Ticker

6/recent/ticker-posts

Right of Children to Free and Compulsory Education Act 2009

 Right of Children to Free and Compulsory Education Act 2009

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधनियम २००९

Right of Children to Free and Compulsory Education Act 2009

--------------------------------------

अ.क्र विषय लिंक
(१) केंद्रप्रमुख भरती पहा
(२) केंद्रप्रमुख सराव प्रश्नपत्रिका पहा
(३) शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ पहा
(४) Mobile App Download
(५) वाट्स अप ग्रुप Join
(६) वेबसाईट पहा
(७) सराव प्रश्नपत्रिका सोडवा
----------------------------- 
 आपण खालील दिलेली प्रश्नपत्रकिा सोडवू शकता. सर्व प्रश्न सोडवा सर्वात शेवटी आपणास निकाल पाहता येईल. सर्व प्रश्न म्हत्त्वाचे आहेत. 
केंद्रप्रमुख सराव प्रश्नपत्रिका २०२५ 
विषय-  बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधनियम २००९

@@@@@@@
1/50
1. .... अन्वये मोफत व सक्तीचे 'प्राथमिक शिक्षण' 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचा मूलभूत हक्क ठरला आहे?
(1) शाऐंशीवी घटनादुरुस्ती, 2002
(2) नव्वदावी घटनादुरुस्ती, 2003
(3) ब्याण्णवावी घटनादुरुस्ती, 2003
(4) अठ्ठयाऐंशीवी घटनादुरुस्ती, 2003
Explanation: (1) शाऐंशीवी घटनादुरुस्ती, 2002
2/50
2. शाऐंशीव्या घटनादुरुस्तीद्वारे भारताच्या राज्यघटनेत कोणत्या कलमात मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आला?
(1) 21 (ए)
(2) 22 (ए)
(3) 27 (बी)
(4) 24 (सी)
Explanation: (1) 21 (ए) √
3/50
3. सेनेगल येथे विश्व परिषदेने निर्धारित केल्याप्रमाणे शिक्षणा च्या सार्वत्रिकीकरणाचे ध्येय सन .....पर्यंत गाठणे उद्दिष्टित होते.
(1) 2014
(2) 2015
(3) 2017
(4) 2020
Explanation: (2) 2015
4/50
4. 'बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009' ची अंमलबजावणी संपूर्ण भारतात केव्हापासून झाली ?
(1) 1 एप्रिल, 2010
(2) 1 मे, 2010
(3) 1 जून, 2010
(4) 1 जुलै, 2010
Explanation: (1) 1 एप्रिल, 2010
5/50
5. शिक्षण हक्क अधिनियम, 2009 खालीलपैकी कोठे लागू आहे?
(1) अंदमान-निकोबार
(2) संपूर्ण भारत
(3) बिहार
(4) अरुणाचल प्रदेश
Explanation: (2) संपूर्ण भारत
6/50
6. बालकाने आपल्या हक्कांशी संबंधित गाऱ्हाणे लेखी तक्रारीद्वारे स्थानिक प्राधिकरणाकडे मांडावे, असे शिक्षण हक्क कायद्याच्या कोणत्या कलमात सांगितले आहे?
(1) कलम 30
(2) कलम 31
(3) कलम 32
(4) कलम 33
Explanation: (3) कलम 32
7/50
7. केंद्र शासन शिक्षण हक्क कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी अधिसूचनेद्वारे राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना करेल असे ...... कलमात नमूद केले आहे.
(1) 33
(2) 35
(3) 37
(4) 39
Explanation: (1) 33
8/50
8. शिक्षण हक्क अधिनियम, 2009 मधील तरतुदी खालीलपैकी कोणत्या शिक्षण संस्थांना लागू नाहीत ?
(1) मदरसा
(2) वैदिक पाठशाळा
(3) धार्मिक शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था
