Ticker

6/recent/ticker-posts

Kruti Shashodhan Arakhada कृतिसंशोधन आराखडा नमुना

 आपणास विविध अभ्यासक्रम करत असताना कृतीसंशोधन तयार करण्यास सांगितले जाते. कृतीसंशोधन अर्थात Action research. कोणत्याही विषयावरील कृतीसंशोधन तयार करण्यापूर्वी आपणास त्या विषयाचा कृतीसंशोधन अराखडा तयार करावा लागतो. कृतिसंशोधन आराखडा म्हणजे आपले कृतीसंशोधन तयार करण्याचे थोडक्यात नियोजन असते. कृतिसंशोधन आराखडा मध्ये आपण हे कृतीसंशोधन कसे पूर्ण करणार आहात. कोणत्या बाबी निवडणार आहात कोणाचे मार्गदर्शन घेणार आहात. कोणता विषय निवडणार आहात सोबतच आपल्या कृतीसंशोधनाची कार्यवाही कशी असेल याविषयीची माहिती त्यात दिलेली असते. कृतिसंशोधन आराखडा बनवत असताना आपणास सर्व बाबींचा विचार करून नियोजन करावे लागते. कृतिसंशोधन आराखडा जर आपला योग्य असेल तर आपले संशोधन यशस्वी होत असते. असा कृतिसंशोधन अराखडा तर करताना आपणास करावी लागणारी तयारी व नमुना कृतिसंशोधन आराखडा कसा असतो याविषयी माहिती घेऊ. 

कृतिसंशोधन आराखडा बनवत असताना आपणास प्रथम आपला विषय निश्चित करावा लागतो. विषय निश्चित झाला की त्यावर आधारीत सर्व माहितीचे संकलन करावे लागते जसे कृतिसंशोधन प्रस्तावना, संशोधनाची गरज, संशोधनाचे महत्त्व, समस्या विधान, कार्यात्मक व्याख्या, उद्दिष्टे इत्यादी बाबी तयार करून त्या लिहाव्यात. आपला कृतिसंशोधन आराखडा पूर्ण झाल्यानंतर तो आपल्या मार्गदर्शकाकडून तपासून घ्यावा व त्यानी काही सूचना दिल्या तर तो बदल करून कृतिसंशोधन आराखडा मंजूर करून कृतीसंशोधन करण्यास सुरवात करावी. 

Kruti Shashodhan Arakhada कृतिसंशोधन आराखडा नमुना

कृतिसंशोधन आराखडा नमुना

संशोधकाचे नाव - श्री. सचिन शिवाजी मोहिते  (प्राथमिक शिक्षक)
जि. प. मराठी प्राथ. शाळा, बोरगाव (खुर्द) , ता. अंबाजोगाई, जि. बीड.

योजना - महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संसोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अंतर्गत, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण परिषद (DIET) यांच्या सयुंक्त विद्यमानाने  'निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण सन २०२५'

शीर्षक - इ. २ री च्या हिंदी भाषिक विद्यार्थ्यांच्या मराठी भाषेतील शुद्ध उच्चारणासाठी उपक्रम निर्मिती व त्यांच्या परिणामांचा अभ्यास.
अ.क्र घटक
१) प्रस्तावना
२) संशोधनाची गरज
३) संशोधनाचे महत्त्व
४) समस्या विधान
५) कार्यात्मक व्याख्या
६) उद्दिष्टे
७) व्याप्ती व मर्यादा
८) व्याप्ती व मर्यादा
९) संशोधनाची कार्यवाही
१०) संशोधनाची साधने
११) प्रत्यक्ष कार्यवाही
१२) वेळापत्रक
१३) खर्चाचे अंदाजपत्रक
१४) परिशिष्टे

१. प्रस्तावना
भाषा हे विचार विनिमयाचे आणि संभाषणाचे प्रमुख माध्यम आहे. आपले विचार, कल्पना भाषेच्याच माध्यमातून आपण इतरांपर्यंत पोहोचवितो. त्यामुळे भाषेच्या सर्व कौशल्यांवर आपले वर्चस्व असणे आवश्यक आहे. उन्हा गावात राजपूत समाजातील लोक राहतात. त्यामुळे त्यांची मातृभाषा हिंदी असल्याने मराठी अध्यापन करत असताना, संशोधकास विदद्यार्थ्यांच्या अशुद्ध उच्चारांची जाणीव झाली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांची अभिव्यक्ती अशुद्ध उच्चारांमुळे कुठे तरी खटकते, शिवाय भाषा अशुद्ध असल्यामुळे काही विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो, यामुळे संशोधकास या समस्येचा विचार करणे भाग पडले.

