6/recent/ticker-posts

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास Swadhay manoranjan acchi madhyam ani itihas

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास विषयातील स्वाध्याय सोडवणार आहोत. सर्व प्रश्नांचा समावेश असलेला स्वाध्याय सोडवून आपण अधिक सराव करू शकता. परीक्षेत आपणास सर्व प्रश्न सोडवता यावीत यासाठी सराव करणे आवश्यक असते आपण Swadhay सोडवून असा सराव करू शकता. इयत्ता १० वी मधील  इतिहास विषयातील सर्व पाठांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास आपणास अभ्यासासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास manoranjan acchi madhyam ani itihas

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास-

सर्वप्रथम आपण इतिहास विषयातील सर्व पाठ व त्याची नावे पाहू. त्यानंतर इतिहास इयत्ता १० वी स्वाध्याय अभ्यासू. इयत्ता दहावीच्या इतिहास विषयामध्ये पुढील पाठांचा समावेश करण्यात आलेला आहे. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा, इतिहासलेखन : भारतीय परंपरा, उपयोजित इतिहास, भारतीय कलांचा इतिहास, प्रसारमाध्यमे आणि इतिहास, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, खेळ आणि इतिहास, पर्यटन आणि इतिहास, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन.

इतिहास विषयातील पाठावर आधिरीत सर्व प्रश्नांचा स्वाध्याय दिलेला आहे. खालील स्वाध्याय वाचन करा व त्यावर स्वाध्याय सोडवा. सर्व प्रश्न महतत्वाचे आहेत तेव्हा सर्व प्रश्न सोडवा. पाठावर विचारली जाणारे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत सर्व प्रश्न सोडवा. जो प्रश्न चुकेल तो पुन्हा पुन्हा वाचन करून सोडवा. अशा प्रकारे सराव करून सर्व प्रश्न सोडवा. 

इतिहास इयत्ता १० वी कृतीपत्रिका-

प्रश्न क्र.प्रश्नप्रकारगुणविकल्पासह गुण
प्र. १ (अ)दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ( ४ उपप्रश्न असतील. चारही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. )४४
प्र. १ (ब)पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. ( या प्रश्नप्रकारात ४-४ जोड्यांचे चार गट दिले जातील. प्रत्येक गटातून चुकीची असलेली एक जोडी ओळखून दुरुस्त जोड्या लिहिणे अपेक्षित आहे. चारही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.)४४
प्र. २ (अ)दिलेली संकल्पनाचित्रे पूर्ण करा. ( यात 'संकल्पनाचित्र', 'तक्ता पूर्ण करा', 'कालरेषा तयार करा', 'ओघतक्ता तयार करा', 'घटना कालानुक्रमे योग्य ठिकाणी दर्शवा' असे प्रश्नप्रकार येतील. ३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.)४६
प्र. २. (ब)टिपा लिहा / संकल्पना स्पष्ट करा. (३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे.)४६
प्र. ३ (अ)पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (यात ५ विधाने असतील. त्यांपैकी कोणतीही २ विधाने सकारण स्पष्ट करणे.)६१५
प्र. ३. (ब)थोडक्यात उत्तरे लिहा. (यात ३ उपप्रश्न असतील. त्यांतील कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.)६९
प्र. ४.दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. ( उताऱ्यावरील प्रश्न हे केवळ लेखन, वाचन तपासणारे नव्हेत; तर इतिहास विषयाचे ज्ञान व आकलन तपासणारे असतील. यात प्रत्येकी १ गुणाचे २ प्रश्न व २ गुणांचा १ मुक्तोत्तरी प्रश्न समाविष्ट असेल. )४४
प्र ५ .पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (यात पुढील प्रश्नप्रकारांपैकी कोणतेही ३ प्रश्नप्रकार विचारले जातील. त्यांपैकी २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.)८१२
• तक्त्याच्या मदतीने सविस्तर उत्तर लिहा.
• ऐतिहासिक प्रक्रिया / टप्पे सविस्तर स्पष्ट करा.
• साम्य व फरकाचे मुद्दे शोधा.
• दोन घटनांमधील परस्परसंबंध / कारणमीमांसा लिहा.
• विस्तृत निबंधवजा प्रश्नांची उत्तरे लिहा.
• चित्राचे / आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.
एकूण गुण४०६०


इतिहास इयत्ता १० वी स्वाध्याय -मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