(4) वरील सर्व
Explanation: (4) वरील सर्व
9/50
9. शिक्षण हक्क अधिनियमातील कलम 2(3) अनुसार बालक म्हणजे.....
(1) जन्म ते 5 वर्षांपर्यंतचे मूल.
(2) 6 ते 14 वर्षे वयाचे बालक.
(3) 6 ते 14 वर्षे वयाचे पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी बालक.
(4) यांपेक्षा वेगळे.
Explanation: (3) 6 ते 14 वर्षे वयाचे पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी बालक.
10/50
10. शिक्षण हक्क कायद्यातील कलम 2 (4) अनुसार वंचित गटातील बालकांत कोणाचा समावेश होतो?
(1) विकलांगता असलेले बालक.
(2) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींमधील बालक.
(3) सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेले बालक.
(4) वरील सर्व
Explanation: (4) वरील सर्व
11/50
11. खालीलपैकी कोणत्या वर्षी राजर्षी शाहू महाराजांनी महाराष्ट्रातील करवीर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले ?
(1) 1915
(2) 1917
(3) 1903
(4) 1908
Explanation: (2) 1917
12/50
12. खालीलपैकी कोणी 1893 मध्ये भारतात सर्वप्रथम बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले ?
(1) उदयसिंह गायकवाड
(2) सयाजीराव गायकवाड
(3) राजर्षी शाहू महाराज
(4) जदुनाथ सरकार
Explanation: (2) सयाजीराव गायकवाड
13/50
13. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी मागणी ना. गोपाळ कृष्ण गोखले यांनी ब्रिटिश कायदेमंडळात केव्हा केली ?
(1) 1913
(2) 1911
(3) 1919
(4) 1915
Explanation: (2) 1911
14/50
14. भारतातील प्रत्येक शाळा 'शिक्षणाचा अधिकार अधिनियमा'स अनुरूप होण्यासाठी दिलेली तीन वर्षांच मुदत केव्हा संपली ?
(1) 31 मार्च, 2013
(2) 31 मे, 2013
(3) 30 एप्रिल, 2013
(4) 28 फेब्रुवारी, 2010
Explanation: (1) 31 मार्च, 2013
15/50
15. भारत सरकारने शिक्षणाचा हक्क अभियान कार्यक्रमाचे अंमलबजावणी देशभरात केव्हापासून सुरू केली आहे.
(1) 11 ऑगस्ट, 2011
(2) 11 नोव्हेंबर, 2011
(3) 13 ऑगस्ट, 2012
(4) 12 ऑक्टोबर, 2012
Explanation: (2) 11 नोव्हेंबर, 2011
16/50
16. खाली गट 'अ' मध्ये शिक्षण हक्क अधिनियमाच्या प्रकरणाचे नाव व 'ब' गटामध्ये प्रकरणाचा क्रमांक दिला आहे. त्यांच्या योग्य जोड्या लावा. गट 'अ (य) प्राथमिक शिक्षण अभ्यास क्रम व तो पूर्ण करणे (र) बालकांच्या हक्कांचे संरक्षण (ल) संकीर्ण गट 'ब' (1) सहा (2) सात (3) पाच
(1) य-3, र-1, ल-2
(2) य-3, र-2, ल-1
(3) य-2, र-3, ल-1
(4) य-1, र-2, ल-3
Explanation: (1) य-3, र-1, ल-2
17/50
17. महात्मा गांधींनी वर्धा येथील परिषदेत 'मूलोद्योगी शिक्षण योजना' केव्हा मांडली ?
(1) 1935
(2) 1937
(3) 1943
(4) 1944
Explanation: (2) 1937
18/50
18. भारताच्या संसदेने शिक्षण हक्क अधिनियम केव्हा संमत केला?
(1) 4 ऑगस्ट, 2009
(2) 17 ऑगस्ट, 2009
(3) 29 ऑगस्ट, 2009
(4) 2 ऑक्टोबर, 2009
Explanation: (1) 4 ऑगस्ट, 2009
19/50
19. शिक्षण हक्क अधिनियमास भारताच्या राष्ट्रपतींची मान्यता केव्हा मिळाली?