२. संशोधनाची गरज
विद्यार्थ्यांच्या उच्चारातील अशुद्धता ही त्यांच्या लेखनातील अशुद्धतेचे कारण बनत आहे, असे संशोधकाच्या लक्षात आले. विद्यार्थी जसे बोलतात, त्याप्रमाणे लिहितात. त्यामुळे या समस्येचा विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होतो, असे लक्षात आले. काही विशिष्ट समाजात, वर्षानुवर्षे काही अक्षरांचे उच्चार चुकीच्या स्वरूपात केले जातात. त्यामुळे त्यांचे अर्थही बदलतात. उदा. 'क'चा उच्चार विद्यार्थी 'को' असा करतात, 'श'चा 'शो', 'ळ'चा 'लो', 'ल'चा 'लो, 'त'चा 'तो', 'क्ष'चा 'सो' असा उच्चार करतात. 'ज्ञ'चा उच्चार विदद्यार्थी 'अज्ञो' असा करतात. इयत्ता २रीच्या हिंदी भाषिक विद्यार्थ्यांवर अशाच बोलीभाषेचा पगडा असल्यामुळे त्यांचे उच्चार अशुद्ध आहेत. शास्त्रशुद्ध पद्धतीने काही उपाययोजना राबविण्याची गरज आहे. योग्य उच्चारस्थानांची माहिती देण्यासाठी उपक्रमनिर्मिती केल्यास विद्यार्थ्यांच्या उच्चारणात शुद्धता येईल, असे संशोधकास वाटते.


३. संशोधनाचे महत्त्व -
निरनिराळ्या सामाजिक परिस्थितीत निरनिराळी भाषा बोलली जाते. महाराष्ट्राच्या कानाकोफ्यांत वेगवेगळ्या बोली भाषा बोलल्या जातात. विशेषतः इ. २ री च्या विद्यार्थ्यांवर या बोली भाषेचा फार मोठा प्रभाव असतो. त्यामुळे शालेय जीवनाच्या या सुरुवातीच्याच टप्प्यावर त्यांना हळूहळू बोलीभाषेकडून प्रमाण भाषेकडे नेणे, महत्त्वाचे असते. उच्चारांतील शुद्धता विद्यार्थ्यांना संभाषण शुद्धता व लेखन शुद्धतेकडे घेऊन जाते.

४. समस्या विधान - जि. प. मराठी प्राथ. शाळा, बोरगाव (खुर्द) , ता. अंबाजोगाई, जि. बीड येथील इ. २ री च्या हिंदी भाषिक विद्यार्थ्यांच्या मराठी भाषेतील शुद्ध उच्चारणासाठी उपक्रम निर्मिती व त्यांच्या परिणामाचा अभ्यास करणे.

५. कार्यात्मक व्याख्या
  • शाळा -स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आस्थापनेतील शाळांपैकी एक शाळा..
  • बोरगाव (खुर्द) - हे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्याच्या उत्तरेस वसलेले छोटेसे गाव.
  • इ. २ री चे विद्यार्थी - प्राथमिक शाळेतील दुसऱ्या वर्गात अध्ययन करणारे विदद्यार्थी.
  • हिंदी भाषिक- राजपूत समाजातील हिंदी मातृभाषा बोलणारे.
  • शुद्ध उच्चारण- मुळाक्षरांच्या योग्य उच्चारस्थानांनुसार शुद्ध उच्चारण करता येणे.
  • उपक्रम निर्मिती - ध्वनीच्या योग्य उच्चारणासाठी विकसित केलेले उपक्रम.
  • परिणामाचा अभ्यास -  पूर्व चाचणी व उत्तर चाचणी यांच्या संपादनातील फरक
कृतिसंशोधन डाऊनलोड 

अ.क्र विषय डाऊनलोड
१) इयत्ता १ ली विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे डाऊनलोड
२) इयत्ता २ री विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे डाऊनलोड
३) इयत्ता ३ री विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे डाऊनलोड
४) इयत्ता ४ थी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे डाऊनलोड
५) इयत्ता ५ वी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे डाऊनलोड
६) इयत्ता ६ वी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे डाऊनलोड
७) इयत्ता ७ वी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे डाऊनलोड
८) इयत्ता ८ वी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे डाऊनलोड
९) इयत्ता ९ वी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे डाऊनलोड
१० इयत्ता १० वी विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणीचा शोध घेवून उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे डाऊनलोड

६. उद्दिष्टे -

१. इ. २ री च्या बाबतीत अशुद्ध उच्चारण असणाऱ्या विद्यार्थ्यांची सदद्धः स्थिती अभ्यासणे.
२. वरील पाठ्धांशासंदर्भात संपादन चाचणी तयार करणे.
३. विशिष्ट अक्षरांच्या योग्य उच्चाराचा सराव व्हावा, यासाठी उपक्रमनिर्मिती करून त्यांची अंमलबजावणी करणे.
४. उपक्रमांच्या परिणामांचा अभ्यास करणे.

७. कृतिपरिकल्पना- जर संशोधकनिर्मित उपक्रमांची अंमलबजावणी केली तर हिंदी भाषिक विद्यार्थ्यांच्या मराठी भाषेच्या उच्चारणात सुधारणा होईल.

८. व्याप्ती व मर्यादा -
अ) व्याप्ती - १. प्रस्तुत संशोधनातील उपक्रम इ. २ री च्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील.

ब) मर्यादा
१. सदर संशोधन बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत, उन्हा या शाळेतील इ. २ री च्या विद्यार्थ्यांसाठीच मर्यादित आहे.
२. हे संशोधन मराठी भाषेतील शुद्ध उच्चारणापुरतेच मर्यादित आहे.

९. संशोधनाची कार्यवाही -

अ) विद्यार्थ्यांच्या उच्चारांतील समस्या निश्चितीसाठी विदधाच्यर्थ्यांचे उच्चारण शुद्ध व्हावे यासाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करून अध्यापन करण्यात येईल. या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या उच्चारणांत किती प्रमाणात सुधारणा झाली याचे निरीक्षण केले जाईल व आवश्यकतेनुसार पुन्हा नवीन उपक्रमांच्या साहाय्याने उर्वरित विद्यार्थ्यांत सुधारणेसाठी दुसऱ्या आवर्तनाची योजना केली जाईल.

ब) अभिकल्प एकल गट पूर्वोत्तर चाचणी अभिकल्प,
क) चले-
१. स्वतंत्र चल संशोधक निर्मित उपक्रम.
२. परतंत्र चल विद्यार्थ्यांच्या उच्चारणातील संपादन.
ड) अभ्यासगट (नमुना)  - जि. प. मराठी प्राथमिक शाळा, बोरगाव खुर्द शाळेतील इ. २ री चे सर्व २६ विद्यार्थी,

१०. संशोधनाची साधने -

अ) माहिती संकलनाची साधने पूर्व चाचणी (मौखिक व लेखी), उत्तर चाचणी.
ब) माहिती विश्लेषणाची साधने शेकडेवारी व आलेख.

११. प्रत्यक्ष कार्यवाही -

अ) प्रथम पूर्व चाचणी तयार करून विद्यार्थ्यांना देण्यात येईल.
ब) चाचणीतील उत्तरांचे पृथक्करण करून त्रुटींचा शोध घेतला जाईल.
क) त्या त्रुटी दूर करण्यासाठी उपक्रम निर्मिती करण्यात येईल.
ड) उपक्रमांची कार्यवाही करण्यात येईल.
इ) विद्यार्थ्यांना उत्तर चाचणी देण्यात येईल.
फ) नंतर शेकडेवारी व आलेखाच्या साहाय्याने, पूर्व चाचणी व उत्तर चाचणीतील प्राप्त गुणांची तुलना करण्यात येईल.
ग) वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षित संपादन पातळी प्राप्त होईपर्यंत उपक्रमात आवश्यक बदल करून आवर्तने घेण्यात येतील.
ह) तुलनेच्या आधारे निष्कर्ष काढण्यात येतील.

