आपणास विविध अभ्यासक्रमासाठी कृतीसंशोधन Krutisashodhan बनवावे लागते. असे कृतीसंशोधन Krutisashodhan किंवा नवोपक्रम बनवत असताना आपणास विविध पयऱ्या किंवा टप्पे पूर्ण करत पुढे जावे लागते. कृतीसंशोधन अहवाल, प्रकल्प बनवताना कोणत्या पायऱ्या असतात, किती प्रकरणे असतात, किती संदर्भ असतात याविषयी माहिती असणे आवश्यक असते. कृतीसंशोधन Krutisashodhan बनवताना व कृतीसंशोधन Krutisashodhan लेखन करत असताना कोणत्या गोष्टींचे नियोजन करावे, कृतीसंशोधन Krutisashodhan अहवाल लेखन कसे करावे याविषयी मार्गदर्शन पाहणार आहोत.
शिक्षण हे प्रवाही राहण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षणप्रक्रियेत सातत्याने बदल घडवून आणणे आवश्यक असते. हे बदल घडवून आणण्यासाठी शिक्षणप्रक्रियेत समाविष्ट असलेले अभ्यासक्रम, अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि व्यवस्थापन इ. सारख्या संलग्न घटकांवर लक्ष केंद्रित करणे अपरिहार्य ठरते. शिक्षकाला आपल्या दैनंदिन शैक्षणिक कामात विविध अडचणी येतात. त्यातूनच समस्या निर्माण होतात आणि अशा छोट्या-छोट्या समस्या वेळीच सोडविल्या गेल्या नाहीत तर शिक्षणप्रक्रियेत काही वेळा गंभीर स्वरूपाचे प्रश्न उद्भवण्याची शक्यता असते. आपले प्रश्न, अडचणी किंबहुना आपल्या समस्या आपणच सोडविणे हेही हिताचे असते. समस्या सोडविण्यासाठी काही उपाय विचारपूर्वक योजावे लागतात. त्यासाठी शिक्षकांची कल्पकता, सर्जनशीलता विकसित होणे आवश्यक ठरते. त्या दृष्टीने अनेक शिक्षक त्यासाठी प्रयत्नही करीत असतात आणि त्यांचे स्वरूप 'आधी केले मग सांगितले असे असते.' अशा प्रयत्नांना कृतिसंशोधनाचे स्वरूप कसे दधावे, हे आपण समजावून घेऊ. यासाठी प्रथमतः संशोधनाच्या प्रकारांची ओळख करून घेऊ या.
 |
कृती संशोधन अहवाल लेखन |
कृती संशोधनाचे प्रकार -
प्रामुख्याने संशोधनाचे ३ प्रकार आहेत.
१. मूलभूत संशोधन
२. उपयोजित संशोधन
३. कृतिसंशोधन
१) मूलभूत संशोधन निरनिराळे तत्त्वज्ञ, विचारवंत व शास्त्रज्ञ यांनी नव्याने मांडलेले सूत्र, नियम, तत्त्वे, सिद्धान्त, उपपत्ती यांचा समावेश मूलभूत संशोधन या प्रकारात होत असतो. उदा. झाडावरून पडणारे फळ पाहिल्यानंतर न्यूटनने 'गुरुत्त्वाकर्षणाचा सिद्धान्त' मांडला. हे मूलभूत संशोधन आहे. याच प्रकाराने बी. एफ. स्किनरचा अध्ययन सिद्धान्त हा मूलभूत संशोधनाचा प्रकार होऊ शकेल.
२) उपयोजित संशोधन मूलभूत संशोधनातून मांडलेल्या सिद्धान्तांची पडताळणी होते. व्यावहारिक जीवनात त्यांचा उपयोग कसा होतो आणि प्रत्यक्ष कार्यासंबंधी त्यांचे उपयोजन कसे करता येते हे पाहणे हा उपयोजित संशोधनाचा गाभा आहे. उदा. स्किनरच्या अध्ययनविषयक सिद्धान्ताच्या आधारे वर्गाध्यापनात पारितोषिक, स्तुती व शिक्षा यांपैकी कशाचा उपयोग अध्ययन प्रभावी करण्यासाठी होऊ शकतो याप्रकारच्या संशोधनाचा समावेश उपयोजित संशोधन या प्रकारात होतो.
