आपणास वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी Kruti sanshodhan in Marathi कृतिसंशोधन आराखडा सादर करावा लागतो. कृतीसंसोधन अहवाल वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी कृतीसंशोधन अहवाल सादर करावा लागतो. असा कृतीसंशोधन अहवाल कसा लेखन करावा. त्यामध्ये कोणकोणत्या बाबींंचा समावेश करावा लागतो. याविषयीची माहीती आपण घेणार आहोत. यामधील भाग १ ते ३ आपण या आगोदर अभ्यासले आज आपण प्रकरण पहिले पाहणार आहोत.
कृतिसंशोधन स्वरूप
संशोधनाच्या इतर प्रकारांपेक्षा कृतिसंशोधन भिन्न
आहे. 'कृतिसंशोधन' या संज्ञेत दोन शब्द समाविष्ट आहेत. एक
म्हणजे 'कृती' आणि दुसरे म्हणजे 'संशोधन', या दोन शब्दांनी 'कृतिसंशोधन'
हा जोड शब्द तयार होतो. या दोन शब्दाच्या फोडीवरून आपणास नेमका अर्थ
समदण्यास मदत होते. कृती आणि संशोधन.
आपण शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षे आपण आपल्या
समस्या सोडविण्यासाठी किंवा आपले कार्य अधिक दर्जेदार, प्रभावी व चांगले करण्यासाठी
नवीन उपक्रम किंवा कृती करत असतो. ही कृती किंवा उपक्रम किती परिणामकारक आहे, याची शास्त्रशुद्ध पद्धतीने पडताळणी घेतोच असे नाही. संशोधन आणि
कृतीसंशोधनात काय फरक असतो ते समजून घेऊ. संशोधनात संशोधकाला स्वतःला समस्येची झळ
लागलेली असतेच असे नाही. त्याला संशोधनाचे तंत्र माहीत असते, पण प्रत्यक्ष क्षेत्रीय स्थितीची त्याला कमी जाणीव असते. परंतु कृतिसंशोधनात
मात्र शिक्षक आपल्या वर्गात अथवा शाळेत जाणवणाऱ्या समस्या निवडतात. त्यांची झळ
त्यांना लागलेली असते.
शिक्षक त्या समस्या पूर्णपणे सोडविण्यासाठी स्वतः
अथवा सहकाऱ्यांच्या मदतीने काही विशेष कृती किंवा उपक्रम योजत असतात. या
उपक्रमांची अंमलबजावणी शास्त्रशुद्ध पद्धतीने व सहेतुकपणे केली जात असते. तसेच या
उपक्रम अथवा कृर्तीची परिणामकारकता तपासणे अपरिहार्य असते. हया कृतीतून समस्येचे
संपूर्ण निराकरण झाले नाही तर पुन्हा वेगळ्या कृतींची योजना व कार्यवाही करणे
क्रमप्राप्त असते. स्वाभाविकच स्वतः कृती करून, संशोधन करून काढलेले
निष्कर्ष अमलात आणताना त्यांची आंतरिक प्रेरणा अधिक परिणामकारक ठरते.
कर्ट लेविन यांच्या मते कृतिसंशोधन प्रक्रिया ही
आवर्तनांच्या स्वरूपात चालते. यात पुढील चार टप्प्यांचा समावेश असतो.
१) नियोजन
२) कृती
३) निरीक्षण
४) प्रत्याभरण.
हे चार टप्पे मिळून एक आवर्तन (कृतीसंशोधन) पूर्ण
होते.
पहिले आवर्तन (टप्पा/कृती)
कृतीसंशोधन समस्या निश्विती
शिक्षकाला समस्येची जाणीव झाल्यानंतर तो समस्या
निश्चिती करतो व समस्या सोडविण्यासाठी करावयाच्या कृतीचे काटेकोर नियोजन करतो.
दुसऱ्या टप्प्यात कृती करतो म्हणजेच नियोजनानुसार उपाययोजनेची कार्यवाही करतो. या
उपाययोजनेचे परिणाम कोणते याचे निरीक्षण करण्यासाठी विविध साधनांच्या साहाय्याने
मोजमाप करतो. या मोजमापातून आपली उपाययोजना समस्या सोडविण्यासाठी किती प्रमाणात
उपयुक्त ठरली याचे प्रत्याभरण घेतो. यश-अपयशांबाबत चिंतन करतो.
