Ticker

6/recent/ticker-posts

Kendra Pramukh Exam 2025 Question Paper Subject Marathi Grammer

 Kendrapramukh Bharti 2025 बाबत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डिसेंबर मध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. शासनामार्फत केंद्रप्रमुख भरतीसाठीचा शासन निर्णय केंद्रप्रमुख भरती gr निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये केंद्रप्रमुख भरती परीक्षा स्वरूप कसे असेल याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. सोबतच केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम pdf कसा असेल याविषयीची माहिती देखील त्यामध्ये देण्यात आलेली आहे. 

Kendra Pramukh Exam 2025 Question Paper Subject Marathi Grammer

आपणास हे ही आवडेल
विषयलिंक 
केंद्रप्रमुख परीपूर्ण तयारासाठीयेथे क्लिक करा
केंद्रप्रमुखसराव प्रश्नपत्रिका
 सोडवण्यासाठी  
येथे क्लिक करा

केंद्रप्रमुख भरती तयासाठी

 APP Download करा

येथे क्लिक करा
वाट्स अप ग्रुप लिंक येथे क्लिक करा


केंद्रप्रमुख भरती पात्रता- 

अ) जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा. म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

ब) उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी.कॉम. बी. एस. सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

क) प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी बगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

ड) विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष . विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी राहील पात्र राहतील. 

केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम pdf- 

अ) बुध्दिमत्ता व अभियोग्यता- अभियोग्यता तार्किक क्षमता वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, फल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इ. बुध्दिमत्ता, आकलन, वर्गीकरणे, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इ. प्रश्न संख्या १०० गुण १००

ब) शालेय शिक्षणातील कार्य नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-  १) भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयक तरतूदी, संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय- १० प्रश्न १० गुण २) शिक्षणक्षेत्रात काम करणान्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचेशालेय शिक्षणातील कार्य - १० प्रश्न १० गुण ३) माहिती तंत्रज्ञान वापर (प्रात्यक्षिक)- १५ प्रश्न १५ गुण ४) अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पध्दती -१५ प्रश्न १५ गुण ५)  माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन - २० प्रश्न २० गुण ६) विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, विशेष करुन इंग्रजी विषयज्ञान - १५ प्रश्न १५ गुण ७) संप्रेषण कौशल्य (समाज संपर्क साधने) -  १५ प्रश्न १५ गुण.

केंद्रप्रमुख भरती जाहिरात - 

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील जाहीर करण्यात आलेला आहे. त्यासंर्भात परीपत्रक काठण्यात आले आहे. केंद्रप्रमुख वेतन श्रेणी एस १५ ४१८०० १३२३०० असते. शासन निर्णय दि. २/१२/२०२२ नुसार विभागीय स्पर्धा परीक्षेव्दारे पदभरती करिता उपलब्ध पदे जाहीर करण्यात आसेली आहेत. 