itihas-swadhyay-10th

1/20
(१) महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार ------ यांना मानतात.
(अ) संत ज्ञानेश्वर
(ब) संत तुकाराम
(क) संत नामदेव
(ड) संत एकनाथ
2/20
(२) बाबुराव पेंटर यांनी '------' हा चित्रपट काढला.
(अ) पुंडलिक
(ब) राजा हरिश्चंद्र
(क) सैरंध्री
(ड) बाजीराव-मस्तानी
3/20
(३) अठराव्या शतकात ------- यांनी दशावतारी खेळ दाखवणारा फड स्थापन करून तो महाराष्ट्रभर नेला.
(अ) संत गाडगे महाराज
(ब) अज्ञानदास
(क) श्यामजी नाईक काळे
(ड) तुळशीदास
4/20
(४) परंपरेनुसार कीर्तनपरंपरेचे आदय प्रवर्तक ------ होत, असे मानले जाते.
(अ) संत नामदेव
(ब) संत एकनाथ
(क) संत गाडगेमहाराज
(ड) नारदमुनी
5/20
(५) शिवरायांच्या काळात ------ या कवीने रचलेला अफजल खानवधाविषयीचा पोवाडा प्रसिद्ध आहे.
(अ) अज्ञानदास
(ब) तुळशीदास
(क) रामदास
(ड) सूरदास
6/20
(६) कर्नाटकात ज्या संतांच्या रचना भजनात गायल्या जातात, त्यात ------ यांचा समावेश होत नाही.
(अ) पुरंदरदास
(ब) सूरदास
(क) बोधेंद्रदास गुरुस्वामी
(ड) त्यागराज
7/20
(७) वारकरी संप्रदायाने नामस्मरणाचा प्रकार म्हणून ------ वैभव प्राप्त करून दिले.
(अ) पोवाड्यास
(ब) दशशवतारी नाटकांस
(क) भजनास
(ड) भारुडास
8/20
(८) तुळशीदासाने रचलेला ------- लढाईचा पोवाडा' प्रसिदध आहे.
(अ) पन्हाळ्याच्या
(ब) रायगडाच्या
(क) प्रतापगडाच्या
(ड) सिंहगडाच्या
9/20
(९) संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात आपल्या पोवाड्यांनी गाजलेल्या शाहिरांत ------ या शाहिराचा समावेश होत नाही.
(अ) अमरशेख
(ब) पठ्ठे बापूराव
(क) अण्णाभाऊ साठे
(ड) गवाणकर
10/20
(१०) 'मराठी रंगभूमीचे जनक' म्हणून ------- यांना ओळखले जाते.
(अ) वि. ज. कीर्तने
(ब) दत्तोपंत पटवर्धन
(क) विष्णुदास भावे
(ड) अण्णासाहेब किर्लोस्कर
11/20
(११) १८६१ साली ------ यांनी लिहिलेल्या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकांची नवी परंपरा सुरू झाली.
(अ) विनायक जनार्दन कीर्तने
(ब) विष्णुदास भावे
(क) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
(ड) गोविंद बल्लाळ देवल
12/20
(१२) एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तर हिंदुस्थानातील ख्याल गायकी महाराष्ट्रात रुजवण्याचे काम ------ यांनी केले.
(अ) भीमसेन जोशी
(ब) कुमार गंधर्व
(क) बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर
(ड) किशोरी अमोणकर
13/20
(१३) भारतात पहिला सिने-कॅमेरा ------ यांनी तयार केला होता.
(अ) आनंदराव पेंटर
(ब) बाबुराव पेंटर
(क) दादासाहेब तोरणे
(ड) दादासाहेब फाळके
14/20
(१४) 'बाजीराव-मस्तानी' हा चित्रपट काढणाऱ्या ------ यांच्या ऐतिहासिक चित्रपटांमधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार हो आहे, हे लक्षात येताच ब्रिटिशांनी त्यावर निर्बंध घातले.
(अ) संजय लीला भन्साळी
(ब) दादासाहेब फाळके
(क) बाबुराव पेंटर
ड) भालजी पेंढारकर
15/20
(१५) भारतातील सुरुवातीचे चित्रपट ------ होते.
(अ) बोलपट
(ब) मूकपट
(क) रंगीत
(ड) त्रिमिती
16/20
(१६) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेल्या 'संत तुकाराम' या चित्रपटात ------ यांनी तुकारामांची अजरामर भूमिका केली होती.
(अ) व्ही. शांताराम
(ब) केशवराव भोसले
(क) बालगंधर्व
(ड) विष्णुपंत पागनीस
17/20
(१७) सत्यशोधकी कीर्तनाशी नाते सांगणारी -------- कीर्तने जातिभेद, स्वच्छता, व्यसनमुक्ती यांसारख्या विषयांवर प्रबोधन करीत असत.
(अ) संत तुकडोजी महाराजांची
(ब) महात्मा फुल्यांची
(क) संत गाडगे महाराजांची
(ड) संत एकनाथांची
18/20
(१८) जरठ-कुमारी विवाह या तत्कालीन अनिष्ट प्रथेवर '------' या नाटकात विनोदी पद्धतीने टीका केली आहे.
(अ) संगीत शारदा
(ब) संगीत एकच प्याला
(क) संगीत मानापमान
(ड) संगीत संशयकल्लोळ
19/20
(१९) भारत सरकारने 'फिल्म डिव्हिजन'ची स्थापना ------ या हेतूने केली.
(अ) ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करणे
(ब) समाजाचे राजकीय प्रबोधन करणे
(क) अनुबोधपट व वृत्तपट यांची निर्मिती करणे
(ड) बालचित्रपट व कार्टून फिल्म्स तयार करणे.
20/20
(२०) ------ या मराठीतील पहिल्या स्त्री-चित्रपटनिर्मात्या होत.
(अ) कमलाबाई गोखले
(ब) कमलाबाई मंगळूरकर
(क) देविकाराणी
(ड) काननदेवी
Result:
@@@@

Post a Comment

0 Comments