Ticker

6/recent/ticker-posts

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास पर्यटन आणि इतिहास Swadhay paryatan ani itihas

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास पर्यटन आणि इतिहास

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास विषयातील स्वाध्याय सोडवणार आहोत. सर्व प्रश्नांचा समावेश असलेला स्वाध्याय सोडवून आपण अधिक सराव करू शकता. परीक्षेत आपणास सर्व प्रश्न सोडवता यावीत यासाठी सराव करणे आवश्यक असते आपण Swadhay सोडवून असा सराव करू शकता. इयत्ता १० वी मधील  इतिहास विषयातील सर्व पाठांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास आपणास अभ्यासासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास पर्यटन आणि इतिहास Swadhay paryatan ani itihas

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास-

सर्वप्रथम आपण इतिहास विषयातील सर्व पाठ व त्याची नावे पाहू. त्यानंतर इतिहास इयत्ता १० वी स्वाध्याय अभ्यासू. इयत्ता दहावीच्या इतिहास विषयामध्ये पुढील पाठांचा समावेश करण्यात आलेला आहे. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा, इतिहासलेखन : भारतीय परंपरा, उपयोजित इतिहास, भारतीय कलांचा इतिहास, प्रसारमाध्यमे आणि इतिहास, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, खेळ आणि इतिहास, पर्यटन आणि इतिहास, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन.

इतिहास विषयातील पाठावर आधिरीत सर्व प्रश्नांचा स्वाध्याय दिलेला आहे. खालील स्वाध्याय वाचन करा व त्यावर स्वाध्याय सोडवा. सर्व प्रश्न महतत्वाचे आहेत तेव्हा सर्व प्रश्न सोडवा. पाठावर विचारली जाणारे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत सर्व प्रश्न सोडवा. जो प्रश्न चुकेल तो पुन्हा पुन्हा वाचन करून सोडवा. अशा प्रकारे सराव करून सर्व प्रश्न सोडवा. 

इतिहास इयत्ता १० वी कृतीपत्रिका-

प्रश्न क्र.प्रश्नप्रकारगुणविकल्पासह गुण
प्र. १ (अ)दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ( ४ उपप्रश्न असतील. चारही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. )
प्र. १ (ब)पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. ( या प्रश्नप्रकारात ४-४ जोड्यांचे चार गट दिले जातील. प्रत्येक गटातून चुकीची असलेली एक जोडी ओळखून दुरुस्त जोड्या लिहिणे अपेक्षित आहे. चारही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.)
प्र. २ (अ)दिलेली संकल्पनाचित्रे पूर्ण करा. ( यात 'संकल्पनाचित्र', 'तक्ता पूर्ण करा', 'कालरेषा तयार करा', 'ओघतक्ता तयार करा', 'घटना कालानुक्रमे योग्य ठिकाणी दर्शवा' असे प्रश्नप्रकार येतील. ३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.)
प्र. २. (ब)टिपा लिहा / संकल्पना स्पष्ट करा. (३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे.)
प्र. ३ (अ)पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (यात ५ विधाने असतील. त्यांपैकी कोणतीही २ विधाने सकारण स्पष्ट करणे.)१५
प्र. ३. (ब)थोडक्यात उत्तरे लिहा. (यात ३ उपप्रश्न असतील. त्यांतील कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.)
प्र. ४.दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. ( उताऱ्यावरील प्रश्न हे केवळ लेखन, वाचन तपासणारे नव्हेत; तर इतिहास विषयाचे ज्ञान व आकलन तपासणारे असतील. यात प्रत्येकी १ गुणाचे २ प्रश्न व २ गुणांचा १ मुक्तोत्तरी प्रश्न समाविष्ट असेल. )
प्र ५ .पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (यात पुढील प्रश्नप्रकारांपैकी कोणतेही ३ प्रश्नप्रकार विचारले जातील. त्यांपैकी २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.)१२
• तक्त्याच्या मदतीने सविस्तर उत्तर लिहा.
• ऐतिहासिक प्रक्रिया / टप्पे सविस्तर स्पष्ट करा.
• साम्य व फरकाचे मुद्दे शोधा.
• दोन घटनांमधील परस्परसंबंध / कारणमीमांसा लिहा.
• विस्तृत निबंधवजा प्रश्नांची उत्तरे लिहा.
• चित्राचे / आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.
एकूण गुण४०६०