१२. वेळापत्रक

१. समस्येची निवड - ८ दिवस
२. संबंधित पाठ्यांशाची निवड - ४ दिवस
३. आवश्यक संदर्भ साहित्य वाचन - ५ दिवस
४. उपक्रम किंवा कार्यक्रमाची निर्मिती - १५ दिवस
५. अभ्यासगट निवड पूर्व चाचणी देणे व तपासणे.- ८ दिवस
६. सराव किंवा कार्यवाही - ३० दिवस
७. उत्तर चाचणी देणे व तपासणे. - ८ दिवस
८. माहितीचे संकलन व विश्लेषण - ८ दिवस
९. अहवाल लेखन व छपाई - ३ दिवस
     एकूण -  १४९ दिवस

१३. खर्चाचे अंदाजपत्रक-

१. लेखन साहित्य- रु. १५०/-
२. चाचण्यांच्या टंकलिखित प्रती- रु. २००/-
३. उपक्रमांसाठी साहित्य- रु. ५००/-
४. अहवाल बांधणी, छपाई- रु. ६००/-
५. अन्य, टपालखर्च इ.- रु. १५०/-
अंदाजित एकूण खर्च रु. १६००/-

कृतिसंशोधन डाऊनलोड

अ.क्रविषयडाऊनलोड
१)जिल्हा परिषद शाळा . ता. जि. येथील इयत्ता ३ री च्या विद्यार्थांना खेळाद्वारे आरोग्यदायी सवयीचे विकसन व त्यांच्या परिणामकारकता अभ्यासणे.डाऊनलोड
२)जिल्हा परिषद शाळा . ता. जि. येथील इयत्ता ४ थी च्या विद्यार्थांना खेळाद्वारे आरोग्यदायी सवयीचे विकसन व त्यांच्या परिणामकारकता अभ्यासणे.डाऊनलोड
३)जिल्हा परिषद शाळा . ता. जि. येथील इयत्ता ५ वी च्या विद्यार्थांना खेळाद्वारे आरोग्यदायी सवयीचे विकसन व त्यांच्या परिणामकारकता अभ्यासणे.डाऊनलोड
४)जिल्हा परिषद शाळा . ता. जि. येथील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थांना खेळाद्वारे आरोग्यदायी सवयीचे विकसन व त्यांच्या परिणामकारकता अभ्यासणे.डाऊनलोड
५)जिल्हा परिषद शाळा . ता. जि. येथील इयत्ता ७ वी च्या विद्यार्थांना खेळाद्वारे आरोग्यदायी सवयीचे विकसन व त्यांच्या परिणामकारकता अभ्यासणे.डाऊनलोड
६)जिल्हा परिषद शाळा... या शाळेतील मराठी माध्यमातील इयत्ता दुसरीच्या वर्गामधील गैरहजर राहणाऱ्या विध्यार्थ्यांच्या कारणांचा शोध व उपायडाऊनलोड
७)जिल्हा परिषद शाळा... या शाळेतील मराठी माध्यमातील इयत्ता तिसरीच्या वर्गामधील गैरहजर राहणाऱ्या विध्यार्थ्यांच्या कारणांचा शोध व उपायडाऊनलोड
८)जिल्हा परिषद शाळा... या शाळेतील मराठी माध्यमातील इयत्ता चौथी च्या वर्गामधील गैरहजर राहणाऱ्या विध्यार्थ्यांच्या कारणांचा शोध व उपायडाऊनलोड
९)जिल्हा परिषद शाळा... या शाळेतील मराठी माध्यमातील इयत्ता पाचवी च्या वर्गामधील गैरहजर राहणाऱ्या विध्यार्थ्यांच्या कारणांचा शोध व उपायडाऊनलोड
१०)जिल्हा परिषद शाळा... या शाळेतील मराठी माध्यमातील इयत्ता सहावी च्या वर्गामधील गैरहजर राहणाऱ्या विध्यार्थ्यांच्या कारणांचा शोध व उपायडाऊनलोड
११)“इयत्ता 9 वी “क” च्या वर्गातील विद्यार्थ्यांना भुमिती विषयातील प्रमेय सोडविण्यात येणा-या अडचणींचा शोध घेणे व त्यावरील उपाय योजना सुचविणे.”डाऊनलोड
१२)इयत्ता 10 (अ) च्या वर्गातील विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान या विषयातील रासायनिक अभिक्रिया लिहितांना येणाऱ्या समस्यांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना सुचविणे.”डाऊनलोड
१३)जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळेतील इयत्ता ८ वी च्या विद्यार्थांना विज्ञान विषयातील रासायनिक समिकरणे लिहिताना येणा-या अडचाणींचा शोध घेऊन उपाययोजनांची परिणामकता तपासणे.डाऊनलोड
१४)विषय - इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना गणित विषयातील एकचल समीकरण या घटकांतीक उकल काढताना येणाऱ्या समस्यांचा शोध होणे व त्यावरउपाययोजनांची परिणामकारता अभ्यासणेडाऊनलोड
१५)--------------- येथील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय करत असताना येणा-या समस्यांचा शोध घेऊन त्या वरील उपायांची परिणामकता अभ्यासणे.”डाऊनलोड
१६)“जिल्हा परिषद शाळा -------------- येथील इयत्ता ५ वीच्या विद्यार्थांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.”डाऊनलोड


