Ticker

6/recent/ticker-posts

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास खेळ आणि इतिहास Swadhay Khel ani itihas

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास खेळ आणि इतिहास

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास विषयातील स्वाध्याय सोडवणार आहोत. सर्व प्रश्नांचा समावेश असलेला स्वाध्याय सोडवून आपण अधिक सराव करू शकता. परीक्षेत आपणास सर्व प्रश्न सोडवता यावीत यासाठी सराव करणे आवश्यक असते आपण Swadhay सोडवून असा सराव करू शकता. इयत्ता १० वी मधील  इतिहास विषयातील सर्व पाठांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास आपणास अभ्यासासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास खेळ आणि इतिहास Swadhay Khel ani itihas

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास-

सर्वप्रथम आपण इतिहास विषयातील सर्व पाठ व त्याची नावे पाहू. त्यानंतर इतिहास इयत्ता १० वी स्वाध्याय अभ्यासू. इयत्ता दहावीच्या इतिहास विषयामध्ये पुढील पाठांचा समावेश करण्यात आलेला आहे. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा, इतिहासलेखन : भारतीय परंपरा, उपयोजित इतिहास, भारतीय कलांचा इतिहास, प्रसारमाध्यमे आणि इतिहास, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, खेळ आणि इतिहास, पर्यटन आणि इतिहास, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन.

इतिहास विषयातील पाठावर आधिरीत सर्व प्रश्नांचा स्वाध्याय दिलेला आहे. खालील स्वाध्याय वाचन करा व त्यावर स्वाध्याय सोडवा. सर्व प्रश्न महतत्वाचे आहेत तेव्हा सर्व प्रश्न सोडवा. पाठावर विचारली जाणारे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत सर्व प्रश्न सोडवा. जो प्रश्न चुकेल तो पुन्हा पुन्हा वाचन करून सोडवा. अशा प्रकारे सराव करून सर्व प्रश्न सोडवा. 

इतिहास इयत्ता १० वी कृतीपत्रिका-

प्रश्न क्र.प्रश्नप्रकारगुणविकल्पासह गुण
प्र. १ (अ)दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ( ४ उपप्रश्न असतील. चारही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. )
प्र. १ (ब)पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. ( या प्रश्नप्रकारात ४-४ जोड्यांचे चार गट दिले जातील. प्रत्येक गटातून चुकीची असलेली एक जोडी ओळखून दुरुस्त जोड्या लिहिणे अपेक्षित आहे. चारही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.)
प्र. २ (अ)दिलेली संकल्पनाचित्रे पूर्ण करा. ( यात 'संकल्पनाचित्र', 'तक्ता पूर्ण करा', 'कालरेषा तयार करा', 'ओघतक्ता तयार करा', 'घटना कालानुक्रमे योग्य ठिकाणी दर्शवा' असे प्रश्नप्रकार येतील. ३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.)
प्र. २. (ब)टिपा लिहा / संकल्पना स्पष्ट करा. (३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे.)
प्र. ३ (अ)पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (यात ५ विधाने असतील. त्यांपैकी कोणतीही २ विधाने सकारण स्पष्ट करणे.)१५
प्र. ३. (ब)थोडक्यात उत्तरे लिहा. (यात ३ उपप्रश्न असतील. त्यांतील कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.)
प्र. ४.दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. ( उताऱ्यावरील प्रश्न हे केवळ लेखन, वाचन तपासणारे नव्हेत; तर इतिहास विषयाचे ज्ञान व आकलन तपासणारे असतील. यात प्रत्येकी १ गुणाचे २ प्रश्न व २ गुणांचा १ मुक्तोत्तरी प्रश्न समाविष्ट असेल. )
प्र ५ .पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (यात पुढील प्रश्नप्रकारांपैकी कोणतेही ३ प्रश्नप्रकार विचारले जातील. त्यांपैकी २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.)१२
• तक्त्याच्या मदतीने सविस्तर उत्तर लिहा.
• ऐतिहासिक प्रक्रिया / टप्पे सविस्तर स्पष्ट करा.
• साम्य व फरकाचे मुद्दे शोधा.
• दोन घटनांमधील परस्परसंबंध / कारणमीमांसा लिहा.
• विस्तृत निबंधवजा प्रश्नांची उत्तरे लिहा.
• चित्राचे / आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.
एकूण गुण४०६०