(1) 26 ऑगस्ट, 2009
(2) 4 सप्टेंबर, 2009
(3) 23 ऑगस्ट, 2009
(4) 17 सप्टेंबर, 2009
Explanation: (1) 26 ऑगस्ट, 2009
20/50
20. शिक्षण हक्क अभियानाचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे ?
(1) शिक्षण हक्क अधिनियमाविषयी समाजात जनजागृती निर्माण करणे.
(2) स्वयंसेवकांनी शाळांना भेटी देऊन शाळा व्यवस्थापन समितीशी अधिनियमाबाबत चर्चा करणे.
(3) शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेला विकास आराखडा तयार करण्यासाठी स्वयंसेवकांनी मार्गदर्शन करणे.
(4) वरील सर्व
Explanation: (4) वरील सर्व
21/50
21. 'शिक्षण हक्क अधिनियम, 2009' हा भारतीय गणराज्याच्या कितव्या वर्षी संमत झाला ?
(1) 60 व्या
(2) 61 व्या
(3) 62 व्या
(4) 63 व्या
Explanation: (1) 60 व्या
22/50
22. 'शिक्षण हक्क अधिनियम, 2009' च्या मूळ अधिनियमात एकूण किती कलमे होती?
(1) 38
(2) 40
(3) 41
(4) 42
Explanation: (1) 38
23/50
23. 'शिक्षण हक्क अधिनियम, 2009' किती प्रकरणांत विभागला आहे?
(1) सात
(2) आठ
(3) नऊ
(4) दहा
Explanation: (1) सात
24/50
24. खाली गट 'अ' मध्ये शिक्षण हक्क अधिनियमातील प्रकरणाचे नाव व 'ब' गटात प्रकरणांचे क्रमांक दिले आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा. गट 'अ' गट 'ब' (य) प्रारंभिक माहिती (1) दोन (र) समुचित सरकार, स्थानिक (2) चार प्राधिकरण व आई-वडिलांची कर्तव्ये (ल) शाळा व शिक्षकांच्या (3) तीन जबाबदाऱ्या (व) मोफत व सक्तीच्या (4) एक शिक्षणाचा हक्क
(1) य-4, र-3, ल-2, व-1
(2) य-3, र-1, ल-4, व-2
(3) य-2, र-3, ल-4, व-1
(4) य-3, र-4, ल-1, व-2
Explanation: (1) य-4, र-3, ल-2, व-1
25/50
25. शिक्षण हक्क अधिनियमातील कलम 19 (2) अनुसार अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी स्थापन झालेली शाळा निश्चित केलेली मानके व निकषांची पूर्तता करीत नसेल तर ती शाळा प्रारंभाच्या दिनांकापासून ......... वर्षांच्या कालावधीत त्याची पूर्तता स्वखर्चाने करेल असे नमूद केले आहे.
(1) तीन
(2) चार
(3) पाच
(4) सहा
Explanation: (1) तीन
26/50
26. केंद्र शासनाला शाळेसाठी ठरविलेली मानके व प्रमाणके यांच्यात भर घालणे किंवा ती वगळून अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार कोणत्या कलमान्वये देण्यात आला आहे?
(1) कलम 20
(2) कलम 21
(3) कलम 22
(4) कलम 23
Explanation: (1) कलम 20
27/50
27. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात अध्यापनाचे किमान किती तास असतात ?
(1) 800
(2) 900
(3) 1,000
(4) 1,100
Explanation: (1) 800
28/50
28. इयत्ता सहावी ते आठवीसाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात अध्यापनाचे किमान किती तास असतात ?
(1) 1,000
(2) 1,100
(3) 1,200
(4) 1,300
Explanation: (1) 1,000
29/50
29. शिक्षण हक्क अधिनियमानुसार शिक्षकासाठी प्रत्येक आठवड्याला कामाचे किमान तास किती असतात ?
(1) 45
(2) 50
(3) 60
(4) 35
Explanation: (1) 45
30/50
30. शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमात शाळा व्यवस्थापन समितीची माहिती दिली आहे?
(1) कलम 22
(2) कलम 21
(3) कलम 23
(4) कलम 24
Explanation: (2) कलम 21
31/50
31. 'बिगर-शैक्षणिक प्रयोजनांसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यास प्रतिबंध' या कलमात कोणत्या बाबी अपवाद ठरविण्यात आल्या आहेत ?
(1) दशवार्षिक जनगणना
(2) आपत्ती निवारण कार्य
(3) संसद व विधिमंडळ निवडणुका
(4) वरील सर्व
Explanation: (4) वरील सर्व
32/50
32. शिक्षण हक्क अधिनियमाच्या अनुसार शिक्षकास खाजगी शिकवणी घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
(1) कलम 23
(2) कलम 29
(3) कलम 28
(4) कलम 31
Explanation: (3) कलम 28
33/50
33. केंद्र शासनाने व राज्य सरकारने कोणत्या शैक्षणिक प्राधिकरणाच्या सूचनेनुसार शिक्षकांसाठी टीईटी (TET) परीक्षा लागू केली आहे?
(1) नॅक
(2) विद्यापीठ अनुदान आयोग
(3) दिल्ली विद्यापीठ
(4) एनसीटीई
Explanation: (4) एनसीटीई
34/50
34. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी 150 ते 200 पर्यंत विद्यार्थी असल्यास शिक्षक व मुख्याध्यापक यांचे प्रमाण अनुक्रमे किती असते ?
(1) पाच व एक
(2) चार व एक
(3) तीन व एक
(4) दहा व एक
Explanation: (1) पाच व एक
35/50
35. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शिक्षक-विद्यार्थी प्रमाण किती आहे ?
(1) 1 : 25
(2) 1 : 35
(3) 1 : 30
(4) 1 : 40
Explanation: (3) 1 : 30
36/50
36. खाली गट 'अ' मध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी प्रवेश घेतलेल्या बालकांची संख्या व 'ब' गटात शिक्षकांची संख्या दिली आहे, त्यानुसार अ व ब गटाच्या योग्य जोड्या लावा. 'अ' गट 'ब' गट (य) साठपर्यंत (1) पाच (र) एकसष्ट ते नव्वदपर्यंत (2) चार (ल) एक्याण्णव ते एकशेवीस (3) तीन (ब) एकशेएकवीस ते दोनशे (4) दोन
(1) य-2, र-4, ल-3, व-1
(2) य-3, 1-4, ल-1, व-2
(3) य-2, र-3, ल-4, व-1
(4) य-4, 1-3, ल-2, व-1
Explanation: (4) य-4, 1-3, ल-2, व-1
37/50
37. शिक्षण हक्क अधिनियमाच्या ...... मध्ये शिक्षकांची कर्तव्ये व त्यांच्या गाऱ्हाण्यांचे निवारण याची माहिती दिली आहे.
(1) कलम 25
(2) कलम 24
(3) कलम 26
(4) कलम 27
Explanation: (2) कलम 24
38/50
38. शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमात शिक्षक विद्यार्थी प्रमाणाची माहिती दिली आहे?
(1) कलम 27
(2) कलम 26
(3) कलम 25
(4) कलम 28
Explanation: (3) कलम 25
39/50
39. शिक्षण हक्क अधिनियमाच्या कलम 26 मध्ये कोणती माहिती दिली आहे?
(1) शिक्षक-विद्यार्थी प्रमाण
(2) शिक्षकांची कर्तव्ये
(3) शिक्षकांची रिक्त पदे भरणे
(4) अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रक्रिया
Explanation: (3) शिक्षकांची रिक्त पदे भरणे
40/50
40 शिक्षण हक्क अधिनियमाच्या ....... कलमात शाळा विकास योजनेची माहिती दिली आहे.
(1) कलम 24
(2) कलम 23
(3) कलम 22
(4) कलम 25
Explanation: (3) कलम 22
41/50
41. शिक्षकांच्या नियुक्तीच्या अर्हता व त्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती यांबाबतची माहिती शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमात नमूद करण्यात आली आहे?
