Ticker

6/recent/ticker-posts

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास प्रसारमाध्यमे आणि इतिहास itihas swadhyay 10th prasar madhyam ani itihas

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास प्रसारमाध्यमे आणि इतिहास

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास विषयातील स्वाध्याय सोडवणार आहोत. सर्व प्रश्नांचा समावेश असलेला स्वाध्याय सोडवून आपण अधिक सराव करू शकता. परीक्षेत आपणास सर्व प्रश्न सोडवता यावीत यासाठी सराव करणे आवश्यक असते आपण Swadhay सोडवून असा सराव करू शकता. इयत्ता १० वी मधील  इतिहास विषयातील सर्व पाठांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास आपणास अभ्यासासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास प्रसारमाध्यमे आणि इतिहास itihas swadhyay 10th prasar madhyam ani itihas

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास-

सर्वप्रथम आपण इतिहास विषयातील सर्व पाठ व त्याची नावे पाहू. त्यानंतर इतिहास इयत्ता १० वी स्वाध्याय अभ्यासू. इयत्ता दहावीच्या इतिहास विषयामध्ये पुढील पाठांचा समावेश करण्यात आलेला आहे. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा, इतिहासलेखन : भारतीय परंपरा, उपयोजित इतिहास, भारतीय कलांचा इतिहास, प्रसारमाध्यमे आणि इतिहास, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, खेळ आणि इतिहास, पर्यटन आणि इतिहास, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन.

इतिहास विषयातील पाठावर आधिरीत सर्व प्रश्नांचा स्वाध्याय दिलेला आहे. खालील स्वाध्याय वाचन करा व त्यावर स्वाध्याय सोडवा. सर्व प्रश्न महतत्वाचे आहेत तेव्हा सर्व प्रश्न सोडवा. पाठावर विचारली जाणारे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत सर्व प्रश्न सोडवा. जो प्रश्न चुकेल तो पुन्हा पुन्हा वाचन करून सोडवा. अशा प्रकारे सराव करून सर्व प्रश्न सोडवा. 

इतिहास इयत्ता १० वी कृतीपत्रिका-

प्रश्न क्र.प्रश्नप्रकारगुणविकल्पासह गुण
प्र. १ (अ)दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ( ४ उपप्रश्न असतील. चारही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. )
प्र. १ (ब)पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. ( या प्रश्नप्रकारात ४-४ जोड्यांचे चार गट दिले जातील. प्रत्येक गटातून चुकीची असलेली एक जोडी ओळखून दुरुस्त जोड्या लिहिणे अपेक्षित आहे. चारही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.)
प्र. २ (अ)दिलेली संकल्पनाचित्रे पूर्ण करा. ( यात 'संकल्पनाचित्र', 'तक्ता पूर्ण करा', 'कालरेषा तयार करा', 'ओघतक्ता तयार करा', 'घटना कालानुक्रमे योग्य ठिकाणी दर्शवा' असे प्रश्नप्रकार येतील. ३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.)
प्र. २. (ब)टिपा लिहा / संकल्पना स्पष्ट करा. (३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे.)
प्र. ३ (अ)पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (यात ५ विधाने असतील. त्यांपैकी कोणतीही २ विधाने सकारण स्पष्ट करणे.)१५
प्र. ३. (ब)थोडक्यात उत्तरे लिहा. (यात ३ उपप्रश्न असतील. त्यांतील कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.)
प्र. ४.दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. ( उताऱ्यावरील प्रश्न हे केवळ लेखन, वाचन तपासणारे नव्हेत; तर इतिहास विषयाचे ज्ञान व आकलन तपासणारे असतील. यात प्रत्येकी १ गुणाचे २ प्रश्न व २ गुणांचा १ मुक्तोत्तरी प्रश्न समाविष्ट असेल. )
प्र ५ .पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (यात पुढील प्रश्नप्रकारांपैकी कोणतेही ३ प्रश्नप्रकार विचारले जातील. त्यांपैकी २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.)१२
• तक्त्याच्या मदतीने सविस्तर उत्तर लिहा.
• ऐतिहासिक प्रक्रिया / टप्पे सविस्तर स्पष्ट करा.
• साम्य व फरकाचे मुद्दे शोधा.
• दोन घटनांमधील परस्परसंबंध / कारणमीमांसा लिहा.
• विस्तृत निबंधवजा प्रश्नांची उत्तरे लिहा.
• चित्राचे / आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.
एकूण गुण४०६०


