अ) जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा. म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
ब) उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी.कॉम. बी. एस. सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
क) प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी बगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
ड) विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष . विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी राहील पात्र राहतील.
केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम pdf-
अ) बुध्दिमत्ता व अभियोग्यता- अभियोग्यता तार्किक क्षमता वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, फल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इ. बुध्दिमत्ता, आकलन, वर्गीकरणे, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इ. प्रश्न संख्या १०० गुण १००
ब) शालेय शिक्षणातील कार्य नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह- १) भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयक तरतूदी, संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय- १० प्रश्न १० गुण २) शिक्षणक्षेत्रात काम करणान्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचेशालेय शिक्षणातील कार्य - १० प्रश्न १० गुण ३) माहिती तंत्रज्ञान वापर (प्रात्यक्षिक)- १५ प्रश्न १५ गुण ४) अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पध्दती -१५ प्रश्न १५ गुण ५) माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन - २० प्रश्न २० गुण ६) विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, विशेष करुन इंग्रजी विषयज्ञान - १५ प्रश्न १५ गुण ७) संप्रेषण कौशल्य (समाज संपर्क साधने) - १५ प्रश्न १५ गुण.
केंद्रप्रमुख भरती जाहिरात -
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील जाहीर करण्यात आलेला आहे. त्यासंर्भात परीपत्रक काठण्यात आले आहे. केंद्रप्रमुख वेतन श्रेणी एस १५ ४१८०० १३२३०० असते. शासन निर्णय दि. २/१२/२०२२ नुसार विभागीय स्पर्धा परीक्षेव्दारे पदभरती करिता उपलब्ध पदे जाहीर करण्यात आसेली आहेत.
केंद्रप्रमुख भरती 2023
सराव प्रश्नपत्रिका - तर्क व अनुमान
A) भाषिक वय, वेळ, घड्याळ, तर्क, नाते, - माहितीवरुन अनुमान काढणे
तर्क व अनुमान
'बुद्धिमत्ता' क्षमतेत 'तर्क व अनुमान' या घटकात येणारे प्रश्न आपल्या
बुदिधला चालना देणारे असतात. चित्र, माहिती, वय, वजन, उंची, एखादी घटना, प्रसंग यांचे तुलनात्मक विश्लेषण करणे,
अचूक अनुमान काढणे यांवर आधारित हे प्रश्न असतात. हे प्रश्न योग्य दिशेने
विचार करून सोडविणे महत्त्वाचे असते. त्यासाठी प्रश्नांचे विश्लेषण करावे लागते.
कारण मीमांसा करावी लागते. मिळणाऱ्या अनेक उत्तरांतील योग्य उत्तरांची निवड करावी
लागते. अचूक तर्क व अचूक अनुमान हेच निर्णय घेताना उपयोगी पडतात.
उपघटक- 1. भाषिक वय, वेळ, घड्याळ,
तर्क, नाते, - माहितीवरुन
अनुमान काढणे
उपघटक-२. अभाषिक – घनाकृती ठोकळे, त्रिकोण व चौकोन
मोजणे
उपघटक-३. संख्यांच्या मांडणीतील सुत्र ओळखणे
भाषिक वय, वेळ, घड्याळ, तर्क, नाते, - माहितीवरुन अनुमान काढणे-
अ) तर्कशक्ती व अनुमानात वय, वेळ, घडचाळ यावर आधारीत विविध प्रश्नांची रचना असते.
भ) वयवारीचे प्रश्न सरासरी, गुणोत्तरावर आधारित असतात. वयाची तुलना होते. दोन व्यक्तींच्या वयातील फरक
सर्व वयात समान असतो. मात्र दोन व्यक्तींच्या एकूण वयांतील बेरीज एक वर्षांत दोनने
वाढते.
क) वेळेवरील प्रश्नांत 12 ताशी घड्याळ, 24 ताशी घडयाळ, सकाळ,
दुपार, संध्याकाळ, मध्यान्हपूर्व
मध्यान्होत्तर या विविध शब्दरचना माहित असणे गरजेचे आहे.
ड) घडयाळातील दोन काट्यांत होणारे कोन, दोन काटे एकमेकांना किती वेळा ओलांडतील यांसारख्या बाबी विचारात घ्याव्या
लागतील.
इ) मिनिटकाटा 1 मिनिटात 6°
तर तास काटा (१/2)° पुढे जातो. लगतच्या दोन
घरांत (आकड्यांत) 30° कोन तयार होतो.
सराव प्रश्नपत्रिका - तर्क व अनुमान
1/15
प्र. 1. आई-मुलगी यांच्या वयाची आजची बेरीज 30 वर्ष तर आई मुलीपेक्षा 22 वर्षांनी मोठी असल्यास मुलीच्या जन्माच्या वेळी आईचे वय किती होते ?
1) 26 वर्षे
2) 30 वर्षे
3) 16 वर्षे
4) 22 वर्षे
2/15
प्र. 2. राम, शाम व जॉन यांच्या वयाची सरासरी 16 वर्षे आहे. राम व शाम यांच्या वयाची सरासरी 14 वर्षे आहे तर जॉनचे वय किती वर्षे आहे ?
1) 20 वर्षे
2) 16 वर्षे
3) 24 वर्षे
4) 18 वर्षे
3/15
प्र. 3. आई, वडील, मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5: 1 आहे. जर आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर आजचे वडिलांचे वय किती ?