इतिहास इयत्ता १० वी स्वाध्याय - पर्यटन आणि इतिहास

itihas-swadhyay-10th


1/13
(१) कुकने ------ विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.
(अ) हस्तकौशल्याच्या वस्तू
(ब) खेळणी
(क) खाद्यवस्तू
(ड) पर्यटन तिकिटे
2/13
(२) महाबळेश्वरजवळील भिलार हे ------ 'गाव' म्हणून प्रसिद्ध आहे.
(अ) पुस्तकांचे
(ब) वनस्पतींचे
(क) आंब्यांचे
(ड) किल्ल्यांचे
3/13
(३) इ.स. ६३० मध्ये चिनी प्रवासी ------ भारतात आला होता.
(अ) हो चि मिन्ह
(ब) चौ एन लाय
(क) युआन श्वांग
(ड) फायियान
4/13
(४) ------- भारतातून परदेशात जाणाऱ्यांची व परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
(अ) भारताच्या स्वातंत्र्यानंतर
(ब) १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर
(क) आर्थिक उदारीकरणानंतर
(ड) भारतात रेल्वेची बांधणी झाल्यानंतर
5/13
(५) महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक ------- हे दुर्गभ्रमण यात्रा आयोजित करीत असत.
(अ) ना. स. इनामदार
(ब) रणजीत देसाई
(क) विष्णुभट गोडसे
(ड) गोपाळ नीळकंठ दांडेकर
6/13
(६) चारधाम, बारा ज्योतिर्लिंगे यांमधील बहुसंख्य ठिकाणी लोकांची सोय व्हावी; म्हणून ------ यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली.
(अ) राणी लक्ष्मीबाई
(ब) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
(क) नानासाहेब पेशवे
(ड) विष्णुभट गोडसे
7/13
(७) भारताचे वैशिष्ट्य असलेले ------ यांसाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.
(अ) योगशिक्षण आणि आयुर्वेद उपचार
(ब) आयुर्वेद आणि युनानी उपचार
(क) युनानी आणि अॅलोपॅथी उपचार
(ड) होमिओपॅथी आणि निसर्गोपचार
8/13
(८) शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोगांद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या देशांमध्ये ------- हे नाव आघाडीवर आहे.
(अ) इजिप्त
(ब) जॉर्डन
(क) इझ्राईल
(ड) इटली
9/13
(९) पर्यटन हा सर्वाधिक ------ निर्माण करणारा उपयोग होऊ शकतो.
(अ) आनंद
(ब) रोजगार
(क) आत्मविश्वास
(ड) नावीन्यपूर्ण प्रयोग
10/13
(१०) संपूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल ------ याने यशस्वीपणे घडवून आणली.
(अ) थॉमस कुक
(ब) गेरहार्ट मर्केटर
(क) बेंजामिन ट्युडेला
(ड) मार्को पोलो
11/13
(११) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुनः लिहा:
(अ) माथेरान - - थंड हवेचे ठिकाण
(ब) ताडोबा - लेणी
(क) कोल्हापूर - देवस्थान
(ड) अजिंठा - जागतिक वारसास्थळ
12/13
(१२) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुनः लिहा:
(अ) जगाचा नकाशा व पृथ्वीगोल बनवणारा पहिला आरेखक - थॉमस कुक
(ब) जगातील पहिला शोधक प्रवासी - बेंजामिन ट्युडेला
(क) चीनची युरोपला ओळख करून देणारा इटालियन प्रवासी - मार्को पोलो
(ड) इस्लामी जगताची दीर्घ सफर घडवून आणणारा चौदाव्या शतकातील प्रवासी - इब्न बतुता
13/13
(१३) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुनः लिहा:
(अ) लोणार - सरोवर
(ब) जायकवाडी - थंड हवेचे ठिकाण
(क) घारापुरी - लेणी
(ड) जंतरमंतर - वेधशाळा
Result:
@@@@

Post a Comment

0 Comments