पहिल्या आवर्तनात कृती पुरेशी सफल न झाल्यास
दुसऱ्या आवर्तनास सुरुवात करावी लागते. साहजिकच दुसऱ्या आवर्तनातील कृतीचे नियोजन
करताना ज्या विद्यार्थ्यांबाबत कृती अयशस्वी ठरली, त्यामागील
कारणांचा शोध घ्यावा लागतो. ती कारणे दूर करण्यासाठी भिन्न कृतीचे पुनर्नियोजन
करावे लागते. अयशस्वी विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नव्या उपाययोजनेवी पद्धतशीर
कार्यवाही करावी लागते. पहिल्या आवर्तनाप्रमाणेच दुसऱ्या आवर्तनातील कृतीच्या
अंमलबजावणीचे निरीक्षण करून प्रत्याभरण घेतले जाते. याचप्रकारे आवश्यकता असल्यास
तिसऱ्या आवर्तनाची योजना करावी लागते. म्हणजेच एकूण अपेक्षित हेतू साध्य होईपर्यंत
पुनःपुन्हा नवीन उपाययोजना करत रहावी लागते. यालाच कृतिसंशोधनाची 'आवर्ती मांडणी' असे म्हणतात.
कृतीसंशोधन उदाहरण-
४० विदयार्थिसंख्या असलेल्या एका वर्गात शिक्षक
खालील समस्येवर कृतिसंशोधन करू इच्छितात.
संशोधनाचा विषय : "इ. ५ वी तील
विद्यार्थ्यांच्या लेखनातील चुका शोधून त्यांचे शुद्धलेखन सुधारण्यासाठी उपाययोजना
करणे."
पहिला टप्पा: नियोजन
वरील संशोधनासाठी खालील नियोजन करावे लागेल.
अ) विद्यार्थी लेखनामध्ये कोठे, का व कसे चुकतात हे शोधणे,
ब) किती विद्यार्थी चुकतात हे शोधणे.
क) चुका शोधून काढण्याकरिता / मूल्यमापनाकरिता
साधने बनविणे.
ड) शाळेच्या वेळेचे आणि उपक्रम राबविण्यासाठी
लागणाऱ्या वेळेचे योग्य नियोजन करणे इत्यादी.
दुसरा टप्पा : कृती -
संशोधनासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचे व्यवस्थित नियोजन केल्यावर प्रत्यक्ष कृतीस
प्रारंभ केला जातो. त्यामध्ये नियोजलेले उपक्रम प्रत्यक्ष राबविले जातात. काही
उपक्रम पुढीलप्रमाणे -
अ) परिच्छेद लेखन करणे.
ब) शब्द, जोडशब्द व
जोडाक्षरे यांच्या तक्त्यांवरून शुद्धलेखन सराव घेणे,
क) शब्दांच्या पट्ट्वा दाखवून त्याप्रमाणे लिहिणे.
ड) परिसरातील दुकानांच्या पाट्या वाचून लिहिणे.
इ) चुकीचा शब्द खोडणे.
फ) वर्गातील मुला-मुलींची जोडाक्षरयुक्त नावे
लिहिणे.
तिसरा टप्पा -
निरीक्षण - प्रत्यक्ष कृर्तींचे आयोजन केल्यानंतर तयार केलेल्या मूल्यमापन
साधनांचा वापर करून निष्कर्ष काढणे, हे प्रामुख्याने
या टप्प्यामध्ये केले जाते
वरील संशोधन करताना निरीक्षण करून शिक्षकांच्या असे
लक्षात आले की ४० विद्याथ्यपैकी २० विद्यार्थ्यांच्या शुद्धलेखनात चुका होतात.
चौथा टप्पा :
प्रत्याभरण - मूल्यमापन साधनाच्या साहाय्याने प्राप्त झालेल्या निष्कर्षांचे
निरीक्षण या टप्प्यात केले जाते. यामध्ये निश्चित असा निकाल मांडला जातो. वरील
संशोधनामध्ये मुलांच्या चुकांचे प्रमाण किती कमी झाले हे पाहणे व त्यासाठी
प्रत्याभरण घेणे, हे या टप्प्यात येते. प्रस्तुत
संशोधनामध्ये शिक्षकांच्या असे लक्षात आले, की ४० पैकी २०
विद्यार्थ्यांच्या शुद्धलेखनात अद्याप चुका होतात.