1) 30 वर्षे
2) 35 वर्षे
3) 28 वर्षे
4) 42 वर्षे
4/15
प्र. 4. खालीलपैकी कोणत्या वेळी घडयाळाचा मिनिटकाटा व तासकाटा यांत 75° मापाचा कोन होतो. ?
1) 9.05 वा.
2) 3.30 वा.
3) 10.10 वा.
4) ११.30 वा.
5/15
प्र.5. सकाळी 10.30 वा. सुरु झालेला क्रिकेटचा सामना दु. 2.15 वा. संपला तर सामना किती वेळ सुरू होता ?
1) 8. ता. 15 मि.
2) 3 ता. 15 मि.
3) 3.ता. 45 मि.
4) 4 ता. 45 मि.
6/15
प्र.6. सलीम, जॉन व हरी यांच्या वयाची बेरीज गतवर्षी 35 वर्षे होती. आज जॉनच्या दुप्पट वयाचा सलीम व हरी 6 वर्षांनी मोठा आहे तर आज सलीम पेक्षा हरी किती वर्षांनी मोठा अगर लहान आहे ?
1) 6 वर्षांनी लहान
2) 6 वर्षांनी मोठा
3) 2 वर्षांनी लहान
4) 2 वर्षांनी मोठा
7/15
प्र. 7. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिटकाटा तास काट्याला किती वेळ ओलांडतो ?
1) 3 वेळा
2) 4 वेळा
3) 5 वेळा
4) 2 वेळा
8/15
प्र. 8. वसंत व शरद यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4: 3 आहे. त्यांच्या 8 वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर 6 : 5 होत असेल तर दोघांच्या वयातील फरक किती ?
1) 6 वर्षे
2) 4 वर्षे
3) 2 वर्षे
4) 8 वर्षे
9/15
प्र. 9. घड्याळात 8 वा 20 मिनिटे झाली असताना तास काटा व मिनिटकाटा यांच्यात किती अंश मापाचा कोन होतो ?
1) 120°
2) 110°
3) 130°
4) 150°
10/15
प्र.10. सकाळी 8 वा. 30 मिनिटांनी निघालेला ताशी 24 किमी वेगाने धावणारा सायकलस्वार प्रत्येक तासाला 10 मिनिटे विश्रांती घेतो, तर 120 किमी अंतरावरील गावी तो किती वाजता पोहोचेल?
1) 2 वा. 20 मि.
2) 3 वा. 10.मि.
3) 1 वा. 30 मि.
4) 2 वा. 10 मि.
11/15
प्र.11. खाली दोन विधाने व दोन अनुमाने दिली आहे त्यावरुन योग्य पर्याय निवडा. विधाने (1) सर्व मुले शाळेत जातात. (2) शाळेमुळे साक्षरता वाढते. अनुमाने: (अ) साक्षरतेसाठी शाळेत जावे लागते. (ब) सर्व मुले साक्षर होतात.
1) 'अ' 'ब' दोन्ही सत्य
2) 'अ' 'ब' दोन्ही असत्य
3) 'अ' सत्य
4) 'ब' सत्य
Explanation: स्पष्टीकरण: अनुमान 'अ' साक्षरतेसाठी शाळेशिवाय इतर पर्याय असती.
अनुमान 'ब' सर्व मुले शाळेत जातात तर ती साक्षर सुद्धा होतात कारण शाळेमुळे साक्षरता येते.
12/15
प्र. 12. राधा, मीना, लैला यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:4: 3 आहे. आठ वर्षानंतर राधा लैलापेक्षा 8 वर्षांनी मोठी असेल, तर 4 वर्षांनंतर तिघींच्या वयाची सरासरी किती ?
1) 10 वर्षे
2) 12 वर्षे
3) 20 वर्षे
4) 24 वर्षे
13/15
प्र.13. सकाळी 8 वाजता एक गाडी ताशी 40 किमी वेगाने ज्या गावी निघाली त्याच ठिकाणाहून त्याच मागनि दुसरी गाडी सकाळी 10.30 वा ताशी 60 किमी वेगाने निघाली तर त्या दोन्ही गाड्या किती वाजता एकमेकींना भेटतील?
1) दु. 2 वा. 30 मि.
2) दु. 3 वा. 30 मि.
3) दु. 3 वा.
4) निश्चित सांगता येत नाही
14/15
प्र. 14. घडयाळात दु. 3.30 वाजल्यापासून रात्री 9.30 पर्यंत किती वेळा मिनिटकाटा तास काट्याला ओलांडतो?
1) 5 वेळा
2) 6 वेळा
3) 4 वेळा
4) 7 वेळा
15/15
प्र. 15. खाली दोन विधाने व दोन अनुमाने दिली आहेत तर त्याखालील योग्य पर्याय निवडा. विधाने (1) सर्व बाघ सिंह आहेत. (2) काही सिंह शिकार करतात. अनुमाने: (A) सर्व सिंह वाघ आहेत. (B) सर्व बाघ शिकार करतात.
1) A अचूक
2) B अचूक
3) A व B अचूक
4) A व B दोन्ही चूक
@@@@
केंद्रप्रमुख परीपूर्ण तयारासाठी येथे क्लिक करा जॉईन व्हा
केंद्रप्रमुख भरती तयासाठी APP Download करा Download
केंद्रप्रमुख सराव प्रश्नपत्रिका साठी येथे क्लिक करा
0 Comments