अ.क्रविषयडाऊलोड
०१---------------- येथील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय करत असताना येणा-या समस्यांचा शोध घेऊन त्या वरील उपायांची परिणामकता अभ्यासणे.”Download
०२जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ------------- येथील इयत्ता ३ री च्या विद्यार्थांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.”Download
०३“जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा ------------  मराठी येथील इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करून उपायांची परिणामकता अभ्यासणे.”Download
०४जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळेतील इयत्ता ८ वी च्या विद्यार्थांना विज्ञान विषयातील रासायनिक समिकरणे लिहिताना येणा-या अडचाणींचा शोध घेऊन उपाययोजनांची परिणामकता तपासणे.Download
०५“जिल्हा परिषद शाळा --------------  येथील इयत्ता ५ वीच्या विद्यार्थांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.”Download
०६“जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ------ येथील इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयातील अक्षवृत्त व रेखावृत्त या संबोधाच्या अकलानासाठी उपक्रमांची निर्मिती करुन त्यांची परिणामकारता तपासणे .”Download
०७जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा  ------  येथील इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांना मराठी विषयातील स्वाध्याय करत असताना येणा-या समस्यांचा शोध घेऊन त्या वरील उपायांची परिणामकता अभ्यासणे.Download



परिशिष्ट (क)
संशोधकाचे प्रतिज्ञापत्र

मी श्री. सचिन शिवाजी मोहिते  (प्राथमिक शिक्षक) प्रतिज्ञापत्र लिहून देतो/देते की, जि. प. मराठी प्राथ. शाळा, बोरगाव (खुर्द) , ता. अंबाजोगाई, जि. बीड या शाळेत प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असून  "इ. २ री च्या हिंदी भाषिक विद्यार्थ्यांच्या मराठी भाषेतील शुद्ध उच्चारणासाठी उपक्रम निर्मिती व त्यांच्या परिणामांचा अभ्यास" हे कृतिसंशोधन मी स्वतः पूर्ण केलेले आहे. प्रस्तुत कृतिसंशोधन कोणत्याही संस्थेच्या/शाळेच्या किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या संशोधनाशी संबंधित नाही. तसेच या पूर्वी प्रस्तुत कृतिसंशोधन कोणत्याही संस्थेच्या अनुदानाकरिता सादर करण्यात आलेले नाही. याची संशोधक हमी देत आहे. कृतिसंशोधनासाठी उपयोगात आणलेल्या संदर्भ साहित्याचा योग्य तो निर्देश या अहवालात करण्यात आलेला आहे.

दिनांक:

ठिकाण :

संशोधक,
(नाव व स्वाक्षरी)

परिशिष्ट (ड)
संस्था प्रमुख / मुख्याध्यापक प्रमाणपत्र
दिनांक : 
जा. क्र.
असे प्रमाणित करण्यात येते की  श्री. सचिन शिवाजी मोहिते  (प्राथमिक शिक्षक) हे प्राथमिक शिक्षक  या पदावर कार्यरत असून त्यांनी सन- २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये  "इ. २ री च्या हिंदी भाषिक विद्यार्थ्यांच्या मराठी भाषेतील शुद्ध उच्चारणासाठी उपक्रम निर्मिती व त्यांच्या परिणामांचा अभ्यास"  याविषयावर  हे कृतिसंशोधन स्वतः  जि. प. मराठी प्राथ. शाळा, बोरगाव (खुर्द) , ता. अंबाजोगाई, जि. बीड या शाळेत पूर्ण केलेले आहे.