शेवटचा निकाल हा अपेक्षित नियोजनानुसार
नसल्याकारणाने प्रस्तुत संशोधनामध्ये शिक्षकाला दुसऱ्या आवर्तनासाठी पुनर्नियोजन
करावे लागते. दुसऱ्या आवर्तनामध्ये शिक्षक राहिलेल्या २० विद्यार्थ्यांच्या
शुद्धलेखनातील चुका पूर्णपणे घालविण्यासाठी प्रयत्न करतात व त्याप्रमाणे उपक्रम
राबवून पुनः प्रत्याभरण घेतात. दुसऱ्या आवर्तनावरूनही जर अपेक्षित निकाल मिळाला
नाही तर शिक्षकांना तिसऱ्या आवर्तनाची तयारी करावी
कृतिसंशोधनाची वैशिष्ट्ये -
१. शिक्षकांनी आपल्या शाळेतील अथवा वर्गातील
समस्यांचा शोध घेऊन त्यांच्या निराकरणासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली
उपाययोजना व त्या उपाययोजनांच्या परिणामांबाबत घेतलेले प्रत्याभरण असे
कृतिसंशोधनाचे स्वरूप असते. त्यामुळे कृतिसंशोधन हे अन्य संशोधनापेक्षा मर्यादित
वेळात,
मर्यादित खर्चात, उपलब्ध साधनसामग्रीच्या
साहाय्याने केले जाते.
२. कृतिसंशोधन वैयक्तिक स्वरूपात केले जाते, तसेच तीच समस्या शाळेतील अधिक शिक्षकांना जाणवत असेल तर एकापेक्षा अधिक
शिक्षक एकत्रितरीत्या, समविचाराने, सहयोगी
स्वरूपात कृतिसंशोधन हाती घेऊ शकतात. याच प्रकारे शालेय स्तरावर तसेच
जिल्हास्तरावर कृतिसंशोधन हाती घेता येते.
३. कृतिसंशोधनातून आपल्याच वर्गातील, शाळेतील तात्कालिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे
यामध्ये केलेल्या उपाययोजनाही विशिष्ट शाळेतील वा वर्गातील विद्यार्थ्यांची
वैशिष्ट्ये लक्षात घेऊन योजलेल्या असतात. साहजिकच कृतिसंशोधनाचे निष्कर्ष त्या
शाळेपुरते वा वर्गापुरते मर्यादित असतात. त्याचे व्यापक सामान्यीकरण करता येत
नाही. म्हणजेच कृतिसंशोधनाचे निष्कर्ष जसेच्या तसे सर्व ठिकाणी लागू पडतील,
असे नाही.
४. अन्य संशोधनाप्रमाणे निष्कर्षांनंतर कृतिसंशोधन
थांबत नाही तर संशोधनात समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांची अपेक्षित प्रगती साध्य
होईपर्यंत कृतिसंशोधनाची आवर्तने सुरू राहतात. समस्या निराकरणासाठी विशिष्ट कृत्ती
असफल ठरल्यास पर्यायी कृतींचा अवलंब केला जातो. सर्वांनी अपेक्षित प्रगती
केल्यानंतरही शिक्षक नवीन समस्या सोडविण्यासाठी पुन्हा कृतिसंशोधनाचे नियोजन करतो.
त्यामुळे कृतिसंशोधन ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे.
५. कृतिसंशोधनाचा आराखडा लवचीक असतो व त्यामध्ये
कृतीचे पुनर्नियोजन करताना, कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी तसेच
मापन साधनाच्या अनुषंगाने शिक्षक आवश्यक ते बदल करू शकतात.
कृतिसंशोधनाची गरज -
सर्व शिक्षा अभियान २००१, सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम, २००७,
बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ (RTE 2009), सातत्यपूर्ण सर्वंकष
मूल्यमापनाबाबतचा सप्टेंबर २०१० चा महाराष्ट्र शासनाचा निर्णय यांसारख्या शैक्षणिक
धोरणांच्या पूर्ततेच्या दृष्टिकोनातून शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या गुणात्मक व
संख्यात्मक वाढीसाठी विविध शैक्षणिक कृतिसंशोधने हाती घेणे गरजेचे आहे.
कृतिसंशोधनाच्या आवश्यकतेबाबत पुढील मुद्दे
नोंदविता येतात.
