स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास विषयातील स्वाध्याय सोडवणार आहोत. सर्व प्रश्नांचा समावेश असलेला स्वाध्याय सोडवून आपण अधिक सराव करू शकता. परीक्षेत आपणास सर्व प्रश्न सोडवता यावीत यासाठी सराव करणे आवश्यक असते आपण Swadhay सोडवून असा सराव करू शकता. इयत्ता १० वी मधील इतिहास विषयातील सर्व पाठांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास आपणास अभ्यासासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास-
सर्वप्रथम आपण इतिहास विषयातील सर्व पाठ व त्याची नावे पाहू. त्यानंतर इतिहास इयत्ता १० वी स्वाध्याय अभ्यासू. इयत्ता दहावीच्या इतिहास विषयामध्ये पुढील पाठांचा समावेश करण्यात आलेला आहे. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा, इतिहासलेखन : भारतीय परंपरा, उपयोजित इतिहास, भारतीय कलांचा इतिहास, प्रसारमाध्यमे आणि इतिहास, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, खेळ आणि इतिहास, पर्यटन आणि इतिहास, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन.
इतिहास विषयातील पाठावर आधिरीत सर्व प्रश्नांचा स्वाध्याय दिलेला आहे. खालील स्वाध्याय वाचन करा व त्यावर स्वाध्याय सोडवा. सर्व प्रश्न महतत्वाचे आहेत तेव्हा सर्व प्रश्न सोडवा. पाठावर विचारली जाणारे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत सर्व प्रश्न सोडवा. जो प्रश्न चुकेल तो पुन्हा पुन्हा वाचन करून सोडवा. अशा प्रकारे सराव करून सर्व प्रश्न सोडवा.
इतिहास इयत्ता १० वी कृतीपत्रिका-
प्रश्न क्र. | प्रश्नप्रकार | गुण | विकल्पासह गुण |
---|
प्र. १ (अ) | दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ( ४ उपप्रश्न असतील. चारही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. ) | ४ | ४ |
प्र. १ (ब) | पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. ( या प्रश्नप्रकारात ४-४ जोड्यांचे चार गट दिले जातील. प्रत्येक गटातून चुकीची असलेली एक जोडी ओळखून दुरुस्त जोड्या लिहिणे अपेक्षित आहे. चारही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.) | ४ | ४ |
प्र. २ (अ) | दिलेली संकल्पनाचित्रे पूर्ण करा. ( यात 'संकल्पनाचित्र', 'तक्ता पूर्ण करा', 'कालरेषा तयार करा', 'ओघतक्ता तयार करा', 'घटना कालानुक्रमे योग्य ठिकाणी दर्शवा' असे प्रश्नप्रकार येतील. ३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.) | ४ | ६ |
प्र. २. (ब) | टिपा लिहा / संकल्पना स्पष्ट करा. (३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे.) | ४ | ६ |
प्र. ३ (अ) | पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (यात ५ विधाने असतील. त्यांपैकी कोणतीही २ विधाने सकारण स्पष्ट करणे.) | ६ | १५ |
प्र. ३. (ब) | थोडक्यात उत्तरे लिहा. (यात ३ उपप्रश्न असतील. त्यांतील कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.) | ६ | ९ |
प्र. ४. | दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. ( उताऱ्यावरील प्रश्न हे केवळ लेखन, वाचन तपासणारे नव्हेत; तर इतिहास विषयाचे ज्ञान व आकलन तपासणारे असतील. यात प्रत्येकी १ गुणाचे २ प्रश्न व २ गुणांचा १ मुक्तोत्तरी प्रश्न समाविष्ट असेल. ) | ४ | ४ |
प्र ५ . | पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (यात पुढील प्रश्नप्रकारांपैकी कोणतेही ३ प्रश्नप्रकार विचारले जातील. त्यांपैकी २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.) | ८ | १२ |
| • तक्त्याच्या मदतीने सविस्तर उत्तर लिहा. | | |
| • ऐतिहासिक प्रक्रिया / टप्पे सविस्तर स्पष्ट करा. | | |
| • साम्य व फरकाचे मुद्दे शोधा. | | |
| • दोन घटनांमधील परस्परसंबंध / कारणमीमांसा लिहा. | | |
| • विस्तृत निबंधवजा प्रश्नांची उत्तरे लिहा. | | |
| • चित्राचे / आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. | | |
| एकूण गुण | ४० | ६० |
इतिहास इयत्ता १० वी स्वाध्याय -ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
1/20
(१) लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने ------- या चित्राचा समावेश लुव्र रेखाटलेल्या संग्रहालयात आहे.
(अ) नेपोलियन
(ब) मोनालिसा
(क) हॅन्स स्लोअन
(ड) दुसरा जॉर्ज
2/20
(२) कोलकाता येथील ------ हे भारतातील पहिले संग्रहालय होय.
(अ) गव्हन्मेंट म्युझियम
(ब) राष्ट्रीय वस्तू संग्रहालय
(क) छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय
(ड) भारतीय संग्रहालय
3/20
(३) जे दस्तऐवज प्रदर्शित केले जात नाहीत, असे महत्त्वाचे अभिलेख ------ जतन केले जातात.