इतिहास इयत्ता १० वी स्वाध्याय -खेळ आणि इतिहास

itihas-swadhyay-10th


1/17
(१) ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा ------ येथे सुरू झाली.
(अ) ग्रीस
(ब) रोम
(क) भारत
(ड) चीन
2/17
(२) महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ------ असे म्हणत.
(अ) ठकी
(ब) कालिचंडिका
(क) गंगावती
(ड) चंपावती
3/17
(३) मनोरंजन व शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे '------' होय.
(अ) प्रयोग
(ब) प्रवृत्ती
(क) खेळ
(ड) स्पर्धा
4/17
(४) खेळ ही माणसाची ------ प्रवृत्ती आहे.
(अ) कृत्रिम
(ब) नैसर्गिक
(क) सांधिक
(ड) निकोप
5/17
(५) कुस्तीसाठी पूरक असा ------ व त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईत बाळंभट देवधर यांनी केली.
(अ) कबड्डी
(ब) आट्यापाट्या
(क) लंगडी
(ड) मल्लखांब
6/17
(६) क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकर यांना भारत सरकारने ------ पुरस्कार देऊन त्यांच्या कामगिरीचा गौरव केला.
(अ) पद्मश्री
(ब) खेलरत्न
(क) भारतरत्न
(ड) अर्जुन
7/17
(७) भारताचा ------ हा राष्ट्रीय खेळ आहे.
(अ) हॉकी
(ब) क्रिकेट
(क) फुटबॉल
(ड) कबड्डी
8/17
(८) २९ ऑगस्ट हा दिवस ------ यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडादिवस' म्हणून पाळला जातो.
(अ) खाशाबा जाधव
(ब) सचिन तेंडुलकर
(क) मेजर ध्यानचंद
(ड) मारुती माने
9/17
(९) विष्णुभट गोडसे यांनी लिहिलेल्या 'माझा प्रवास' या पुस्तकात दिलेल्या ------ यांच्या दिनचर्येत खेळांना फार महत्त्व होते.
(अ) तात्या टोपे
(ब) झाशीची राणी लक्ष्मीबाई
(क) बहादूरशहा जफर
(ड) नानासाहेब पेशवे
10/17
(१०) मारुती माने हे नाव ------ खेळाशी निगडित आहे.
(अ) हॉकी
(ब) कबड्डी
(क) मॅरेथॉन
(ड) कुस्ती
11/17
(११) ------ याच्या 'मृच्छकटिक' या नाटकाच्या नावाचा अर्थ 'मातीची गाडी' असा होतो.
(अ) अश्वघोष
(ब) शूद्रक
(क) भवभूती
(ड) हर्षवर्धन
12/17
(१२) इटलीतील ------ शहराच्या उत्खननात सापडलेल्या भारतीय बाहुलीवरून पहिल्या शतकात भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंधांबद्दल अनुमान काढता येते.
(अ) जोर्वे
(ब) पाँपेई
(क) रोम
(ड) नेपल्स
13/17
(१३) '------' या प्राचीन संस्कृत ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आले आहे.
(अ) पंचतंत्र
(ब) कथासरित्सागर
(क) मृच्छकटिक
(ड) हितोपदेश
14/17
(१४) मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल १९५६ मध्ये ------- पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(अ) पद्मश्री
(ब) पद्मभूषण
(क) पद्मविभूषण
(ड) भारतरत्न
15/17
(१५) ऑलिम्पिकमध्ये मुष्टियोद्धा स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारी ------ ही पहिली भारतीय महिला होय.
(अ) पी. व्ही. सिंधू
(ब) मेरी कोम
(क) फोगट
(ड) सायना नेहवाल
16/17
(१६) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा
(अ) मल्लखांब - शारीरिक कसरतीचे खेळ
(ब) वॉटर पोलो - पाण्यातील खेळ
(क) स्केटिंग - साहसी खेळ
(ड) बुद्धिबळ - मैदानी खेळ'
17/17
(१७) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा
(अ) मल्लविद्यागुरू - बाळंभट देवधर
(ब) हॉकीचे जादूगार - मिल्खा सिंग
(क) पहिली भारतीय महिला मुष्टियोद्धा - मेरी कोम
(ड) पहिल्या भारतीय महिला कुस्तीगीर - फोगट भगिनी
Result:
@@@@

Post a Comment

0 Comments