| प्र. ३ (अ) | पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (यात ५ विधाने असतील. त्यांपैकी कोणतीही २ विधाने सकारण स्पष्ट करणे.) | ६ | १५ |
| प्र. ३. (ब) | थोडक्यात उत्तरे लिहा. (यात ३ उपप्रश्न असतील. त्यांतील कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.) | ६ | ९ |
| प्र. ४. | दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. ( उताऱ्यावरील प्रश्न हे केवळ लेखन, वाचन तपासणारे नव्हेत; तर इतिहास विषयाचे ज्ञान व आकलन तपासणारे असतील. यात प्रत्येकी १ गुणाचे २ प्रश्न व २ गुणांचा १ मुक्तोत्तरी प्रश्न समाविष्ट असेल. ) | ४ | ४ |
| प्र ५ . | पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (यात पुढील प्रश्नप्रकारांपैकी कोणतेही ३ प्रश्नप्रकार विचारले जातील. त्यांपैकी २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.) | ८ | १२ |
| • तक्त्याच्या मदतीने सविस्तर उत्तर लिहा. | | |
| • ऐतिहासिक प्रक्रिया / टप्पे सविस्तर स्पष्ट करा. | | |
| • साम्य व फरकाचे मुद्दे शोधा. | | |
| • दोन घटनांमधील परस्परसंबंध / कारणमीमांसा लिहा. | | |
| • विस्तृत निबंधवजा प्रश्नांची उत्तरे लिहा. | | |
| • चित्राचे / आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. | | |
| एकूण गुण | ४० | ६० |
इतिहास इयत्ता १० वी स्वाध्याय -इतिहासलेखन भारतीय परंपरा
1/18
(१) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे ------- हे पहिले सरसंचालक होते.
(अ) अलेक्झांडर कनिंगहॅम
(ब) विल्यम जोन्स
(क) जॉन मार्शल
(ड) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
2/18
(२) 'हितोपदेश' या संस्कृत ग्रंथाचा ------ यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला.
(अ) जेम्स मिल
(ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
(क) माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
(ड) जॉन मार्शल
3/18
(३) भारतात कोरीव लेखांच्या स्वरूपात लिखित साहित्याची सुरुवात ------ याच्या काळापासून झाली.
(अ) सम्राट अकबर
(ब) सम्राट हर्षवर्धन
(क) सम्राट अशोक
(ड) सम्राट औरंगजेब
4/18
(४) इसवी सनाच्या सातव्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले ------ हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचे आहे.
(अ) मेघदूत
(ब) राजतरंगिणी
(क) रसरत्नाकर
(ड) हर्षचरित
5/18
(५) इसवी सनाच्या बाराव्या शतकात ------ याने लिहिलेला 'राजतरंगिणी' हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे.
(अ) बाणभट्ट
(ब) कल्हण
(क) पतंजली
(ड) विशाखदत्त
6/18
(६) मध्ययुगीन भारतातील मुस्लीम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर ------ इतिहासलेखनाच्या परंपरांचा प्रभाव असलेला दिसतो.
(अ) ग्रीक व रोमन
(ब) इंग्रज व फ्रेंच
(ड) हिंदी व उर्दू
(क) अरबी व फारसी
7/18
(७) छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती ------- या बखरीतून मिळते.
(अ) भाऊसाहेबांची बखर
(ब) पानिपतची बखर
(क) होळकरांची कैफियत
(ड) सभासद बखर
8/18
(८) 'भाऊसाहेबांची बखर' या बखरीत ------ लढाईचे वर्णन आहे.
(अ) रायगडच्या
(ब) पानिपतच्या तिसऱ्या
(क) प्लासीच्या
(ड) वसईच्या
9/18
(९) ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला ------ हा पहिला ग्रंथ होय.
(अ) द हिस्टरी ऑफ इंडिया
(ब) द हिस्टरी ऑफ महाराज
(क) द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया
(ड) द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट
10/18
(१०) नीलकंठ कीर्तने व वि. का. राजवाडे यांनी ------- याच्या इतिहासलेखनाच्या मर्यादा दाखवून दिल्या आहेत.
(अ) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
(ब) कर्नल टॉड
(क) जेम्स ग्रँट डफ
(ड) विल्यम विल्सन इंटर
11/18
(११) ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी जे लेखन केले आहे, त्यावर ब्रिटिशांच्या ------ धोरणाचा प्रभाव पडलेला दिसून येतो.
(अ) मार्क्सवादी
(ब) वसाहतवादी
(क) स्त्रीवादी
(ड) भांडवलशाही
12/18
(२) महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहासलेखनास ------ यांच्यापासून प्रेरणा मिळाली.
(अ) विनायक दामोदर सावरकर
(ब) रामकृष्ण गोपाळ भांडारकर
(क) विष्णुशास्त्री चिपळूणकर
(ड) न्या. महादेव गोविंद रानडे
13/18
(१३) हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिताना ------ या ब्रिटिश लेखकाची नि:पक्षपाती वृत्ती दिसून येते.
(अ) कर्नल रॉड
(ब) विल्यम विल्सन हंटर
(क) जेम्स ग्रँट डफ
(ड) जेम्स मिल
14/18
(१४) भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य ------ यांनी मार्क्सवादी इतिहासलेखन केले.
(अ) धर्मानंद कोसंबी
(ब) कॉम्रेड शरद पाटील
(क) रामशरण शर्मा
(ड) कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे
15/18
(१५) 'स्त्री-पुरुष तुलना' हे ------ यांनी लिहिलेले पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते.
(अ) मीरा कोसंबी
(ब) शर्मिला रेगे
(क) ताराबाई शिंदे
(ड) पंडिता रमाबाई
16/18
(१६) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरूस्त करून पुन्हा लिहा.
(अ) 'हू वेअर द शूद्राज' - वंचितांचा इतिहास
(ब) 'स्त्री-पुरुष तुलना' - स्त्रीवादी लेखन
(क) 'द इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डन्स : १८५७' - मार्क्सवादी इतिहास
(ड) जेम्स ग्रँट डफ इंडियन - वसाहतवादी इतिहास
17/18
(१७) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरूस्त करून पुन्हा लिहा.
(अ) 'द राईज ऑफ द मराठा पॉवर' - न्या. म. गो. रानडे
(ब) ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने' - विष्णुशास्त्री चिपळूणक
(क) मराठ्यांची रियासत - गोविंद सखाराम सरदेस
(ड) 'गुलामगिरी' - महात्मा फुले
18/18
(१८) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरूस्त करून पुन्हा लिहा.
(अ) भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना - इतिहासाचार्य वि. का. राजवाडे
(ब) एशियाटिक सोसायटीची स्थापना - सर विल्यम जोन्स
(क) महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रेरणा - विष्णुशास्त्री चिपळूणकर
(ड) हडप्पा संस्कृतीचा शोध - जेम्स मिल
@@@@
0 Comments