(अ) संग्रहालयात
(ब) ग्रंथालयात
(क) अभिलेखागारांमध्ये
(ड) सरकारदप्तरी
4/20
(४) सोळाव्या शतकात होऊन गेलेला फ्रान्सचा राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी ------- हा प्रसिद्ध इटालियन चित्रकार होता.
(अ) रॅफेल
(ब) लिओनार्दो द विंची
(क) मायकेल अँजेलो
(ड) डोनॅटो ब्रमान्टे
5/20
(५) नेपोलियन बोनापार्ट याने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे ------ संग्रहालयातील वस्तूंचा संग्रह खूपच वाढला.
(अ) नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी
(ब) ब्रिटिश संग्रहालय
(क) लुव्र
(ड) द कॅलिको म्युझियम
6/20
(६) निसर्गशास्त्रज्ञ '------' याने आपल्या संग्रहालयातील ७१ हजार वस्तू भेट दिल्याने ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढली.
(अ) सर हॅन्स स्लोअन
(ब) नेपोलियन बोनापार्ट
(क) राजा दुसरा जॉर्ज
(ड) राजा पहिला फ्रान्सिस
7/20
(७) बारा कोटींहून अधिक वस्तू व अश्मीभूत अवशेष संग्रहित असलेले 'नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी' हे संग्रहालय ------- या देशात आहे.
(अ) इंग्लंड
(ब) फ्रान्स
(क) स्वित्झर्लंड
(ड) अमेरिका
8/20
(८) चेन्नई येथे सन १८५१ मध्ये सुरू झालेले ------ हे भारतातील दुसरे संग्रहालय आहे.
(अ) सालारजंग म्युझियम
(ब) इंडियन म्युझियम
(क) गव्हर्नमेंट म्युझियम
(ड) नॅशनल म्युझियम
9/20
(९) 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय' हे ------ यांच्या भारतभेटीच्या स्मरणार्थ उभारले गेले.
(अ) राजा पहिला जॉर्ज
(ब) राणी एलिझाबेथ
(क) प्रिन्स चार्ल्स
(ड) प्रिन्स ऑफ वेल्स
10/20
(१०) 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया'ची वास्तू' ------ शैलीत बांधलेली आहे.
(अ) मुघल
(ब) इंडो-ग्रीक
(क) इंडो-गॉथिक
(ड) इंडो-पर्शियन
11/20
(११) ------ या वास्तूला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत' असा दर्जा देण्यात आला आहे.
(अ) छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस
(ब) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय
(क) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
(ड) जहांगीर आर्ट गॅलरी
12/20
(१२) ------ ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात.
(अ) अभिलेखागारे
(ब) संग्रहालये
(क) ग्रंथालये
(ड) सूची वाङ्मय
13/20
(१३) इ.स.पू. सातव्या शतकातील ------ मधील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुरबानीपाल याचे ग्रंथालय सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय समजले जाते.
(अ) तक्षशिला
(ब) मेसोपोटेमिया
(क) अलेक्झांड्रिया
(ड) बॅबिलोन
14/20
(१४) तमिळनाडूतील तंजावर येथील '------' ग्रंथालय' हे इसवी सनाच्या सोळाव्या-सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले.
(अ) व्यंकोजीराजे भोसले
(ब) सरफोजीराजे भोसले
(क) सरस्वती महाल
(ड) विद्या निकेतन
15/20
(१५) भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन १८९१ मध्ये ------- या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले.
(अ) राष्ट्रीय अभिलेखागार
(ब) फेडरल रेकॉर्ड ऑफ नेशन
(क) अर्काईव्हज् नॅशनल
(ड) इंपिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट
16/20
(१६) इसवी सन १९९८ मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती ------ यांनी भारताचे 'राष्ट्रीय अभिलेखागार' जनतेसाठी खुले केले.
(अ) नीलम संजीव रेड्डी
(ब) के. आर. नारायणन
(क) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
(ड) डॉ. शंकर दयाळ शर्मा
17/20
(१७) पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे पाच कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत, त्याला ------- असे म्हणतात.
(अ) पेशवे दप्तर
(ब) भोसले दप्तर
(क) मराठा दप्तर
(ड) ब्रिटिश दप्तर
18/20
(१८) छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील '------' हा महत्त्वाचा कोश मानला जातो.
(अ) भारतीय व्यवहारकोश
(ब) राज्यव्यवहारकोश
(क) व्यावहारिक कोश
(ड) भारतीय प्राचीन चरित्रकोश
19/20
(१९) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ------- यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्व कोश निर्मितीस चालना दिली.
(अ) वसंतराव नाईक
(ब) शरद पवार
(क) यशवंतराव चव्हाण
(ड) पृथ्वीराज चव्हाण
20/20
(२०) 'प्राचीन भारतीय स्थल कोश' या कोशाची रचना ------ यांनी केली.
(अ) पंडित महादेवशास्त्री जोशी
(ब) श्रीधर व्यंकटेश केतकर
(क) न. र. फाटक
(ड) सिद्धेश्वरशास्त्री चित्राव
@@@@
0 Comments