१. विविध आर्थिक, शैक्षणिक
व सामाजिक स्तरांतून विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी
कृतिसंशोधनाद्वारा योग्य मार्ग उपलब्ध करून देता येतो.
२. कृतिसंशोधन करताना शिक्षक अनेक नवीन उपक्रम, कृती व पद्धती यांची कल्पक योजना करतात. त्यातून दर्जेदार
अध्ययन-अध्यापनासाठी योग्य ती वातावरणनिर्मिती होते.
३. सन २००५ च्या अभ्यासक्रम आराखड्यातील अपेक्षित
ज्ञानरचनावाद प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्याथ्यर्थ्यांना रुचतील, पचतील अशी विविध परिणामकारक अध्यापन तंत्रे कृतिसंशोधनाद्वारा विकसित
करता येतात.
४. शिक्षणातील बदलते विचार प्रवाह, प्रत्यक्षात वर्गात आणण्याच्या दृष्टीने शिक्षक प्रयत्नशील राहतात. शिक्षक
समस्या निराकरण संशोधकवृत्तीने करतात व त्या माध्यमातून त्यांचा व्यावसायिक विकास
होत राहतो.
१.७ कृतिसंशोधनाचे फायदे -
१) कृतिसंशोधनाद्वारा उत्साही, कल्पक व प्रयोगशील शिक्षक घडविता येतात.
२) कृतिसंशोधनाद्वारा शिक्षणक्षेत्राशी बांधीलकीची
जाणीव जागृत करता येते.
३) शिक्षणाची अद्ययावतता, शिक्षण पद्धतीची व्यवहार्यता व उपयुक्तता वाढविण्यासाठी व टिकविण्यासाठी
कृतिसंशोधनाचा उपयोग होतो.
४) उपलब्ध वेळ, पैसा व सामग्री
यांचा अधिकाधिक वापर करता येण्याचे कौशल्य संशोधक शिक्षकाला प्राप्त होते.
५) विद्यार्थी, पालक आणि समाज
यांचा शिक्षणकार्यात कृतियुक्त सहभाग साधण्याचा मार्ग उपलब्ध होतो.
कृतिसंशोधनाचे महत्त्व -
विद्यार्थ्यांच्या गुणात्मक व संख्यात्मक वाढीसाठी
शिक्षकाला विविध शैक्षणिक कृतिसंशोधने हाती घ्यावी लागणार आहेत. शिक्षक, विद्यार्थी, पालक या सर्वांच्या दृष्टिकोनांतून
कृतिसंशोधनाचे महत्त्व आपण जाणून घेऊ या.
१. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील त्रुटी दूर केल्या
जातात.
२. विदद्यार्थ्यांमध्ये एखादया विषयाची आवड अथवा
रुची निर्माण होते.
३. विदद्यार्थ्यांमध्ये नवीन कौशल्ये प्राप्त
होतात.
४. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागविण्याकरिता
योग्य मार्ग उपलब्ध होतो.
५. शिक्षकांच्या अध्यापनाची परिणामकारकता वाढविता
येते.
६. शिक्षकांमध्ये विविध कृतिकार्यक्रम करण्याची
प्रेरणा निर्माण होते.
७. शिक्षकांना नवे तंत्र/नवीन पद्धती निवडण्याचे
कौशल्य प्राप्त होते.
८. विद्यार्थ्यांचे स्वाध्याय, आरोग्यसवयी, आहार यांबाबत पालकांना योग्य दृष्टिकोन
प्राप्त होतो.
९. शिक्षकांची नवनिर्मिती क्षमता वाढीस लागते.
१०. नवनवीन प्रयोगांमुळे शैक्षणिक संस्थांचा
गुणात्मक दर्जा वाढण्यास मदत होते.
कृतिसंशोधनाची कार्यक्षेत्रे -
शैक्षणिक गुणवत्ता विकास व शालेय स्तरावरील समस्या
निराकरण करणे हे कृतिसंशोधनाचे प्रमुख हेतू आहेत. शालेय वातावरणाच्या अनुषंगाने
विविधांगी शैक्षणिक व्यवहारांमधील अनेकविध बाबींचा समावेश कृतिसंशोधनाच्या
कार्यक्षेत्रामध्ये होतो. कृतिसंशोधनाच्या कार्यक्षेत्रामध्ये शिक्षकांना स्थळ, काल व परिस्थितीनुसार अनेकविध समस्या जाणवतात म्हणून कृतिसंशोधनाची समस्या
व निश्चितीबाबत आपण पुढील प्रकरणात विस्ताराने माहिती घेणार आहोतच. तूर्तास
कृतिसंशोधन कार्यक्षेत्राची यादी (विषयांची यादी) उदाहरणादाखल आपण पाहू या.