३) कृतिसंशोधन शिक्षकांना दैनंदिन शालेय जीवनात विविध शैक्षणिक समस्यांना तोंड दयावे लागते. या समस्यांमागील कारणे दूर करण्यासाठी शिक्षकांना प्रत्यक्ष कृतियुक्त उपाय योजावे लागतात. या उपायांच्या परिणामांची वारंवार तपासणी करावी लागते व संपादनाचे मोजमाप करावे लागते. या सर्व कृतींचा समावेश कृतिसंशोधनात होतो. उदा. एखादया शिक्षकाला असे जाणवते की आपल्या वर्गातील विदधार्थ्यांना समजपूर्वक प्रकट वाचनात अडचणी येतात. मग त्यामागील कारणे दूर करण्यासाठी शिक्षक विविध प्रकारच्या उपाययोजना शास्त्रशुद्ध पद्धतीने करतात. या उपायांमुळे वाचन कौशल्यात सुधारणा झाली का हे ते पद्धतशीररीत्या पडताळून पाहतात. जर यातून काही विद्यार्थी अजूनही मागे पडत असतील तर त्यामागील कारणांचा शोध घेऊन शिक्षक पुन्हा नवीन उपाययोजना करतात. असे आवर्तन (चक्र) शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना समजपूर्वक प्रकट वाचन करता येईपर्यंत चालू ठेवतात.
कृतिसंशोधन :
कृतिसंशोधन या संशोधन प्रकाराची सुरुवात १९३० मध्ये 'अमेरिकेतील 'मिनेसोटा' या विद्यापीठात झाली. शिक्षकांना स्वतःच्या अध्यापन कार्यात येणाऱ्या समस्या स्वतःच संशोधनाच्या साहाय्याने सोडविण्याचे संस्था पातळीवरील प्रयत्न या विद्यापीठात केले गेले.
इ.स. १९४४ मध्ये कर्ट लेविन यांनी 'कृतिसंशोधन' असे नाव वापरावयास सुरुवात केली व त्याची आवर्ती मांडणीही स्पष्ट केली. कोलंबिया विद्यापीठात शिक्षक महाविद्यालयातील स्टिफन कोरे यांनी कर्ट लेविन यांच्या संकल्पनेमध्ये सुधारणा केली. त्यांनी पुढीलप्रमाणे कृतिसंशोधनाची व्याख्या केली.
"आपले निर्णय व उपक्रम यांच्याबाबत् मार्गदर्शन मिळावे, सुधारणा व्हाव्यात व त्यांचे योग्य तन्हेने मूल्यमापन व्हावे म्हणून व्यावसायिकांनी आपल्या समस्यांचा शास्त्रीय पद्धतीने स्वतःच अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कृतिसंशोधन होय."
कृतिसंशोधन स्वरूप
संशोधनाच्या इतर प्रकारांपेक्षा कृतिसंशोधन भिन्न आहे. 'कृतिसंशोधन' या संज्ञेत दोन शब्द समाविष्ट आहेत. एक म्हणजे 'कृती' आणि दुसरे म्हणजे 'संशोधन', या दोन शब्दांनी 'कृतिसंशोधन' हा जोड शब्द तयार होतो.
शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षे आपण सर्वजण आपल्या समस्या सोडविण्यासाठी किंवा आपले कार्य अधिक दर्जेदार करण्यासाठी नवीन उपक्रम वा कृती करत असतो. मात्र, ही कृती वा उपक्रम किती परिणामकारक आहे, याची शास्त्रशुद्ध पद्धतीने पडताळणी घेतोच असे नाही. तसेच पदवीसाठी किंवा अन्य हेतूंसाठी केलेल्या संशोधनात नजिकची समस्या संपूर्णपणे सोडविण्याच्या उद्देशाने संशोधकाने काही विशेष कृती केलेली असेलच असे नाही. अन्य प्रकारच्या संशोधनात संशोधकाला स्वतःला समस्येची झळ लागलेली असतेच असे नाही. त्याला संशोधनाचे तंत्र माहीत असते, पण प्रत्यक्ष क्षेत्रीय स्थितीची त्याला कमी जाणीव असते.
परंतु कृतिसंशोधनात मात्र शिक्षक आपल्या वर्गात अथवा शाळेत जाणवणाऱ्या समस्या निवडतात. त्यांची झळ त्यांना लागलेली असते. शिक्षक त्या समस्या पूर्णपणे सोडविण्यासाठी स्वतः अथवा सहकाऱ्यांच्या मदतीने काही विशेष कृती वा उपक्रम योजत असतात.
या उपक्रमांची अंमलबजावणी शास्त्रशुद्ध पद्धतीने व सहेतुकपणे केली जात असते. तसेच या उपक्रम अथवा कृतींची परिणामकारकता तपासणे अपरिहार्य असते. ह्या कृतीतून समस्येचे संपूर्ण निराकरण झाले नाही तर पुन्हा वेगळ्या कृतींची योजना व कार्यवाही करणे क्रमप्राप्त असते. स्वाभाविकच स्वतः कृती करून, संशोधन करून काढलेले निष्कर्ष अमलात आणताना त्यांची आंतरिक प्रेरणा अधिक परिणामकारक ठरते.
