स्वाध्याय सविनय कायदेभंग चळवळ वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी
इयत्ता आठवी वर्गातील इतिहास विषयातील पाठ आठवा सविनय कायदेभंग चळवळ या पाठावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. सर्वप्रथम पातील Swadhay पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू.
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने
पुन्हा लिहा.
(महात्मा गांधी, खुदा-इ-खिदमतगार, रॅम्से मॅक्डोनाल्ड,
सरोजिनी नायडू)
(१) लंडनमध्ये ......... यांनी गोलमेज परिषदेचे
आयोजन केले होते.
(२) खान अब्दुल गफारखान यांनी ......... या
संघटनेची स्थापना केली.
(३) धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व ......... यांनी केले.
(४) दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी
म्हणून ......... उपस्थित होते.
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर
शिक्षा केली.
(२) सोलापूरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी
कायदा जारी केला.
(३) पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ
ठरली.
(४) गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू
केले.
३. खालील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह
करण्याचे का ठरवले ?
(२) राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे
का घेतली ?
४. सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण
करा.
सविनय कायदेभंग चळवळ स्वाध्याय-
1/13
(१) लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमतझाल्यावर महात्मा गांधींनी '----- चळवळ' करण्याचा निर्णय घेतला.
(अ) होमरूल
(ब) असहकार
(क) सविनय कायदेभंग
(ड) चले जाव
2/13
(२) सविनय कायदेभंगाच्या काळात ----- या शहरात सरकारने मार्शल लॉ (लष्करी कायदा) जारी केला होता.
(अ) पेशावर
(ब) सोलापूर
(क) पुणे
(ड) मुंबई
3/13
(३) 'सरहद्द गांधी' म्हणून ----- यांना ओळखले जात असे.
(अ) बॅरिस्टर जिना
(ब) जयप्रकाश नारायण
(क) पंडित जवाहरलाल नेहरू
(ड) खान अब्दुल गफारखान
4/13
(४) डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात ----- पुणे करार झाला.
(अ) ऑर्थर जेलमध्ये
(ब) आगाखान पॅलेसमध्ये
(क) शनिवार वाड्यामध्ये
(ड) येरवडा तुरुंगात
5/13
(५) सरकारने पेशावर येथील सत्याग्रहीवर गोळीबार करण्याचा आदेश ----- पलटणीला दिला.
(अ) गढवाल
(ब) शीख
(क) मराठा
(ड) राजपूत
6/13
(६) लंडनमध्ये ----- यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते.
(अ) महात्मा गांधी
(ब) खान अब्दुल गफारखान
(क) रॅम्से मॅक्डोनाल्ड
(ड) सरोजिनी नायडू
7/13
(७) खान अब्दुल गफारखान यांनी ----- या संघटनेची स्थापना केली.
(अ) खुदा-इ-खिदमतगार
(ब) मुस्लिम लीग
(क) आझाद हिंद सेना
(ड) तहरीक ए आवाम
8/13
(८) धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व ----- यांनी केले.
(अ) महात्मा गांधी
(ब) सरोजिनी नायडू
(क) पंडित जवाहरलाल नेहरू
(ड) जयप्रकाश नारायण
9/13
(९) दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून ----- उपस्थित होते.
(अ) महात्मा गांधी
(ब) सरोजिनी नायडू
(क) पंडित जवाहरलाल नेहरू
(ड) जयप्रकाश नारायण
10/13
(१०) वायव्य सरहद्द प्रांतातील गांधीजींचे अनुयायी ---- होते
(अ) शंकर शिवदारे
(ब) खान अब्दुल गफारखान
(क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(ड) बाबू गेनू सैद
11/13
(११) सोलापूर येथील मोर्चावर झालेल्या गोळीबारात ठार झालेले स्वयंसेवक -----
(अ) खान अब्दुल गफारखान
(ब) बाबू गेनू सैद
(क) शंकर शिवदारे
(ड) जगन्नाथ शिंदे
Option
12/13
(१२) परदेशी मालावर बहिष्कार आंदोलनात आघाडीवर असलेले मुंबईतील गिरणी कामगार -----
(अ) खान अब्दुल गफारखान
(ब) शंकर शिवदारे
(क) बाबू गेनू सैद
(ड) जगन्नाथ शिंदे
13/13
(१३) इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदेला दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेले नेते ----
(अ) पंडित जवाहरलाल नेहरू
(ब) महात्मा गांधी
(क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(ड) सरोजिनी नायडू
0 Comments