१) अभ्यासक्रम
२) पाठ्यपुस्तक
३) भौतिक सुविधा
४) शैक्षणिक साहित्याची निर्मिती
५) शालेय स्तरावरील प्रशासन
६) शालेय समित्या
७) शालेय परिसर
८) अध्यापनपद्धती, तंत्रे
९) अध्ययन अनुभव
१०) शिक्षक व विद्यार्थी यांची वर्गातील आंतरक्रिया
११) शिक्षक, विद्यार्थी व
पालक यांची वर्गाबाहेरील आंतरक्रिया
१२) अभ्यासानुवर्ती उपक्रम
१३) मूल्यमापन प्रक्रिया
१४) विदयार्थी व्यक्तिमत्त्व विकसन
१५) जीवनकौशल्ये विकसन
१६) आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
१७) उपलब्ध शैक्षणिक साहित्याचा सुयोग्य वापर
१८) सांस्कृतिक उपक्रम
१९) अभ्यासेतर उपक्रम
२०) कार्यानुभव-उदयोग क्षेत्र
वरीलपेकी
कोणतेही एक क्षेत्र घेऊन आपण कृतीसंशोधन समस्या निवडून आपले कृतीसंशोधन पूर्ण करू
शकता.
कृतीसंशोधन विषय व लिंक
अ.क्र | विषय | डाऊनलोड |
१) | जिल्हा परिषद शाळा . ता. जि. येथील इयत्ता ३ री च्या विद्यार्थांना खेळाद्वारे आरोग्यदायी सवयीचे विकसन व त्यांच्या परिणामकारकता अभ्यासणे. |
|
२) | जिल्हा परिषद शाळा . ता. जि. येथील इयत्ता ४ थी च्या विद्यार्थांना खेळाद्वारे आरोग्यदायी सवयीचे विकसन व त्यांच्या परिणामकारकता अभ्यासणे. |
|
३) | जिल्हा परिषद शाळा . ता. जि. येथील इयत्ता ५ वी च्या विद्यार्थांना खेळाद्वारे आरोग्यदायी सवयीचे विकसन व त्यांच्या परिणामकारकता अभ्यासणे. |
|
४) | जिल्हा परिषद शाळा . ता. जि. येथील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थांना खेळाद्वारे आरोग्यदायी सवयीचे विकसन व त्यांच्या परिणामकारकता अभ्यासणे. |
|
५) | जिल्हा परिषद शाळा . ता. जि. येथील इयत्ता ७ वी च्या विद्यार्थांना खेळाद्वारे आरोग्यदायी सवयीचे विकसन व त्यांच्या परिणामकारकता अभ्यासणे. |
|
६) | जिल्हा परिषद शाळा... या शाळेतील मराठी माध्यमातील इयत्ता दुसरीच्या वर्गामधील गैरहजर राहणाऱ्या विध्यार्थ्यांच्या कारणांचा शोध व उपाय |
|
७) | जिल्हा परिषद शाळा... या शाळेतील मराठी माध्यमातील इयत्ता तिसरीच्या वर्गामधील गैरहजर राहणाऱ्या विध्यार्थ्यांच्या कारणांचा शोध व उपाय |
|
८) | जिल्हा परिषद शाळा... या शाळेतील मराठी माध्यमातील इयत्ता चौथी च्या वर्गामधील गैरहजर राहणाऱ्या विध्यार्थ्यांच्या कारणांचा शोध व उपाय |
|
९) | जिल्हा परिषद शाळा... या शाळेतील मराठी माध्यमातील इयत्ता पाचवी च्या वर्गामधील गैरहजर राहणाऱ्या विध्यार्थ्यांच्या कारणांचा शोध व उपाय |
|
१०) | जिल्हा परिषद शाळा... या शाळेतील मराठी माध्यमातील इयत्ता सहावी च्या वर्गामधील गैरहजर राहणाऱ्या विध्यार्थ्यांच्या कारणांचा शोध व उपाय |
|
११) | “इयत्ता 9 वी “क” च्या वर्गातील विद्यार्थ्यांना भुमिती विषयातील प्रमेय सोडविण्यात येणा-या अडचणींचा शोध घेणे व त्यावरील उपाय योजना सुचविणे.” |
|
१२) | इयत्ता 10 (अ) च्या वर्गातील विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान या विषयातील रासायनिक अभिक्रिया लिहितांना येणाऱ्या समस्यांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना सुचविणे.” |
|
१३) | जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळेतील इयत्ता ८ वी च्या विद्यार्थांना विज्ञान विषयातील रासायनिक समिकरणे लिहिताना येणा-या अडचाणींचा शोध घेऊन उपाययोजनांची परिणामकता तपासणे. |
|
१४) | विषय - इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना गणित विषयातील एकचल समीकरण या घटकांतीक उकल काढताना येणाऱ्या समस्यांचा शोध होणे व त्यावरउपाययोजनांची परिणामकारता अभ्यासणे |
|
१५) | ------- येथील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय करत असताना येणा-या समस्यांचा शोध घेऊन त्या वरील उपायांची परिणामकता अभ्यासणे.” |
|
१६) | “जिल्हा परिषद शाळा ------- येथील इयत्ता ५ वीच्या विद्यार्थांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.” |
|
अ.क्र | विषय | डाऊलोड |