1/25
'पत्र प्रदिपकडून लिहिले गेले' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
सकर्मक भावे
कर्मकर्तरी
सकर्मक कर्तरी
अकर्मक कर्तरी
Explanation: कर्मकर्तरी
2/25
'आईने मुलीला निजवली' या वाक्यातील प्रयोग कोणता ?
कर्तरी
कर्मणी
भावे
संकीर्ण
Explanation: संकीर्ण
3/25
खालीलपैकी कोणते उदाहरण भावकर्तृक भावे प्रयोगाचे आहे?
उजाडले
कलकलते
मळमळते
वरीलपैकी सर्व
Explanation: वरीलपैकी सर्व
4/25
'त्वा काय कर्म करिजे लघुलेकराने' या वाक्यातील प्रयोग ........ आहे.
सकर्मक कर्तरी
पुराण कर्मणी
शक्य कर्मणी
भावे
Explanation: पुराण कर्मणी
5/25
'सचिन क्रिकेट खेळतो' प्रयोग ओळखा.
कर्मणी
सकर्मक कर्तरी
अकर्मक कर्तरी
भावे
Explanation: सकर्मक कर्तरी
6/25
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. मला उद्या गावाला जायचे आहे.
कर्मणी प्रयोग
कर्तरी प्रयोग
सकर्मक भावे प्रयोग
अकर्मक भावे प्रयोग
Explanation: अकर्मक भावे प्रयोग
7/25
ते जंगलतोड करतात. या कर्तरी वाक्याचे कर्मणी वाक्य कोणते ?
त्यांनी जंगलतोड केली.
त्यांना जंगलतोड करावी लागली.
जंगलतोड करू नये.
जंगलतोडीने जंगल उजाड झाले.
Explanation: त्यांनी जंगलतोड केली.
8/25
जेथे कर्म प्रथमान्त असते, कर्ता प्रथमान्त कधीच नसतो, कर्ता कधीकधी तृतीयात, चतुर्थात, सविकरणी तृतीयान्त किंवा शब्दयोगी अव्ययान्त असतो, अशा प्रयोगास काय म्हणतात ?
कर्तरी प्रयोग
कर्मणी प्रयोग
भावे प्रयोग
यापैकी नाही
Explanation: कर्मणी प्रयोग
9/25
प्रयोग ओळखा: सारे पोपट उडाले.
सकर्मक कर्तरी
अकर्मक कर्तरी
कर्मणी
भावे
Explanation: अकर्मक कर्तरी
10/25
भावे प्रयोग नसलेल्या वाक्याचा पर्याय ओळखा.
मुलाने अभ्यास केला.
मुलाने गाईला बांधले.
मुलाने चोराला पकडले.
सांजावले.
Explanation: मुलाने अभ्यास केला.
11/25
नागपूरला जाताना बुटीबोरीला उजाडले. या वाक्याचा प्रयोग ओळखा.
कर्तरी प्रयोग
कर्मणी प्रयोग
भावे प्रयोग
यापैकी नाही
Explanation: भावे प्रयोग
12/25
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा - टिपूने इंग्रजांना रणातून पिटाळले.
सकर्मक कर्तरी
सकर्मक भावे
अकर्मक कर्तरी
अकर्मक भावे
Explanation: सकर्मक भावे
13/25
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. लक्ष्‌मीकांतने आम्हास हसवले.
सकर्मक कर्तरी
कर्मणी
अकर्मक कर्तरी
भावे
Explanation: भावे
14/25
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा: पेन खाली पडले.
अकर्मक कर्तरी
कर्मणी
सकर्मक कर्तरी
भावे
Explanation: अकर्मक कर्तरी
15/25
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. पारिजात बहरला.
सकर्मक कर्तरी
सकर्मक भावे
कर्मणी
अकर्मक कर्तरी
Explanation: अकर्मक कर्तरी
16/25
.------- प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते.
कर्मणी
भावे
केवल
कर्तरी
Explanation: कर्तरी
17/25
वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याचे पत्र लिहून झाले.
कर्तरी प्रयोग
कर्तु कर्मसंकर प्रयोग
कर्मणी प्रयोग
भावे प्रयोग
Explanation: कर्मणी प्रयोग
18/25
'नळे इंद्रासी असे बोलिजेले' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
कर्मणी प्रयोग
कर्तरी प्रयोग
कर्तु कर्मणी प्रयोग
नवीन कर्मणी प्रयोग
Explanation: कर्मणी प्रयोग
19/25
'तिने आता बाहेर जाऊ नये' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
सकर्मक कर्तरी प्रयोग
अकर्मक कर्तरी
सकर्मक भावे प्रयोग
अकर्मक नावे प्रयोग
Explanation: अकर्मक नावे प्रयोग
20/25
पुढील वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर करा. 'ते सुंदर प्रवचन करतात.
ते प्रवचन करून दाखवतात.
ते सुंदर प्रबचने करता येतील
त्यांना सुंदर प्रबचने करता येतील.
त्यांनी सुंदर प्रवचन केले.
Explanation: त्यांनी सुंदर प्रवचन केले.
21/25
"ती गाणे गाते" या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
सकर्मक कर्तरी
अकर्मक कर्तरी
कर्मणी
भावे
Explanation: सकर्मक कर्तरी
22/25
"पोलिसाने चोर पकडला" या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
कर्तरी
कर्मणी
भावे
अकर्मक कर्तरी
Explanation: कर्मणी
23/25
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. रामाच्याने काम करवते.
शक्य कर्मणी
नवीन कर्मणी
पुराण कर्मणी
समापन कर्मणी
Explanation: शक्य कर्मणी
24/25
म्ही कामे केलीत' या वाक्यातील संकर कोणता ?
कर्म-भाव
कर्तृ-भाव
कर्तृ-कर्म
यापैकी नाही.
Explanation: यापैकी नाही.
25/25
'सभेत पत्रके वाटली गेली' यातील प्रयोग कोणता ?
भावे
भावकर्तरी
कर्मकर्तरी
कर्मणी
Explanation: कर्मकर्तरी
Result:
@@@@@@

आपणास हे ही आवडेल
विषयलिंक 
केंद्रप्रमुख परीपूर्ण तयारासाठीयेथे क्लिक करा
केंद्रप्रमुखसराव प्रश्नपत्रिका
 सोडवण्यासाठी  
येथे क्लिक करा

केंद्रप्रमुख भरती तयासाठी

 APP Download करा

येथे क्लिक करा
वाट्स अप ग्रुप लिंक येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments