इयत्ता दहावी राज्यशास्त्र स्वाध्याय निवडणूक प्रक्रिया
इयत्ता दहावी राज्यशास्त्र स्वाध्याय आज आपण निवडणूक प्रक्रिया या पीठावरील स्वाध्याय आभ्यासणार आहोत. इयत्ता दहावीच्या इतिहास व राज्यशास्त्र पुस्तकात राज्यशास्त्र या विषयात एकूण पाच पाठ देण्यात आलेले आहेत. इयत्ता १० वी राज्यशास्त्र पुस्तकातील सर्वप्रथम पाठ पाहू या. पाठ १ संविधानाची वाटचाल, पाठ २ रा निवडणूक प्रक्रिया, पाठ ३ रा राजकीय पक्ष पाठ ४ था सामाजिक व राजकीय चळवळी, पाठ ५ वा भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने. आपण सर्वपाठावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत.
iyatta dahavi rajyashastra swadhyay-
कोणत्या विषयाची तयारीसाठी SWADHAY खूप म्हत्वाचा असतो. पाठावरील सर्व प्रश्न सोडवणे व अभ्यायणे म्हत्वाचे असते. बोर्ड परीक्षेत जास्त प्रमाणात हेच प्रश्न विचारलेले असतात. तेव्हा इयत्ता दहावी राज्यशास्त्र स्वाध्याय चा अभ्यास करणे व तो सोडवणे गरजेचे असते. iyatta dahavi rajyashastra swadhyay सोडवून या विषयातील सर्व गुण सहज प्राप्त करू शकता तेव्हा या विषयातील स्वाध्याय आपण सोडवू या.
राज्यशास्त्र कृतीपत्रिका -
प्रश्न क्र. | प्रश्नप्रकार | गुण | विकल्पासह गुण |
---|---|---|---|
प्र. ६. | दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय लिहा. (दिलेल्या ४ पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहिणे. यात प्रत्येकी १ गुणाचे ४ उपप्रश्न असतील.) | ४ | ४ |
प्र. ७ | पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (दिलेली विधाने चूक की बरोबर हे लिहून चूक विधान व बरोबर विधान या दोन्हींसाठी स्पष्टीकरण आवश्यक आहे. चूक की बरोबर यास १ गुण व स्पष्टीकरणाला १ गुण ३ विधानांपैकी कोणतीही दोन विधाने सोडवणे अपेक्षित आहे.) | ४ | ६ |
प्र. ८ (अ) | पुढील संकल्पना स्पष्ट करा. (यात दिलेल्या ३ संकल्पनांपैकी कोणत्याही दोन संकल्पना स्पष्ट करणे अपेक्षित आहे.) | ४ | ६ |
प्र. ८. (ब) | दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. ( या प्रश्नप्रकारात 'तक्ता पूर्ण करा', 'कालरेषा पूर्ण करा', 'पायऱ्या लिहा', 'ओघतक्ता पूर्ण करा', 'संकल्पनाचित्र पूर्ण करा' असे प्रश्नप्रकार असतील. दिलेल्या ३ उपप्रश्नांपैकी २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.) | ४ | ६ |
प्र. ९. | पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. ( या प्रश्नप्रकारात चारपैकी दोन प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.) | ४ | ८ |
एकूण | २० | ३० |
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) निवडणूक आयुक्तांची नेमणूक ........... करतात.
(अ) राष्ट्रपती
(ब) प्रधानमंत्री
(क) लोकसभा अध्यक्ष
(ड) उपराष्ट्रपती
(२) स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ........... यांची नेमणूक झाली.
(अ) डॉ.राजेंद्रप्रसाद
(ब) टी.एन.शेषन
(क) सुकुमार सेन
(ड) नीला सत्यनारायण
(३) मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची ....... समिती करते.
(अ) निवड
(ब) परिसीमन
(क) मतदान
(ड) वेळापत्रक
२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
(१) निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते.
(२) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदार संघात पुन्हा निवडणुका घेतात.
(३) एखाद्या घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.
३. संकल्पना स्पष्ट करा.
(१) मतदारसंघाची पुनर्रचना
(२) मध्यावधी निवडणुका
५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा.
(२) निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा.
(३) निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
निवडणूक प्रक्रिया
निवडणूक आयोग (भूमिका)
मतदार (भूमिका)
राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार (भूमिका)
0 Comments