०१ | ---------------- येथील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय करत असताना येणा-या समस्यांचा शोध घेऊन त्या वरील उपायांची परिणामकता अभ्यासणे.” | |
०२ | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ------------- येथील इयत्ता ३ री च्या विद्यार्थांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.” | |
०३ | “जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा ------------ मराठी येथील इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करून उपायांची परिणामकता अभ्यासणे.” | |
०४ | जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळेतील इयत्ता ८ वी च्या विद्यार्थांना विज्ञान विषयातील रासायनिक समिकरणे लिहिताना येणा-या अडचाणींचा शोध घेऊन उपाययोजनांची परिणामकता तपासणे. | |
०५ | “जिल्हा परिषद शाळा -------------- येथील इयत्ता ५ वीच्या विद्यार्थांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.” ' | |
०६ | “जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ------ येथील इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयातील अक्षवृत्त व रेखावृत्त या संबोधाच्या अकलानासाठी उपक्रमांची निर्मिती करुन त्यांची परिणामकारता तपासणे.” (शिवाजी फॉन्टमध्ये उपल्बध) | |
०७ | जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ------ येथील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांना मराठी विषयातील स्वाध्याय करत असताना येणा-या समस्यांचा शोध घेऊन त्या वरील उपायांची परिणामकता अभ्यासणे. | |
अ.क्र | विषय | डाऊनलोड |
१) | इयत्ता १ ली विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे | |
२) | इयत्ता २ री विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे | |
३) | इयत्ता ३ री विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे | |
४) | इयत्ता ४ थी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे | |
५) | इयत्ता ५ वी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे | |
६) | इयत्ता ६ वी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे | |
७) | इयत्ता ७ वी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे | |
८) | इयत्ता ८ वी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे | |
९) | इयत्ता ९ वी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे | |
१० | इयत्ता १० वी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे |
--------------------------------
“---- येथील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय करत असताना येणा-या समस्यांचा शोध घेऊन त्या वरील उपायांची परिणामकता अभ्यासणे.” डाऊनलोड
--------------------------------
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ----- येथील इयत्ता ३ री च्या विद्यार्थांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनातयेणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांचीपरिणामकता अभ्यासणे.” डाऊनलोड
---------------------------------
“जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा ----- येथील इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयातील नकाशावाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करून उपायांची परिणामकता अभ्यासणे.” डाऊनलोड
--------------------------------
इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांत समाजशास्रातील “इतिहास” या विषयाच्या अध्ययनातील असलेली अनास्था दूर करण्यासाठीच्या उपचारात्मक कार्यक्रमाच्या परिणामकारकतेचा अभ्यास डाऊनलोड
-------------------------------
“जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ---- ता. --- जि. ठाणे येथील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांना इतिहास विषयातील स्वाध्याय करत असताना येणा-या समस्यांचा शोध घेऊन त्या वरील उपायांची परिणामकता अभ्यासणे.” डाऊनलोड
नवोपक्रम
0 Comments