इयत्ता दहावी राज्यशास्त्र स्वाध्याय संविधानाची वाटचाल
इयत्ता दहावी राज्यशास्त्र स्वाध्याय आज आपण संविधानाची वाटचाल या पीठावरील स्वाध्याय आभ्यासणार आहोत. इयत्ता दहावीच्या इतिहास व राज्यशास्त्र पुस्तकात राज्यशास्त्र या विषयात एकूण पाच पाठ देण्यात आलेले आहेत. इयत्ता १० वी राज्यशास्त्र पुस्तकातील सर्वप्रथम पाठ पाहू या. पाठ १ संविधानाची वाटचाल, पाठ २ रा निवडणूक प्रक्रिया, पाठ ३ रा राजकीय पक्ष पाठ ४ था सामाजिक व राजकीय चळवळी, पाठ ५ वा भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने. आपण सर्वपाठावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत.
iyatta dahavi rajyashastra swadhyay-
कोणत्या विषयाची तयारीसाठी SWADHAY खूप म्हत्वाचा असतो. पाठावरील सर्व प्रश्न सोडवणे व अभ्यायणे म्हत्वाचे असते. बोर्ड परीक्षेत जास्त प्रमाणात हेच प्रश्न विचारलेले असतात. तेव्हा इयत्ता दहावी राज्यशास्त्र स्वाध्याय चा अभ्यास करणे व तो सोडवणे गरजेचे असते. iyatta dahavi rajyashastra swadhyay सोडवून या विषयातील सर्व गुण सहज प्राप्त करू शकता तेव्हा या विषयातील स्वाध्याय आपण सोडवू या.
राज्यशास्त्र कृतीपत्रिका -
प्रश्न क्र. | प्रश्नप्रकार | गुण | विकल्पासह गुण |
---|---|---|---|
प्र. ६. | दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय लिहा. (दिलेल्या ४ पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहिणे. यात प्रत्येकी १ गुणाचे ४ उपप्रश्न असतील.) | ४ | ४ |
प्र. ७ | पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (दिलेली विधाने चूक की बरोबर हे लिहून चूक विधान व बरोबर विधान या दोन्हींसाठी स्पष्टीकरण आवश्यक आहे. चूक की बरोबर यास १ गुण व स्पष्टीकरणाला १ गुण ३ विधानांपैकी कोणतीही दोन विधाने सोडवणे अपेक्षित आहे.) | ४ | ६ |
प्र. ८ (अ) | पुढील संकल्पना स्पष्ट करा. (यात दिलेल्या ३ संकल्पनांपैकी कोणत्याही दोन संकल्पना स्पष्ट करणे अपेक्षित आहे.) | ४ | ६ |
प्र. ८. (ब) | दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. ( या प्रश्नप्रकारात 'तक्ता पूर्ण करा', 'कालरेषा पूर्ण करा', 'पायऱ्या लिहा', 'ओघतक्ता पूर्ण करा', 'संकल्पनाचित्र पूर्ण करा' असे प्रश्नप्रकार असतील. दिलेल्या ३ उपप्रश्नांपैकी २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.) | ४ | ६ |
प्र. ९. | पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. ( या प्रश्नप्रकारात चारपैकी दोन प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.) | ४ | ८ |
एकूण | २० | ३० |
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी ........... जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
(अ) २५%
(ब) ३०%
(क) ४०%
(ड) ५०%
(२) पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे?
(अ) माहितीचा अधिकार कायदा
(ब) हुंडाप्रतिबंधक कायदा
(क) अन्नसुरक्षा कायदा
(ड) यांपैकी कोणतेही नाही.
(३) लोकशाहीचा गाभा म्हणजे ........
(अ) प्रौढ मताधिकार
(ब) सत्तेचे विकेंद्रीकरण
(क) राखीव जागांचे धोरण
(ड) न्यायालयीन निर्णय
२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
(१) भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
(२) माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
(३) संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.
३. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) हक्काधारित दृष्टिकोन
(२) माहितीचा अधिकार
(३) लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व
४. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले?
(२) सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय ?
(३) न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे?
0 Comments