कृतिसंशोधन : अहवाल लेखन
कृतिसंशोधनातील सर्व कृतिकार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेले आहेत. संकलित माहितीचे विश्लेषण करून योग्य असे निष्कर्ष आपल्या हाती आले आहेत. आपण केलेले हे प्रायोगिक कार्य आपल्याला इतर शिक्षकांसमोर लेखी स्वरूपात मांडावयाचे आहे. म्हणजेच आपल्याला कृतिसंशोधनाचे अहवाल लेखन करावयाचे आहे.
हे अहवाल लेखन अन्य शिक्षकांना कृतिसंशोधन करण्यास प्रेरित करणारे ठरते. तसेच त्यांना त्यांच्या कृतिसंशोधनासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यास बहुमोल मार्गदर्शन लाभते. प्रामुख्याने कृतिसंशोधन अहवाल लेखनाचे पुढील तीन विभाग करावे लागतात.
क. अंतिम विभाग
ब. प्रमुख विभाग
अ. प्राथमिक विभाग
५.१ कृतिसंशोधन अहवाल रचना
अ.क्र |
प्राथमिक विभाग |
०१) |
मुखपृष्ठ |
०२) |
प्रथम पृष्ठ |
०३) |
प्रतिज्ञा पत्र |
०४) |
मुख्याध्यापक प्रमाणपत्र |
०५) |
मार्गदर्शक प्रमाणपत्र |
०६) |
ऋणनिर्देश |
०७) |
अनुक्रमणिका |
०८) |
सारणींची यादी |
०९) |
आलेख यादी |
१०) |
नकाशा यादी |
११) |
आकृती यादी |
१२) |
इतर (गरजेनुसार) |
अ.क्र |
प्रमुख विभाग |
०१) |
प्रास्ताविक |
०२) |
संदर्भ साहित्याचा आढावा |
०३) |
कृतीसंशोधन कार्यपध्दती |
०४) |
माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन |
०५) |
निष्कर्ष व शिफारश |
अ.क्र |
अंतिम विभाग |
०१) |
संदर्भग्रंथ सूची |
१.१ |
संदर्भग्रंथ |
१.२ |
नियतकालिके |
१.३ |
वर्तमानपत्रे |
१.४ |
संकेतस्थळे |
२) |
परिशिष्टे |
२.१ |
विद्यार्थी यादी |
२.२ |
शाळांची यादी |
२.३ |
प्रश्नावली नमुना |
२.४ |
मूल्यमापन साधन नमुने |
२.५ |
गुणयादी |
२.६ |
दृक-श्राव्य साधन नमुने |
२.७ |
छायाचित्र |
कृतिसंशोधन Krutisashodhan
नमुना अनुक्रमणिका
कृती संशोधन
अ.क्र | विषय | डाऊनलोड |
---|
१) | जिल्हा परिषद शाळा . ता. जि. येथील इयत्ता ३ री च्या विद्यार्थांना खेळाद्वारे आरोग्यदायी सवयीचे विकसन व त्यांच्या परिणामकारकता अभ्यासणे. | डाऊनलोड |
२) | जिल्हा परिषद शाळा . ता. जि. येथील इयत्ता ४ थी च्या विद्यार्थांना खेळाद्वारे आरोग्यदायी सवयीचे विकसन व त्यांच्या परिणामकारकता अभ्यासणे. | डाऊनलोड |
३) | जिल्हा परिषद शाळा . ता. जि. येथील इयत्ता ५ वी च्या विद्यार्थांना खेळाद्वारे आरोग्यदायी सवयीचे विकसन व त्यांच्या परिणामकारकता अभ्यासणे. | डाऊनलोड |
४) | जिल्हा परिषद शाळा . ता. जि. येथील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थांना खेळाद्वारे आरोग्यदायी सवयीचे विकसन व त्यांच्या परिणामकारकता अभ्यासणे. | डाऊनलोड |
५) | जिल्हा परिषद शाळा . ता. जि. येथील इयत्ता ७ वी च्या विद्यार्थांना खेळाद्वारे आरोग्यदायी सवयीचे विकसन व त्यांच्या परिणामकारकता अभ्यासणे. | डाऊनलोड |
६) | जिल्हा परिषद शाळा... या शाळेतील मराठी माध्यमातील इयत्ता दुसरीच्या वर्गामधील गैरहजर राहणाऱ्या विध्यार्थ्यांच्या कारणांचा शोध व उपाय | डाऊनलोड |
७) | जिल्हा परिषद शाळा... या शाळेतील मराठी माध्यमातील इयत्ता तिसरीच्या वर्गामधील गैरहजर राहणाऱ्या विध्यार्थ्यांच्या कारणांचा शोध व उपाय | डाऊनलोड |
८) | जिल्हा परिषद शाळा... या शाळेतील मराठी माध्यमातील इयत्ता चौथी च्या वर्गामधील गैरहजर राहणाऱ्या विध्यार्थ्यांच्या कारणांचा शोध व उपाय | डाऊनलोड |
९) | जिल्हा परिषद शाळा... या शाळेतील मराठी माध्यमातील इयत्ता पाचवी च्या वर्गामधील गैरहजर राहणाऱ्या विध्यार्थ्यांच्या कारणांचा शोध व उपाय | डाऊनलोड |
१०) | जिल्हा परिषद शाळा... या शाळेतील मराठी माध्यमातील इयत्ता सहावी च्या वर्गामधील गैरहजर राहणाऱ्या विध्यार्थ्यांच्या कारणांचा शोध व उपाय | डाऊनलोड |
११) | “इयत्ता 9 वी “क” च्या वर्गातील विद्यार्थ्यांना भुमिती विषयातील प्रमेय सोडविण्यात येणा-या अडचणींचा शोध घेणे व त्यावरील उपाय योजना सुचविणे.” | डाऊनलोड |