(1) कलम 26
(2) कलम 24
(3) कलम 25
(4) कलम 23
Explanation: (4) कलम 23
42/50
42. केंद्र शासनाने अधिसूचनेद्वारे शिक्षकांच्या संबंधी अर्हता व नियम ठरविण्यासाठी कोणत्या संस्थेला शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे?
(1) एनसीटीई
(2) एनसीईआरटी
(3) सीबीएसई
(4) यूजीसी
Explanation: (1) एनसीटीई
43/50
43. शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमानुसार बिगर-शैक्षणिक प्रयोजनांसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यास प्रतिबंध केला आहे?
(1) कलम 31
(2) कलम 28
(3) कलम 29
(4) कलम 27
Explanation: (4) कलम 27
44/50
44. शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमात प्राथमिक शिक्षणासंबंधी अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रक्रिया निर्धारित करण्यात आली आहे?
(1) कलम 28
(2) कलम 29
(3) कलम 30
(4) कलम 31
Explanation: (2) कलम 29
45/50
45. इयत्ता सहावी ते आठवीसाठी शिक्षक व विद्यार्थी प्रमाण किती आहे ?
(1) 1 : 45
(2) 1 : 40
(3) 1 : 35
(4) 1 : 50
Explanation: (3) 1 : 35
46/50
46. इयत्ता सहावी ते आठवीसाठी प्रत्येक इयत्तेसाठी किमान एक शिक्षक व जेणेकरून पुढील कोणत्या विषयांसाठी किमान एक शिक्षक असेल ?
(1) विज्ञान व गणित
(2) सामाजिक अभ्यास
(3) भाषा
(4) वरील सर्व
Explanation: (4) वरील सर्व
47/50
47. इयत्ता सहावी ते आठवीसाठी ........ पेक्षा अधिक बालकांना प्रवेश दिल्यास एक पूर्ण वेळ मुख्याध्यापक आणि कला शिक्षण, आरोग्य शिक्षण व कार्यानुभव विषयांसाठी एक अनुदेशक मिळतो.
(1) 50
(2) 100
(3) 200
(4) 400
Explanation: (2) 100
48/50
48. शाळेच्या इमारतीसंबंधी शिक्षण हक्क अधिनियमाच्या अनुसूचीमध्ये कोणत्या सुविधा सांगितल्या आहेत ? (अ) प्रत्येक शिक्षकासाठी किमान एक खोली- व मुख्याध्यापक खोली (ब) अडथळारहित प्रवेशमार्ग (क) मुले व मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह (ड) स्वच्छ व पुरेसे पेयजल (इ) मध्यान्ह भोजनासाठी स्वयंपाकघर (ई) क्रीडांगण (फ) शाळेला संरक्षक भिंत
(1) फक्त अ, ब, क, ड
(2) फक्त अ, ब, क, ड, इ
(3) फक्त अ, ब, क, ड, इ, ई
(4) वरील सर्व
Explanation: (4) वरील सर्व
49/50
49. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शैक्षणिक वर्षातील किमान कामाचे दिवस किती आहेत?
(1) 200
(2) 180
(3) 220
(4) 240
Explanation: (1) 200
50/50
50. इयत्ता सहावी ते आठवीसाठी शैक्षणिक वर्षातील किमान कामाचे दिवस किती आहेत?
(1) 240
(2) 220
(3) 250
(4) 280
Explanation: (2) 220
Result:
@@@@@@@

आपणास हे ही आवडेल

अ.क्रविषयलिंक
(१)केंद्रप्रमुख भरती    पहा
(२)केंद्रप्रमुख सराव प्रश्नपत्रिका    पहा
(३)शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १    पहा
(४)Mobile App  Download
(५)वाट्स अप ग्रुप   Join
(६)वेबसाईट  पहा
(७)सराव प्रश्नपत्रिका  सोडवा

Post a Comment

0 Comments