दिनांक :
ठिकाण :
मुख्याध्यापक,
(स्वाक्षरी व शिक्का)



परिशिष्ट (इ)
मार्गदर्शकाचे प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते की, श्री. सचिन शिवाजी मोहिते  (प्राथमिक शिक्षक)  यांनी  "इ. २ री च्या हिंदी भाषिक विद्यार्थ्यांच्या मराठी भाषेतील शुद्ध उच्चारणासाठी उपक्रम निर्मिती व त्यांच्या परिणामांचा अभ्यास"  या विषयावर केलेले कृतिसंशोधन कोणत्याही स्तरावर स्पर्धेसाठी अथवा परीक्षेसाठी पाठविण्यात आलेले नाही. तसेच सदरहू कृतिसंशोधन कोणत्याही संस्थेच्या / शाळेच्या वा अन्य कोणत्याही प्रकारच्या संशोधनाशी संबंधित नाही. सदरहू संशोधन माझ्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेले आहे.

दिनांक :

ठिकाण :

मार्गदर्शक,
(स्वाक्षरी)


लेखन/संपादन/सहविचार/सहभागी तज्ज्ञ

१. डॉ. सुनंदा एडके, निवृत्त प्राचार्य, आदर्श बहुव्यापी शिक्षणशास्त्र महाविदयालय, पुणे.
२. डॉ. अमृता मराठे, सेवानिवृत्त प्रपाठक, एस.एन.डी.टी. शिक्षणशास्त्र महिला महाविदयालय, पुणे.
३. डॉ. चित्रा सोहनी, सहयोगी प्राध्यापक, एस.एन.डी.टी. शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय, पुणे.
४. डॉ. संगीता शिरोडे, सहयोगी प्राध्यापक, एस. एन.डी.टी., शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय, पुणे.
५. डॉ. ज्ञानेश्वर पाटील, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक,
६. डॉ. इरफान इनामदार, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर,

संदर्भग्रंथ सूची

१. बापट, भा. गो. (१९७७), शैक्षणिक संशोधन, पुणे, नूतन प्रकाशन,
२. मितांडे, वि.रा. (२००५), शैक्षणिक संशोधन पद्धती, पुणे नित्यनूतन
३. दांडेकर, वा. ना. (१९७४), शैक्षणिक मूल्यमापन संख्याशास्त्र, पुणे, श्री विद्या प्रकाशन,
४. मुळे, रा. शं. व उमाळे वि. तु. (१९८७), शैक्षणिक संशोधनाची मूलतत्त्वे, नागपूर, महाराष्ट्र विदयापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ.
५. पंडित बन्सी बिहारी (१९९५), शैक्षणिक कृतिसंशोधन, पुणे, नूतन प्रकाशन.
६. पंडित बन्सी बिहारी (१९८९), शिक्षणातील संशोधन अभिकल्प, पुणे, नूतन प्रकाशन.
७. पारसनीस हेमलता व इतर (१९९५), शैक्षणिक कृतिसंशोधन, पुणे, नूतन प्रकाशन.
८. पाटील ज्ञानेश्वर एकनाथ (२००७), शैक्षणिक कृतिसंशोधन मार्गदर्शिका, पुणे.
९. संचालक, म.रा.शै.सं.व प्र.प. (विद्या परिषद), शैक्षणिक कृतिसंशोधन हस्तपुस्तिका, पुणे.
१०. संचालक, बालभारती, कृतिशोधक (निवडक कृतिसंशोधन गोषवारा पुस्तिका), पुणे.
११. संचालक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, शैक्षणिक कृतिसंशोधन (पृष्ठ १ते१५), नाशिक,
१२. संचालक, म.रा.शै.सं.व प्र.प. (२०११), सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका (भाग २,३), सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका (भाग २, ३)., पुणे.
१३. संचालक, म.रा.शै.सं. व प्र.प. (२००४), कृतिसंशोधन हस्तपुस्तिका (भाग १.२), पुणे.



Post a Comment

0 Comments