१२) | इयत्ता 10 (अ) च्या वर्गातील विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान या विषयातील रासायनिक अभिक्रिया लिहितांना येणाऱ्या समस्यांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना सुचविणे.” | डाऊनलोड |
१३) | जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळेतील इयत्ता ८ वी च्या विद्यार्थांना विज्ञान विषयातील रासायनिक समिकरणे लिहिताना येणा-या अडचाणींचा शोध घेऊन उपाययोजनांची परिणामकता तपासणे. | डाऊनलोड |
१४) | विषय - इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना गणित विषयातील एकचल समीकरण या घटकांतीक उकल काढताना येणाऱ्या समस्यांचा शोध होणे व त्यावरउपाययोजनांची परिणामकारता अभ्यासणे | डाऊनलोड |
१५) | --------------- येथील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय करत असताना येणा-या समस्यांचा शोध घेऊन त्या वरील उपायांची परिणामकता अभ्यासणे.” | डाऊनलोड |
१६) | “जिल्हा परिषद शाळा -------------- येथील इयत्ता ५ वीच्या विद्यार्थांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.” | डाऊनलोड |
अ.क्र | विषय | डाऊलोड |
---|
०१ | ---------------- येथील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय करत असताना येणा-या समस्यांचा शोध घेऊन त्या वरील उपायांची परिणामकता अभ्यासणे.” | Download |
०२ | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ------------- येथील इयत्ता ३ री च्या विद्यार्थांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.” | Download |
०३ | “जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा ------------ मराठी येथील इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करून उपायांची परिणामकता अभ्यासणे.” | Download |
०४ | जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळेतील इयत्ता ८ वी च्या विद्यार्थांना विज्ञान विषयातील रासायनिक समिकरणे लिहिताना येणा-या अडचाणींचा शोध घेऊन उपाययोजनांची परिणामकता तपासणे. | Download |
०५ | “जिल्हा परिषद शाळा -------------- येथील इयत्ता ५ वीच्या विद्यार्थांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.” | Download |
०६ | “जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ------ येथील इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयातील अक्षवृत्त व रेखावृत्त या संबोधाच्या अकलानासाठी उपक्रमांची निर्मिती करुन त्यांची परिणामकारता तपासणे .” | Download |
०७ | जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ------ येथील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांना मराठी विषयातील स्वाध्याय करत असताना येणा-या समस्यांचा शोध घेऊन त्या वरील उपायांची परिणामकता अभ्यासणे. | Download |
आपणास नवोपक्रम हवा असेल तर कृपया खालिल फॉर्म भरा

कृतिसंशोधन डाऊनलोड
अ.क्र | विषय | डाऊनलोड |
---|
१) | इयत्ता १ ली विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे | डाऊनलोड |
२) | इयत्ता २ री विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे | डाऊनलोड |
३) | इयत्ता ३ री विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे | डाऊनलोड |
४) | इयत्ता ४ थी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे | डाऊनलोड |
५) | इयत्ता ५ वी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे | डाऊनलोड |
६) | इयत्ता ६ वी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे | डाऊनलोड |
७) | इयत्ता ७ वी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे | डाऊनलोड |
८) | इयत्ता ८ वी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे | डाऊनलोड |
९) | इयत्ता ९ वी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे | डाऊनलोड |
१० | इयत्ता १० वी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे | डाऊनलोड |
0 Comments