इतिहास इयत्ता १० वी स्वाध्याय -प्रसारमाध्यमे आणि इतिहास

itihas-swadhyay-10th


1/17
(१) भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ------ यांनी सुरू केले.
(अ) जेम्स ऑगस्टस हिकी
(ब) सर जॉन मार्शल
(क) अॅलन ह्यूम
(ड) माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
2/17
(२) दूरदर्शन हे ------- माध्यम आहे.
(अ) दृक्
(ब) श्राव्य
(क) दृक्-श्राव्य
(ड) मुद्रण
3/17
(३) ------ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय.
(अ) दीनबंधू
(ब) प्रभाकर
(क) दर्पण
(ड) केसरी
4/17
(४) ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात ------- म्हणून साजरा केला जातो.
(अ) वृत्तपत्र दिन
(ब) पत्रकार दिन
(क) मुद्रण दिन
(ड) नियतकालिक दिन
5/17
(५) 'प्रभाकर' या वर्तमानपत्रातून ------- यांची समाजप्रबोधनपर 'शतपत्रे' प्रसिद्ध झाली.
(अ) भाऊ महाजन
(ब) बाळशास्त्री जांभेकर
(क) लोकहितवादी
(ड) कृष्णराव भालेकर
6/17
(६) मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ------ या वृत्तपत्राकडे जातो.
(अ) प्रभाकर
(ब) दर्पण
(क) इंदुप्रकाश
(ड) ज्ञानोदय
7/17
(७) 'दीनबंधू' हे वृत्तपत्र सुरू करणारे कृष्णराव भालेकर हे ------- यांचे सहकारी होते.
(अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(ब) नारायण मेघाजी लोखंडे
(क) महात्मा जोतीराव फुले
(ड) लोकमान्य टिळक
8/17
(८) आगरकर व लोकमान्य टिळक यांनी ------- ही वृत्तपत्रे सुरू केली.
(अ) दीनबंधू व इंदुप्रकाश
(ब) दर्पण व प्रभाकर
(क) ज्ञानोदय व दिग्दर्शन
(ड) केसरी व मराठा
9/17
(९) एकविसाव्या शतकात ------ लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
(अ) प्रतिनिधी
(ब) नियतकालिके
(क) वृत्तपत्रे
(ड) पुस्तके
10/17
(१०) मराठी भाषेतील ------ हे पहिले जांभेकर यांनी सुरू केले.
(अ) दिग्दर्शन
(ब) दर्पण
(क) प्रभाकर
(ड) ज्ञानोदय
11/17
(११) स्वातंत्र्यपूर्व काळात १९२४ मध्ये भारतात प्रथम ------ येथे खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले.
(अ) मुंबई
(ब) कोलकाता
(क) मद्रास (चेन्नई)
(ड) दिल्ली
12/17
(१२) भारतात २३ जुलै १९२७ रोजी ------- रेडिओ केंद्रावरून पहिले इंग्रजी न्यूज बुलेटीन प्रसारित केले गेले.
(अ) मद्रास
(ब) दिल्ली
(क) बंगळुरू
(ड) मुंबई
13/17
(१३) १५ सप्टेंबर १९५९ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी ------ दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले.
(अ) दिल्ली
(ब) कोलकाता
(क) मद्रास
(ड) मुंबई
14/17
(४) अॅडॉल्फ हिटलरच्या हस्तलिखित रोजनिश्या '------' या साप्ताहिकाने छापल्या; परंतु त्या रोजनिश्या खोट्या निघाल्या.
(अ) टाईम मॅगझिन
(ब) स्टेटस्मन
(क) स्टर्न
(ड) रॉयटर
15/17
(१५) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा :
(अ) प्रभाकर - आचार्य प्र. के. अत्रे
(ब) दर्पण - बाळशास्त्री जांभेकर
(क) दीनबंधू - कृष्णराव भालेकर
(ड) केसरी - बाळ गंगाधर टिळक
16/17
(१६) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा :
(अ) प्रभाकर - फ्रेंच बंडाचा इतिहास
(ब) इंदुप्रकाश - विधवा विवाहाचा पुरस्कार
(क) दीनबंधू - टेलिग्राफ यंत्राची माहिती
(ड) केसरी - सामाजिक-राजकीय प्रश्नांना वाचा फोडणारे
17/17
(१६) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा :
(अ) 'प्रगती' या नियतकालिकाचे संपादक - त्र्यंबक - शंकर शेजवलकर
(ब) 'दिग्दर्शन' हे पहिले मासिक सुरू केले - नरेंद्र शर्मा
(क) 'दीनबंधू' हे वृत्तपत्र सुरू केले - कृष्णराव भालेकर
(ड) 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ लिहिला - पंडित नेहरू
Result:
@@@@

Post a Comment

0 Comments